खासदार संजय राऊत यांनी नेपाळच्या सोशल मीडिया बंदीवरील आंदोलनावर प्रतिक्रिया दिली (फोटो - टीम नवराष्ट्र)
Sanjay Raut on Nepal Crisis gen z : मुंबई : आपल्या शेजारी असणाऱ्या नेपाळ देशामध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर बंदी या कारणावरुन नेपाळचे तरुण आक्रमक आणि हिंसक झाले आहेत. काठमांडू, संसद भवन परिसर आणि नेत्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली जात आहे. यामध्ये आता नेपाळमध्ये पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राजीनामा देखील दिला आहे. त्याचबरोबर ओली हे दुबईला जाण्याच्या तयारीत असल्याची बातमी आहे. नेपाळमधील या अराजकतेवर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत सूचक वक्तव्य केले आहे.
खासदार संजय राऊत यांनी नेपाळच्या परिस्थितीवर भाष्य केले आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित खासदार संजय राऊत यांनी सूचक विधान केले आहे. नेपाळमधील आंदोलकांनी सोशल मीडियावरील बंदीवरुन सरकार पाडले. यामध्ये नेपाळचे वित्तमंत्र्यांना आंदोलकांनी बेदम चोप दिला. वित्तमंत्र्यांना रस्त्यावर पळून पळून आंदोलकांनी मारले. याचा धक्कादायक व्हिडिओ देखील समोर आला आहे. खासदार संजय राऊत यांनी नेपाळच्या वित्तमंत्र्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खासदार राऊत यांनी हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये सूचक वक्तव्य केले. खासदार राऊत यांनी लिहिले की, ही दुर्घटना कोणत्याही देशात घडू शकते! सावध राहा! भारत माता की जय! वंदे मातरम्! असे स कॅप्शनमध्ये लिहिले आहे. खासदार संजय राऊत यांच्या सोशल मीडिया पोस्टची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा आहे. याचबरोबर त्यांनी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांना टॅग केले आहे.
राष्ट्रपतींच्या वैयक्तिक निवासस्थानावर हल्ला
राजधानी काठमांडूसह अनेक भागात जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेकीच्या घटना घडत आहेत. निदर्शकांनी राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्या वैयक्तिक निवासस्थानावर हल्ला करून तोडफोड केली आणि आग लावली. यापूर्वी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या पक्षाचे नेते रघुवीर महासेठ आणि माओवादी पक्षाचे अध्यक्ष प्रचंड यांच्या घरांवरही हल्ला करण्यात आला होता. निदर्शकांनी सुरक्षा दलांचा पाठलाग केला आणि त्यांच्यावर दगडफेक केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सर्व मंत्र्यांचे राजीनामे
नेपाळी काँग्रेसने त्यांच्या सर्व मंत्र्यांना आघाडी सरकारमधून राजीनामा देण्याचे निर्देश दिले आहेत. यानंतर, पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उपपंतप्रधान प्रकाश मान सिंह, आरजू राणा देऊबा (परराष्ट्र मंत्री), तेजू लाल चौधरी (क्रीडा मंत्री), अजय चौरसिया (कायदा मंत्री), दीपक खडका (ऊर्जा मंत्री), ऐन बहादूर शाही (वनमंत्री), प्रदीप पौडेल (आरोग्य आणि लोकसंख्या मंत्री), रामनाथ अधिकारी (कृषी मंत्री) आणि बद्री पांडे (पर्यटन मंत्री) यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे.