Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amit Shah News : अजित पवारांनी घेतली अमित शाहांची भेट? दिल्लीतील बैठकीबाबत गुप्तता

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी दिल्लीत गेले होते. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jan 08, 2025 | 11:59 PM
अजित पवारांनी घेतली अमित शाहांची भेट? दिल्लीतील बैठकीबाबत गुप्तता

अजित पवारांनी घेतली अमित शाहांची भेट? दिल्लीतील बैठकीबाबत गुप्तता

Follow Us
Follow Us:

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी दिल्लीत गेले होते. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती आहे. या भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली. या भेटीवेळी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून आरोप-प्रत्यारोप होत असून त्याबाबत या भेटीत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यासोबतच राज्यातील पालकमंत्रिपदाचा तिढा आणि शरद पवारांच्या खासदारांना फोडण्याबाबतच्या बातम्या व दिल्ली विधानसभा निवडणूक या विषयवार चर्चा झाल्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी दिल्लीत अमित शाहांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतले असल्याचे वृत्त आहे. यावेळी दोन नेत्यांमध्ये विविध विषयवर चर्चा झाली असल्याचे समजते. या भेटीमध्ये नेमकी कशावर चर्चा झाली. याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

अजित पवार दिल्लीत आल्यानंतर त्यांचा भेट घेण्याचा कार्यक्रम निश्चित नव्हता. मात्र, प्रफुल्ल पटेल यांच्या घरातून त्यांनी थेट अमित शाहांचे निवासस्थान गाठले. पालकमंत्रिपदासाठी ही भेट होती असे जरी सांगण्यात येत असले तरी बीडच्या प्रकरणावरच प्रामुख्याने चर्चा झाल्याची शक्यता आहे. बीडच्या प्रकरणामुळे विरोधक आक्रमक झाले असून सरकार कुठेतरी बॅकफूटवर गेल्याचं दिसत आहे. त्यामुळे या बैठकीत या विषयावर चर्चा करण्यात आली.

सध्या बीडचा मुद्दा हा देशभर गाजत आहे. या प्रकरणात वाल्मिक कराड आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत आहेत. धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांसोबत सत्ताधारी नेत्यांकडूनही होताना दिसत आहे. राज्याच्या राजकारणावर अमित शााहंची नजर असून याच विषयावर त्यांनी अजित पवारांकडून माहिती घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या बैठकीत नेमके काय झाले याची उत्सुकता सर्वाना लागून राहिली आहे.

केंद्रीय मंत्री अमित शाहांची या पूर्वी खासदार बजरंग सोनवणे, राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनीही अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता अजित पवारांनीही अमित शाहांची भेट घेतल्याने या बैठकीत बीडचा मुद्दा हा केंद्रस्थानी असण्याची शक्यता आहे.

Web Title: Dcm ajit pawar meets home minister amit shah in delhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2025 | 11:59 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Amit Shah
  • Santosh Deshmukh Case

संबंधित बातम्या

Amit Shah on Congress : राहुल गांधींनी 2029 च्या पराभवासाठी तयार राहावं, अमित शाहांचा हल्लाबोल
1

Amit Shah on Congress : राहुल गांधींनी 2029 च्या पराभवासाठी तयार राहावं, अमित शाहांचा हल्लाबोल

सोमेश्वर साखर कारखान्यासाठी आज मतदान, तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी? सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला
2

सोमेश्वर साखर कारखान्यासाठी आज मतदान, तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी? सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला

Raj Thackeray : ‘पराकोटीची हुकूमशाही!’ अभिजित दिपकेंच्या अटकेवर राज ठाकरे भडकले, मोदी – शहांविरोधातील संतप्त पोस्ट चर्चेत
3

Raj Thackeray : ‘पराकोटीची हुकूमशाही!’ अभिजित दिपकेंच्या अटकेवर राज ठाकरे भडकले, मोदी – शहांविरोधातील संतप्त पोस्ट चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.