Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eknath Shinde : पुरामुळे अडकले 40 जण, एअरलिफ्ट करून सुरक्षितस्थळी हलविण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबईसह राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी मंत्रालयातील राज्य आपत्कालिन कार्य केंद्राला भेट देऊन पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 15, 2025 | 06:44 PM
पुरामुळे अडकले 40 जण, एअरलिफ्ट करून सुरक्षितस्थळी हलविण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

पुरामुळे अडकले 40 जण, एअरलिफ्ट करून सुरक्षितस्थळी हलविण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मुंबईसह राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट देऊन पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. बीड जिल्ह्यातील आष्टी पाथर्डी तालुक्यातील काही गावांना पुराच्या पाण्याने वेढल्याने अडकलेल्या ४० ग्रामस्थांना एनडीआरएफच्या मदतीने एअरलिफ्ट करून सुरक्षित ठिकाणी हलवावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. अतिवृष्टी असलेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी यावेळी त्यांनी संवाद साधत मदत आणि बचाव कार्याबाबत माहिती घेतली आणि जिल्हा प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना दिल्या.

पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊसानंतर १७ धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरु, शेकडो नागरिकांचे स्थलांतर

यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नविन सोना, कार्य केंद्राचे संचालक डॉ. भालचंद्र चव्हाण आदी उपस्थित होत. यावेळी डॉ. चव्हाण यांनी राज्यातील परिस्थ‍ितीची माहिती दिली. यावेळी त्यांनी पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरुन संवाद साधत त्यांच्याकडून पावसाची परिस्थिती जाणून घेतली. तसेच मुंबईत जिथे जिथे पाणी साचल्याच्या तक्रारी येत आहेत तिथे अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करून लवकरात लवकर पाण्याचा निचरा होण्यासाठी पंप बसविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

पुण्यात आणि राज्यात इतर ठिकाणी पडलेल्या पावसाचा आढावा घेतला. आष्टी पाथर्डी तालुक्यातील काही गावांना पुराच्या पाण्याने वेढल्याने त्यात ४० गावकरी अडकून पडले होते. त्यांना एनडीआरएफच्या मदतीने एअरलिफ्ट करून बाहेर काढावे लागेल, असे संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार नाशिक वरून हेलिकॉप्टर बोलवून या अडकलेल्या लोकांना तत्काळ एअरलिफ्ट करून सुरक्षित ठिकाणी हलवावे असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले. तसेच छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्तांशी देखील त्यांनी या कक्षातून संवाद साधला. भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी दिलेल्या हवामान अंदाजानुसार पावसाची परिस्थिती कशी राहणार आहे त्यानुसार आपत्ती नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाने दक्षता घेण्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. गेल्या २४ तासात सचेत ॲपच्या माध्यमातून राज्यभरात पावसाचा अलर्ट देणारे ३५ कोटी मेसेज पाठविण्यात आल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी यावेळी दिली.

Yashomati Thakur News: जय शाहाला ‘नाही’ म्हणायला मोदीजी घाबरत आहेत का? भारत-पाकिस्तान सामन्यावरून काँग्रेसने तोफ डागली

Web Title: Dcm eknath shinde orders district administration to remain alert in wake of heavy rains

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2025 | 06:44 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • imd
  • maharashtra

संबंधित बातम्या

Acharya Devvrat : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी घेतली शपथ, कोण आहेत आचार्य देवव्रत? वाचा सविस्तर?
1

Acharya Devvrat : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी घेतली शपथ, कोण आहेत आचार्य देवव्रत? वाचा सविस्तर?

Kolhapur Municipal Elections : आघाड्यांमुळे इच्छुकांची लागणार कसोटी; कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग
2

Kolhapur Municipal Elections : आघाड्यांमुळे इच्छुकांची लागणार कसोटी; कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग

Maharashtra Elections: जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या अर्ध्या जागांवर महिलांचे वर्चस्व, ३४ जागांचे आरक्षण जाहीर
3

Maharashtra Elections: जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या अर्ध्या जागांवर महिलांचे वर्चस्व, ३४ जागांचे आरक्षण जाहीर

Devendra Fadnavis : आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल, देवेंद्र फडणवीसा यांचा विश्वास
4

Devendra Fadnavis : आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल, देवेंद्र फडणवीसा यांचा विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.