Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोमेश्वर साखर कारखान्यासाठी आज मतदान, तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी? सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज, ११ ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. कारखान्याच्या सत्तेची सूत्रे कोणाच्या हाती जाणार, याचा फैसला सभासद मतदार करणार आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 11, 2026 | 12:30 AM
सोमेश्वर साखर कारखान्यासाठी आज मतदान, तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी? सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला

सोमेश्वर साखर कारखान्यासाठी आज मतदान, तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी? सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला

Follow Us
Follow Us:
  • सोमेश्वर साखर कारखान्यासाठी आज मतदान
  • तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी?
  • सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला
बारामती/अमोल तोरणे : बारामती तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज, ११ ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. कारखान्याच्या सत्तेची सूत्रे कोणाच्या हाती जाणार, याचा फैसला सभासद मतदार करणार आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरलेली ही निवडणूक तिरंगी लढतीमुळे अधिक रंगतदार बनली असून, निकालाबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे.

 

पवार कुटुंबाच्या प्रतिष्ठेची निवडणूक

अजित पवार यांच्या नेतृत्वाशी जोडले गेलेले सोमेश्वर कारखान्याचे राजकारण त्यांच्या निधनानंतर नव्या वळणावर आले आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील गटासाठी ही निवडणूक कारखान्यावरील राजकीय वर्चस्व कायम राखण्याची कसोटी आहे. अजितदादांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने केलेल्या कामांचा वारसा आणि सभासदांचा विश्वास या मुद्द्यांवर सत्ताधारी गटाची भिस्त आहे. मात्र, विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी स्वतंत्र भूमिका घेत ‘लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनेल’ उभे केल्याने सत्ताधारी गटासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. भाजपचे माजी आमदार संजय जगताप यांच्यासह स्थानिक नेत्यांच्या सहकार्यामुळे या पॅनेलची ताकद वाढल्याचा दावा केला जात आहे. ‘शेतकरी हाच आमचा पक्ष’ ही भूमिका मांडत जगताप यांनी स्वतंत्र अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

युगेंद्र पवारांच्या भूमिकेकडे लक्ष

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांच्या सहभागामुळे या निवडणुकीला पवार विरुद्ध पवार असा राजकीय आयाम मिळाला आहे. स्थानिक पातळीवरील गटबाजी, नेतृत्वाविषयीची नाराजी आणि सभासदांचे वैयक्तिक संबंध यांचा मतदानावर किती परिणाम होतो, हे निर्णायक ठरणार आहे.

ऊस उत्पादकांचा कौल महत्त्वाचा

ऊसदर, वेळेवर होणारी ऊसबिले, कारखान्याचे आर्थिक व्यवस्थापन, गाळप क्षमता आणि सभासदांच्या हिताचे निर्णय हे मुद्देही निवडणुकीत महत्त्वाचे आहेत. केवळ राजकीय समीकरणांवर नव्हे, तर कारखान्याच्या कामकाजाबाबत सभासदांच्या मनात असलेल्या समाधानावरही निकाल अवलंबून राहणार आहे. तिन्ही बाजूंकडून विजयाचे दावे केले जात असले, तरी प्रत्यक्ष मतदानातून कोणाला कौल मिळतो, हे आज स्पष्ट होईल. सुनेत्रा पवार आपले वर्चस्व कायम राखणार, पुरुषोत्तम जगताप स्वतंत्र पॅनेलच्या बळावर बाजी मारणार की युगेंद्र पवारांच्या भूमिकेमुळे निकालाला अनपेक्षित कलाटणी मिळणार, याचे उत्तर सभासदांच्या मतदानातून मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा : गाडीवरील स्टिकरवरून माग काढला; दिव्यांग मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला ठोकल्या बेड्या

प्रचाराच्या सांगता सभेत तिन्ही पॅनल कडून शक्तीप्रदर्शन 

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी प्रचाराची सांगता सभा शुक्रवारी (दि ९) झाली. सत्ताधारी गटासह तिन्ही पॅनल कडून मोठे शक्ती प्रदर्शन करून विजयाचे दावे प्रति दावे करत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार, उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Web Title: Voting for the someshwar sugar factory election will take place today nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • ajit pawar
  • Someshwar Sugar Factory
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

‘अजितदादांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सोमेश्वरच्या सभासदांनी साथ द्यावी’; सुनेत्रा पवारांचे भावनिक आवाहन
1

‘अजितदादांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सोमेश्वरच्या सभासदांनी साथ द्यावी’; सुनेत्रा पवारांचे भावनिक आवाहन

Jay Pawar : जय पवार यांचे पुरुषोत्तम जगतापांवर कारवाईचे संकेत, ‘हे’ आहे कारण…
2

Jay Pawar : जय पवार यांचे पुरुषोत्तम जगतापांवर कारवाईचे संकेत, ‘हे’ आहे कारण…

Baramati Politics: दादा नसताना अशी सभा घ्यावी लागेल, असे कधीच वाटले नव्हते; जय पवार भावूक
3

Baramati Politics: दादा नसताना अशी सभा घ्यावी लागेल, असे कधीच वाटले नव्हते; जय पवार भावूक

Someshwar Election : ‘अजितदादांचे विचार पुढे न्यायचे असतील तर कारखाना माझ्या हातात द्या’; युगेंद्र पवारांचे आवाहन
4

Someshwar Election : ‘अजितदादांचे विचार पुढे न्यायचे असतील तर कारखाना माझ्या हातात द्या’; युगेंद्र पवारांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.