Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : औंध उपकेंद्रात १० एम.व्ही.ए.आर. क्षमतेच्या दोन कपॅसिटर बँकांचे लोकार्पण!

सातारा जिल्ह्यातील औंध उपकेंद्रात १० एम.व्ही.ए.आर. क्षमतेच्या दोन कपॅसिटर बँकांचे लोकार्पण करण्यात आले. हा प्रकल्प महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोणत्याही कंत्राटदाराशिवाय पूर्ण केला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 21, 2026 | 09:01 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

सातारा जिल्ह्यातील वडूज येथील १३२ के.व्ही. औंध उपकेंद्रात १० एम.व्ही.ए.आर. क्षमतेच्या दोन कपॅसिटर बँकांचे लोकार्पण करण्यात आले असून, या प्रकल्पामुळे परिसरातील वीजपुरवठा व्यवस्थेत मोठी सुधारणा होणार आहे. महापारेषण वीज कंपनीच्या मुख्य अभियंता सौ. शिल्पा कुंभार यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे, हा संपूर्ण प्रकल्प कोणत्याही बाह्य कंत्राटदाराशिवाय महापारेषणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या प्रयत्नांतून पूर्ण केला आहे.

Mumbai Atal Setu : मुंबई ते पुणे प्रवास होणार सुसाट! अटल सेतू–मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग कनेक्टरला वेग

या कपॅसिटर बँक प्रकल्पामुळे खटाव, कोरेगाव आणि माण तालुक्यातील कृषी व घरगुती ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या भागात कमी विद्युत दाबाची समस्या होती, ज्यामुळे शेती व घरगुती वापरावर परिणाम होत होता. ही समस्या लक्षात घेऊन २०२२ पासून महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी यावर अभ्यास सुरू केला आणि सातत्याने पाठपुरावा करून अखेर २०२६ मध्ये हा प्रकल्प पूर्णत्वास नेला.

मूळ नियोजनानुसार हा प्रकल्प जुलै २०२६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अवघ्या १५ दिवसांत रात्रंदिवस मेहनत घेऊन एप्रिल महिन्यातील तीव्र उष्णतेत हे काम पूर्ण केले. त्यामुळे या प्रकल्पाची कार्यक्षमता आणि कर्मचारीवर्गाची जिद्द अधोरेखित होते.

या प्रकल्पासाठी आवश्यक साहित्य सांगली येथील मॅग्नेविन कंपनीकडून पुरवण्यात आले. प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी अधिक्षक अभियंता प्रांजळ कांबळे, कार्यकारी अभियंता हुसे साहेब, तसेच सौ. सुनीता कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. औंध उपकेंद्र प्रमुख जयवंत कुंभार, अतिरिक्त कार्यकारी अभियंता सौ. पवार, तसेच कृष्णात पाटील आणि महेश कारखानीस यांनी नियोजन आणि अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावली.

Solar power project : एसटीचा सौर ऊर्जेकडे पहिला टप्पा सुरू; 2.57 मेगावॉट ग्रीड सोलर प्रकल्पाला मंजुरी – परिवहनमंत्र्यांची माहिती

या कपॅसिटर बँकांमुळे संबंधित भागातील वीज वितरण कंपनीच्या ग्राहकांना कमी व्होल्टेजच्या समस्येतून मोठा दिलासा मिळणार असून, शेती, उद्योग आणि घरगुती वापरासाठी अधिक स्थिर आणि गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा मिळणार आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Dedication of two 10 mvar capacitor banks at the aundh substation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 09:01 PM

Topics:  

  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News : महादरे–हत्ती तलावाचा होणार कायापालट; ६ कोटींच्या योजनेतून पर्यटनाला चालना
1

Satara News : महादरे–हत्ती तलावाचा होणार कायापालट; ६ कोटींच्या योजनेतून पर्यटनाला चालना

साताऱ्यात गौणखनिज व्यवस्थापनात प्रशासनाची दमदार कामगिरी; महसूल १०० कोटींच्या लक्ष्याच्या उंबरठ्यावर
2

साताऱ्यात गौणखनिज व्यवस्थापनात प्रशासनाची दमदार कामगिरी; महसूल १०० कोटींच्या लक्ष्याच्या उंबरठ्यावर

Women Reservation महिला आरक्षणावरून काँग्रेसची केंद्रावर टीका; ‘८५०’ आकड्याचा आधार काय?
3

Women Reservation महिला आरक्षणावरून काँग्रेसची केंद्रावर टीका; ‘८५०’ आकड्याचा आधार काय?

Satara News: “आडवे आले तर सोडणार नाही, हिशोब चोख ठेवतो”; साताऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांनवर तुफान हल्ला
4

Satara News: “आडवे आले तर सोडणार नाही, हिशोब चोख ठेवतो”; साताऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांनवर तुफान हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.