पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊसानंतर १७ धरणांतून पाणी सोडण्यात आले आहे (फोटो - सोशल मीडिया)
Pune Rain News : पुणे : संपूर्ण राज्यामध्ये तुफान पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह पुण्यामध्ये कालपासून जोरदार पाऊस सुरु असून पावसाची संततधार सुरु आहे. मुंबई, पुणे, ठाणे आणि पालघरला हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यामध्ये अजूनही पाऊस सुरु असून यामुळे रस्त्यावर पाणी साचल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असल्याने धरणसाठ्यांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील २६ धरणांपैकी तब्बल १७ धरणांतून पाणी सोडण्यात आले आहे.
परतीच्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. यात १५ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजता थेऊर येथील रुके वस्ती जिल्हा परिषद शाळा परिसरात पाण्याचा मोठा बॅकवॉटर साचला. यामुळे १०० ते १५० नागरिक अडकले असल्याची प्राथमिक माहिती पोलीस नियंत्रण कक्षाचे एपीआय अंबिके यांनी दिली. दरम्यान थेऊर येथील बचावकार्य सुरू करून, यावर तातडीने स्थानिक नागरिक, प्रशासन आणि आपदा मित्र यांच्या मदतीने मदतकार्य सुरू झाले. पीएमआरडीएच्या पीडीआरएफ जवानांनी ३.३० वाजता घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य सुरू केले. त्याचवेळी एनडीआरएफ टीमलाही मदतीसाठी पाचारण करण्यात आले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
एनडीआरएफचे जवान पहाटे ५ वाजता घटनास्थळी दाखल झाले व साधारण ५० ते ५५ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले. काही नागरिकांना टेरेसवर थांबवण्यात आले होते. या भागातील ओढ्यावर अतिक्रमण झाल्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह थांबून पूरस्थिती निर्माण झाली होती. अखेर रस्ता फोडून पाण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर सणसर येथे ४८० नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. मौजे सणसर (ता. इंदापूर) येथे देखील ओढ्याच्या पाण्याने घरांमध्ये शिरकाव केला. त्यामुळे १२० कुटुंबांना तातडीने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. अंदाजे ४८० नागरिकांना छत्रपती हायस्कूल, सणसर येथे तात्पुरता आसरा देण्यात आला आहे.
मुंबई हवामान वेधशाळेने पुणे जिल्ह्यासाठी १५ व १६ सप्टेंबर रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामुळे आणखी पावसाची शक्यता असल्याने प्रशासन हायअलर्टवर आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
जिल्ह्यातील पावसाची आकडेवारी
शासनाने निश्चित केलेल्या पावसाच्या सरासरी प्रमाणानुसार, जून ते सप्टेंबर महिन्यात पुणे जिल्ह्यात साधारण ८६२ मि.मी. पाऊस अपेक्षित असतो, तर जून ते ऑक्टोबरदरम्यान ९४० मि.मी. सरासरी पाऊस पडतो.
सन २०२५ मध्ये आजअखेरपर्यंत पडलेल्या पावसाची स्थिती अशी आहे :
सद्यस्थिती
सध्या पावसाचा जोर ओसरल्याने पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र हवामान खात्याने दिलेला इशारा लक्षात घेऊन प्रशासनाने सर्व यंत्रणा सतर्क ठेवण्याचे निर्देश निवासी जिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी दिले आहेत.