Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पीडीतेला ठेवले दिवसभर ताटकळत, किनवट पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, नेमकं प्रकरण काय?

किनवट येथील शासकीय विश्रामगृहात कार्यरत ४३ वर्षीय आदिवासी महिला कर्मचाऱ्याचा सलग दोन दिवस विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 24, 2026 | 02:42 PM
पीडीतेला ठेवले दिवसभर ताटकळत, किनवट पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, नेमकं प्रकरण काय?

पीडीतेला ठेवले दिवसभर ताटकळत, किनवट पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, नेमकं प्रकरण काय?

Follow Us
Follow Us:

नांदेड : किनवट येथील शासकीय विश्रामगृहात कार्यरत ४३ वर्षीय आदिवासी महिला कर्मचाऱ्याचा सलग दोन दिवस विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पहिल्या दिवशी अश्लील मागणी आणि जातीविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा, तर दुसऱ्या दिवशी महिलेचा हात पकडून तिच्याशी जबरदस्तीची ओढाओढ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेनंतर महिला पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली असता तिला दिवसभर ताटकळत ठेवण्यात आले. मात्र, पोलिस निरीक्षक गणेश कराड यांनी हा आरोप फेटाळून लावत तक्रार प्राप्त झाल्याच्या दिवशी गुन्हा दाखल केल्याचे सांगितले.

पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, संबंधित महिला आंध आदिवासी समाजातील असून ती गोकुंदा व किनवट येथील शासकीय विश्रामगृहात स्वयंपाकी म्हणून कार्यरत आहे. २० ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास आरोपी बालाजी केंद्रे (रा. कोपरा, ता. किनवट) हा विश्रामगृहातील किचनमध्ये गेला. त्याने महिलेचा एकटेपणाचा फायदा घेत अश्लील मागणी केली तसेच तिच्या जातीविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे.

विश्रामगृहाच्या किचनमध्ये महिलेचा विनयभंग महिलेने आरडाओरड केल्यानंतर विश्रामगृहाचे व्यवस्थापक वैभव बिराजदार यांनी तेथे धाव घेऊन आरोपीला बाहेर काढल्याचे तक्रारीत नमूद आहे. मात्र, दुसऱ्याच दिवशी २१ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास आरोपी पुन्हा किचनमध्ये गेला. त्याने महिलेचा हात पकडून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आणि तिच्याशी ओढाओढ केल्याचा आरोप आहे. महिलेच्या आरडाओरडीनंतर व्यवस्थापक व इतर कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करून आरोपीला बाहेर काढल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा : पीटीच्या तासाला बोलल्यामुळे 11 वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण; शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

पोलिस निरीक्षक गणेश कराड यांच्याशी प्रश्नोत्तर

प्रश्न: २१ तारखेला पीडित महिला फिर्याद देण्यासाठी आली होती, पण तिची फिर्याद घेण्यात आली नाही, हे खरे आहे काय?

गणेश कराड : ज्या दिवशी महिला तक्रार द्यायला आली, त्याच दिवशी गुन्हा दाखल केला. आरोपीही ताब्यात घेतला आहे.

प्रश्न : महिलेला पोलिस ठाण्यात ताटकळत ठेवले, हे खरे आहे काय?

गणेश कराड : तसा काही प्रकार नाही. आरोपी ताब्यात आहे. BNS कलम ७४, ७५ (२) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी, यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Web Title: The incident of outraging a womans modesty has raised questions about the role of the kinwat police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 02:42 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Latur

संबंधित बातम्या

पीटीच्या तासाला बोलल्यामुळे 11 वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण; शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल
1

पीटीच्या तासाला बोलल्यामुळे 11 वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण; शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

शाळेतील वादातून दोन विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला, चोपातील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?
2

शाळेतील वादातून दोन विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला, चोपातील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?

मोखाड्यात मध्यरात्री घरात घुसून दरोडा, साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास; दाम्पत्याला धाक दाखवून लूटले
3

मोखाड्यात मध्यरात्री घरात घुसून दरोडा, साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास; दाम्पत्याला धाक दाखवून लूटले

बारामतीत खळबळ! आमदार रोहित पवारांच्या PA च्या मुलीचा आढळला मृतदेह
4

बारामतीत खळबळ! आमदार रोहित पवारांच्या PA च्या मुलीचा आढळला मृतदेह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.