Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: महायुतीचा मोठा निर्णय: घटक पक्षातील नेत्यांना ‘क्रॉस ओव्हर’वर बंदी

महायुतीतीलच घटक पक्षांमध्ये परस्पर नेते आणि कार्यकर्त्यांना प्रवेश देणे बंद राहणार आहे. विशेषतः, भाजपने शिंदे सेना आणि राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांना प्रवेश देणार नाही

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 06, 2025 | 02:26 PM
Maharashtra Politics:

Maharashtra Politics:

Follow Us
Close
Follow Us:
  • महायुतीतील घटक पक्षांमध्ये एकमेकांच्या पक्षांच्या कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे पक्षप्रवेश
  • भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वादाची ठिणगी
  • घटक पक्षातील कोणत्याही नेत्याला किंवा पदाधिकाऱ्याला एकमेकांच्या पक्षात प्रवेश दिला जाणार नाही
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात पक्षांतराला जोर आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीतील घटक पक्षांमध्ये एकमेकांच्या पक्षांच्या कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे पक्षप्रवेश सुरू होते. यावरून भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात वादाची ठिणगीही पडली होती. पण या सगळ्यावर महायुतीने तोडगा काढला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये अंतर्गत वाद वाढल्याने समन्वय समितीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे महायुतीतील घटक पक्षातील कोणत्याही नेत्याला किंवा पदाधिकाऱ्याला एकमेकांच्या पक्षात प्रवेश दिला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. महायुतीतील अंतर्गत फूट थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. घटक पक्षांमध्ये पक्षांतराच्या हालचालींमुळे निर्माण होणारा तणाव टाळण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

MNS on Nashik Tree Cutting:’पार्थ पवारांना जसं माफ केलं तस या झाडांनाही माफ करा’; तपोवन वृक्षतोडीवरून मनसे आक्रमक

येत्या दोन ते तीन दिवसांत महायुतीचे प्रमुख नेते, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची बैठक होणार आहे. त्यात ‘क्रॉस ओव्हर’वर पूर्ण बंदीचा निर्णय औपचारिकपणे मंजूर होण्याची शक्यता आहे. समन्वय समितीच्या निर्णयानुसार, विरोधी पक्षातील कोणालाही महायुतीत सामील करून घेण्यास अडचण नाही. मात्र महायुतीतीलच घटक पक्षांमध्ये परस्पर नेते आणि कार्यकर्त्यांना प्रवेश देणे बंद राहणार आहे. विशेषतः, भाजपने शिंदे सेना आणि राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांना प्रवेश देणार नाही; तर शिंदे सेना आणि राष्ट्रवादीनेही भाजपच्या नेत्यांना पक्षात घेऊ नये, असा परस्पर करार करण्यात येत आहे. राजकीय संतुलन राखण्यासाठी आणि सत्ता समीकरणात तणाव टाळण्यासाठी घेतलेल्या या निर्णयावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

यासंदर्भात बोलताना भाजप (BJP) आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, कुटुंबामध्ये काम करताना मतभेद असतात पण, आमच्यात मनभेद नाहीत. एकमेकांना आम्ही बोलू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. आम्ही पूर्वी जे ठरवलं होतं. त्यामुळे महायुतीतील कोणत्याही पक्षाच्या व्यक्तीचा कुठेही पक्षप्रवेश करायचा नाही, यावर एकमत झाले आहे. दोन-तीन दिवसांत याबाबत महायुतीची बैठक होईल. कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेच्या कार्यकर्त्याचा भाजपमध्ये प्रवेश करायचा नाही, आणि भाजपच्या कार्यकर्त्याचा शिवसेनेत प्रवेश करायचा नाही. तसेच राष्ट्रवादीतही नाही. अशा प्रकारचे कुठलेही निर्णय घ्यायचे नाहीत.

Dhurandhar Box Office: रणवीरच्या‘धुरंधर’नं पहिल्या दिवशीच मोडले रेकॉर्ड ; सिकंदर–सैयारालाही टाकलं मागे

विरोधी पक्षांमधील नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पक्षात घेण्यास हरकत नाही. पण महायुतीलील घटक पक्षांमध्येच फोडाफोडी करायची नाही. अशी भूमिका महायुतीतील पक्षांनी घेतली आहे. दरम्यान, शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीमुळेजे वाद निर्माण झाले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने कल्याण-डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील अनेक नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. यामुळे एकनाथ शिंदे नाराज होते. त्या पूर्वी ठाण्यातही भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केले, त्यामुळेही भाजप आणि शिवसेनेत संघर्षाची ठिणगी पडली होती.

 

Web Title: Mahayuti imposes no entry policy for leaders amid local body elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 02:26 PM

Topics:  

  • BJP
  • devendra fadnavis
  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics
  • Marathi News

संबंधित बातम्या

Karjat News : विकासकामाला गती; उल्हास नदीवरील दहिवली मालेगाव नव्या पुलबांधणीची स्थानिकांची मागणी
1

Karjat News : विकासकामाला गती; उल्हास नदीवरील दहिवली मालेगाव नव्या पुलबांधणीची स्थानिकांची मागणी

‘महाराष्ट्राच्या जनतेला विकासाच्या वाटेवर नेण्याचा प्रयत्न केला’; मुख्यमंत्र्यांचं विधान
2

‘महाराष्ट्राच्या जनतेला विकासाच्या वाटेवर नेण्याचा प्रयत्न केला’; मुख्यमंत्र्यांचं विधान

मोकाट कुत्री ते ‘कनेक्टिव्हीटी’, ‘या’ 15 मुद्यांवर लक्ष वेधणार; महेश लांडगे यांची हिवाळी अधिवेशन तयारी
3

मोकाट कुत्री ते ‘कनेक्टिव्हीटी’, ‘या’ 15 मुद्यांवर लक्ष वेधणार; महेश लांडगे यांची हिवाळी अधिवेशन तयारी

Sangli News : जुनी पेन्शन तसेच इतर मागण्यांसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मोर्चा
4

Sangli News : जुनी पेन्शन तसेच इतर मागण्यांसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मोर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.