Devendra Fadanvis: राज्यात मतदानाचा टक्का वाढला; देवेंद्र फडणवीस म्हणाले, "ज्या-ज्या वेळेस..."
Maharashtra Vidhansabha Nivadnuk 2024: राज्यात विधानसभा निवडणूक अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर मतदान पूर्ण झाल्यानंतर अनेक कंपन्यांचे एक्झिट पोल समोर आलेले आहेत. त्यातील बऱ्याच एक्झिट पोलमध्ये महायुतीला पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. तर काही एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीचे सरकार येण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्यात यंदा मतदानाचा टक्का वाढल्याचे पाहायला मिळत आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय आहेत एक्झिट पोल्ल्स ?
पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार भाजपला 77 ते 108 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेला 37 ते 50 जागा मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसला 18 ते 30 जागा मिळू शकतात. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत कॉँग्रेसला 28 ते 47 जागा मिळू शकतात. ठाकरेंच्या शिवसेनेला 16 ते 35 तर शरद पवार यांच्या पक्षाला 25 ते 39 जागा मिळू शकतात.
चाणक्य एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येत असल्याचे दिसून येत आहे. या विधानसभा निवडणुकीत महायुतीला 150 ते 160 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 130 ते 138 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तर 6 ते 8 जागांवर अपक्ष उमेदवार जिंकण्याची शक्यता आहे, हा अंदाज चाणक्य एक्झिट पोलने दिलेला आहे.
पीपल्स पल्सच्या एक्झिट पोलनुसार राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येताना दिसत आहे. महाविकास आघाडीला सत्ता स्थापन करण्यात अपयश दिसत आहे. पीपल्स प्लसच्या अंदाजानुसार राज्यात महायुतील 182 जागा मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी शंभरी देखील पार करू शकत नाही असे चित्र पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीला विधानसभेत केवळ 97 जागा मिळतील असा अंदाज पीपल्स पल्सने व्यक्त केला आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
राज्यात यंदा मंतदानची टक्केवारी वाढली आहे. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मतदानाचा टक्का वाढला आहे, त्यामुळे राज्यात महायुतीला फायदा होणार आहे. ज्या-ज्या वेळेस मतदानाची टक्केवारी वाढते, त्यावळेस भाजपा आणि महायुतीला फायदा होतो असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने महाराष्ट्रात 161 जागा जिंकल्या होत्या. यात भाजपला 105 तर शिवसेनेला 56 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला 44 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 54 जागा मिळाल्या. याशिवाय इतरांना 29 जागा मिळाल्या होत्या. यातही छोट्या पक्षांना 16 जागा मिळाल्या. तर 13 जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. पण मुख्यमंत्रीपदावरून मतभेद झाल्याने ऐन सत्तास्थापनेच्या वेळी भाजप-शिवसेनेची युती तुटली. भाजपकडे बहूमत नसल्याने शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जात सरकार स्थापन केले. पण यावेळीची परिस्थिती वेगळी आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्य मोठी फूट पडली. त्यामुळे यावेळी महाराष्ट्रात सहा मोठे पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले हेत. यावेळी महाविकास आघाडीकडून सर्वाधिक 101 जागांवर काँग्रेस आणि महायुतीकडून भाजप 149 जागांवर निवडणूक लढवत आहे.