Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : महादरे–हत्ती तलावाचा होणार कायापालट; ६ कोटींच्या योजनेतून पर्यटनाला चालना

महादरे व हत्ती तलावांची पाणी साठवण क्षमता वाढवणे, परिसराचे सुशोभीकरण करणे आणि त्याला पर्यटनस्थळ म्हणून विकसित केला जाणार आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 21, 2026 | 05:25 PM
Shivendraraje Bhosale Inspects Development Works in Mahadare and Hatti Talav Areas Satara News

Shivendraraje Bhosale Inspects Development Works in Mahadare and Hatti Talav Areas Satara News

Follow Us
Follow Us:

Satara News : शाहूपुरी : शहरालगतच्या महादरे आणि हत्ती तलाव परिसराचा विकास आता नव्या टप्प्यात प्रवेश करत असून, सुमारे ६ कोटी रुपयांच्या आराखड्याला गती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष अ‍ॅड. दत्ता बनकर, पाणीपुरवठा सभापती धनंजय जांभळे, भाजप गटनेते अविनाश कदम, नगरसेविका मुक्ता लेवे आणि मुख्याधिकारी विनोद जळक उपस्थित होते.

या प्रकल्पाचा केंद्रबिंदू म्हणजे महादरे व हत्ती तलावांची पाणी साठवण क्षमता वाढवणे, परिसराचे सुशोभीकरण करणे आणि त्याला पर्यटनस्थळ म्हणून विकसित करणे. सुमारे २८ एकर नगरपालिका मालकीच्या जागेवर आधुनिक बाग उभारण्याची संकल्पनाही यावेळी पुढे आली. संपूर्ण प्रकल्प तीन टप्प्यांत राबवला जाणार आहे.

हे देखील वाचा : “मविआचा कार्यकर्ता वहिनींसोबत ताकदीनं उभा..; सुप्रिया सुळेंचे सांगता सभेत आश्वासन

पहिल्या टप्प्यात तलावांचे सुशोभीकरण, दोन्ही तलावांना जोडणाऱ्या ऐतिहासिक संरचनेची दुरुस्ती व बळकटीकरण, पाणी शुद्धीकरण यंत्रणेचे आधुनिकीकरण आणि परिसरातील दळणवळण सुविधा सुधारण्यावर भर असेल, अशी माहिती भोसले यांनी दिली. प्रस्तावित रिंग रोडमुळे कास पठारावरून येणाऱ्या पर्यटकांना या परिसरात थेट प्रवेश मिळणार असून, जवळील फुलपाखरू अभयारण्यालाही याचा फायदा होणार आहे.

नागरिकांसाठी विरंगुळ्याचे केंद्र म्हणून प्रशस्त बाग विकसित केली जाणार असून, त्यात बसण्यासाठी बाके, पॅगोडा, ‘नाना-नानी पार्क’ आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचा समावेश असेल. वृक्षारोपणासाठी नगरपालिका आणि वनविभागाच्या माध्यमातून नियोजन करण्यात येणार आहे.

हे देखील वाचा : महिला आरक्षण विधेयकावरून हिंगोली तापले! काँग्रेसविरोधात शिंदे गटाची जोरदार घोषणाबाजी

दरम्यान, अलीकडील राजकीय घडामोडींवर बोलताना भोसले यांनी महायुतीतील समन्वयावर भर दिला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील समीकरणे वेगळी असली तरी जिल्हा परिषदेत सर्वांनी एकत्र काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महेश शिंदे यांच्या भाजप प्रवेशाबाबत त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले, मात्र जिल्हा परिषद अध्यक्ष प्रियाताई शिंदे यांच्या उमेदवारीसाठी भाजपने पुढाकार घेतल्याचे त्यांनी नमूद केले.

साताऱ्यात सरकारी-निमसरकारी कर्मचाऱ्यांचा अनिश्चित काळासाठी संप

सातारा जिल्ह्यातील राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायत, अंशकालीन, कंत्राटी आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी २० एप्रिल २०२६ पासून अनिश्चित काळासाठी संप पुकारला आहे.
जिल्हा संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला असून, शासनाकडून वारंवार लक्ष वेधूनही मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे संपाचा पर्याय स्वीकारण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.

संपाच्या काळात दररोज सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचारी एकत्र येऊन निदर्शने करणार आहेत. या आंदोलनाचा परिणाम शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: Shivendraraje bhosale inspects development works in mahadare and hatti talav areas satara news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 05:25 PM

Topics:  

  • political news
  • Satara News
  • Shivendra Raje Bhosale

संबंधित बातम्या

पाटण शहरातील अतिक्रमणांवर कारवाई न केल्यास आंदोलन करू, सामाजिक कार्यकर्ते नितीन पिसाळ यांचा इशारा
1

पाटण शहरातील अतिक्रमणांवर कारवाई न केल्यास आंदोलन करू, सामाजिक कार्यकर्ते नितीन पिसाळ यांचा इशारा

मोठी बातमी ! ठाकरे गटाच्या खासदारांची ‘मातोश्री’वर आज महत्त्वपूर्ण बैठक; ‘या’ मुद्यांवर होणार चर्चा
2

मोठी बातमी ! ठाकरे गटाच्या खासदारांची ‘मातोश्री’वर आज महत्त्वपूर्ण बैठक; ‘या’ मुद्यांवर होणार चर्चा

शिवसेनेच्या नियुक्ती प्रक्रियेवर साताऱ्यात पुन्हा प्रश्नचिन्ह, रणजितसिंह भोसले यांची नाराजी
3

शिवसेनेच्या नियुक्ती प्रक्रियेवर साताऱ्यात पुन्हा प्रश्नचिन्ह, रणजितसिंह भोसले यांची नाराजी

जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी द्या; शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
4

जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी द्या; शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.