Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Election: पुण्यात भाजपचा अनोखा प्रचार; प्रभाग २५ मध्ये ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे पाद्यपूजन करून कचेरीचे उद्घाटन

पुणे मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग २५ मध्ये भाजपचा अनोखा पॅटर्न! राघवेंद्र बापू मानकर, कुणाल टिळक आणि स्वरदा बापट यांच्या प्रचारासाठी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे पाद्यपूजन करून निवडणूक कचेरीचे उद्घाटन करण्यात आले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 04, 2026 | 06:31 PM
ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या पाद्यपूजन सोहळ्याने निवडणूक कचेरीचे अनोखे उद्घाटन

ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या पाद्यपूजन सोहळ्याने निवडणूक कचेरीचे अनोखे उद्घाटन

Follow Us
Follow Us:

 

  • पुणे मनपा निवडणूक
  • ‘भाजपच्या भीष्मपितामहां’ना वंदन
  • प्रभाग २५ मध्ये ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या पाद्यपूजनाने प्रचाराचा शंखनादप
पुणे: राजकारणात निवडणुकांचे रणशिंग फुंकले जात असताना पुण्याच्या प्रभाग क्रमांक २५ (शनिवार पेठ, महात्मा फुले मंडई) मध्ये भारतीय जनता पक्षाने एक आदर्श आणि भावूक पायंडा पाडला आहे. पक्षासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या पाद्यपूजनाने निवडणूक कचेरीचे उद्घाटन करण्यात आले. निस्वार्थ सेवा आणि निष्ठेला वंदन करत उमेदवारांनी प्रचाराचा शुभारंभ केला.

ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान हाच पक्षाचा कणा

भाजपचे अधिकृत उमेदवार राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “निवडणूक ही केवळ राजकीय लढाई नसते, तर ती संघटनेचा आत्मा असलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान जपण्याची संधी असते. आज भाजप ज्या उंचीवर आहे, त्यामागे या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे अनेक वर्षांचे कष्ट आणि त्याग आहे. त्यांचा आशीर्वाद घेऊनच आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत.”

असा रंगला उद्घाटन सोहळा

प्रभाग २५ मधील या अनोख्या सोहळ्यात ज्येष्ठ नगरसेविका मीराताई पावगी, ज्योत्स्नाताई सरदेशपांडे, ज्येष्ठ कार्यकर्ते रमेशजी परचुरे आणि किरणजी सरदेशपांडे यांच्या हस्ते निवडणूक कचेरीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे पाद्यपूजन करून त्यांचा सन्मान करण्यात आला. या हृद्य सोहळ्याने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

हे देखील वाचा: नांदेडमध्ये राजकीय हालचालींना वेग; खासदार रवींद्र चव्हाण यांनी लावली जोरदार फिल्डींग

प्रमुख नेत्यांची उपस्थिती

या प्रसंगी कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंतभाऊ रासने यांनी भेट देऊन उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यास प्रभाग २५ मधील महायुतीचे उमेदवार:

राघवेंद्र बाप्पु मानकर

स्वरदा बापट

कुणाल टिळक

स्वप्नाली पंडित यांच्यासह माजी नगरसेवक दिलीप काळोखे, राजेश येनपुरे, गायत्री खडके, उदय लेले तसेच अमित कंक, मनोज खत्री, निलेश कदम, किरण जगदाळे, संतोष फडतरे, प्रणव गंजीवाले, मोहना गद्रे, रुपाली कदम, सुनील रसाळ आणि श्रेयस लेले यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

हे देखील वाचा: Uddhav Thackeray Live : देशातील लोकशाही संपून झुंडशाही सुरू…”; उद्धव ठाकरेंचा आक्रमक पवित्रा

Web Title: The election office was uniquely inaugurated with a ceremony of washing the feet of senior party workers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 06:31 PM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Local Body Election
  • Pune mahapalika

संबंधित बातम्या

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान
1

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान

West Bengal : मिथुनदांना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा, सरकारमध्ये एन्ट्री
2

West Bengal : मिथुनदांना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा, सरकारमध्ये एन्ट्री

‘चारित्र्यहनन केलं तर सोडणार नाही’; नवनाथ बनांच्या आरोपांवर शिवराज मोरे संतापले
3

‘चारित्र्यहनन केलं तर सोडणार नाही’; नवनाथ बनांच्या आरोपांवर शिवराज मोरे संतापले

PM Modi 25 Years: ‘वूई विल डू इट… आपण करूनच दाखवू’; 25 वर्षांच्या सेवाकाळानंतर पंतप्रधान मोदींनी देवाला मागितले ‘हे’ मागणं
4

PM Modi 25 Years: ‘वूई विल डू इट… आपण करूनच दाखवू’; 25 वर्षांच्या सेवाकाळानंतर पंतप्रधान मोदींनी देवाला मागितले ‘हे’ मागणं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.