Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CBSE School: दयानंद शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा ‘माध्यम’तर्फे सत्कार; लाहोटी-बियाणी यांची सहाव्यांदा बिनविरोध निवड

CBSE School: लातूरच्या शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या दयानंद शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी लक्ष्मीरमण लाहोटी आणि सचिवपदी रमेशचंद्र बियाणी यांची सहाव्यांदा बिनविरोध निवड झाली. या निवडीबद्दल ‘माध्यम’ सांस्कृतिक व सामाजिक विचारपीठाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 25, 2026 | 06:15 PM
दयानंद शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा ‘माध्यम’तर्फे सत्कार; लाहोटी-बियाणी यांची सहाव्यांदा बिनविरोध निवड

दयानंद शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा ‘माध्यम’तर्फे सत्कार; लाहोटी-बियाणी यांची सहाव्यांदा बिनविरोध निवड

Follow Us
Follow Us:
  • ‘लातूर पॅटर्न’मध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या दयानंद शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा गौरव
  • दयानंद शिक्षण संस्थेचे लवकरच अत्याधुनिक CBSE स्कूल
  • लाहोटी-बियाणी यांची सहाव्यांदा बिनविरोध निवड
CBSE School: राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेला ‘लातूर पॅटर्न’ निर्माण करण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या दयानंद शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा ‘माध्यम’ या सांस्कृतिक व सामाजिक विचारपीठाच्या वतीने गौरव करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षपदी लक्ष्मीरमण लाहोटी, तर सचिवपदी रमेशचंद्र बियाणी यांची सलग सहाव्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. (CBSE School)

तसेच दयानंद शिक्षण संस्थेने गेल्या अनेक वर्षांपासून लातूरसह राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यावर संस्थेने सातत्याने भर दिला आहे. पदाधिकाऱ्यांच्या फेरनिवडीच्या पार्श्वभूमीवर ‘माध्यम’च्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा गौरव केला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी यांनी संस्थेच्या आगामी शैक्षणिक वाटचालीची माहिती दिली. सर्वसमावेशक धोरण स्वीकारून दयानंद शिक्षण संस्थेची अनेक वर्षांपासून वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक, लातूर-लामजना महामार्गावर तीव्र आंदोलन; नेमकं मागण्या काय?

बुधोडा येथे अत्याधुनिक CBSE स्कूल

दयानंद वाणिज्य महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा प्राप्त झाला असून, आता संस्थेच्या शैक्षणिक विस्ताराला आणखी गती दिली जाणार आहे. लातूरनजीकच्या बुधोडा येथे संस्थेचे अत्यंत अद्ययावत CBSE स्कूल लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती लक्ष्मीरमण लाहोटी यांनी दिली. त्यामुळे लातूर आणि परिसरातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. संस्थेचे संचालक मंडळ शैक्षणिक दर्जाशी कोणत्याही प्रकारची तडजोड करत नसल्याचेही लाहोटी यांनी स्पष्ट केले. स्वामी रामानंदतीर्थ आणि बाबासाहेब परांजपे यांनी घालून दिलेल्या मार्गावरून संस्थेची वाटचाल सुरू असून, या मूल्यांपासून संस्थाचालक कधीही ढळले नसल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी दयानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव विशाल लाहोटी यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

‘माध्यम’चे अध्यक्ष जयप्रकाश दगडे, सल्लागार डॉ. हंसराज बाहेती, डॉ. सोमनाथ रोडे, कोषाध्यक्ष ईश्वरचंद्र बाहेती आणि डॉ. प्रेमकिशोर तोष्णीवाल यांनी दयानंद शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा गौरव करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा प्राप्त

दयानंद वाणिज्य महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे महाविद्यालयाला शैक्षणिक अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांमध्ये अधिक स्वतंत्रपणे काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. दयानंद शिक्षण संस्थेने शैक्षणिक गुणवत्ता कायम राखत आधुनिक आणि रोजगाराभिमुख शिक्षणावर भर दिला आहे.

यासोबतच संस्थेच्या शैक्षणिक विस्ताराचा भाग म्हणून लातूरनजीक बुधोडा येथे अत्याधुनिक CBSE स्कूल लवकरच सुरू करण्यात येणार आहे. संस्थेचे संचालक मंडळ शैक्षणिक दर्जाशी कोणतीही तडजोड न करता विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे संस्थाध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी यांनी सांगितले.

लातूर मनपाच्या शाळेत ‘बोगस’ विद्यार्थी; अभिजीत दीपके यांचा गंभीर आरोप; सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी

Web Title: Dayanand education society office bearers felicitated by madhyam in latur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 06:15 PM

Topics:  

  • education
  • Latur

संबंधित बातम्या

PhD In Japan: जपानमध्ये पीएचडी करायचे स्वप्न पाहताय? मग लगेच जाणून घ्या तेथील खर्च, फी आणि स्कॉलरशिपबद्दल..
1

PhD In Japan: जपानमध्ये पीएचडी करायचे स्वप्न पाहताय? मग लगेच जाणून घ्या तेथील खर्च, फी आणि स्कॉलरशिपबद्दल..

कॉमर्सचा विद्यार्थी कसा बनला ‘AI Kid of India’? जाणून घ्या केरळच्या तरुणाची यशोगाथा..
2

कॉमर्सचा विद्यार्थी कसा बनला ‘AI Kid of India’? जाणून घ्या केरळच्या तरुणाची यशोगाथा..

NEET PG 2026 परीक्षा ३० ऑगस्ट रोजी! लवकरच येणार प्रवेशपत्र, परीक्षा केंद्रावर ‘ही’ कागदपत्रे नेणे आवश्यक
3

NEET PG 2026 परीक्षा ३० ऑगस्ट रोजी! लवकरच येणार प्रवेशपत्र, परीक्षा केंद्रावर ‘ही’ कागदपत्रे नेणे आवश्यक

पीडीतेला ठेवले दिवसभर ताटकळत, किनवट पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, नेमकं प्रकरण काय?
4

पीडीतेला ठेवले दिवसभर ताटकळत, किनवट पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.