ISI Spy Arrested: ७ वर्षांची सेवा आणि देशाशी गद्दारी! नौदलाचा सैनिकच निघाला ISIचा गुप्तहेर निघाला
मिळालेल्या माहितीनुसार, अटक केलेला आरोपी आदर्श कुमार उर्फ लकी हा आग्रा येथील कागरौल परिसरातील चित गावचा रहिवासी आहे. तो गेल्या सात वर्षांपासून भारतीय नौदलात सेवा करत आहे.सध्या केरळमधील कोची येथील दक्षिण नौदल कमांडमध्ये लान्स नाईक म्हणून तैनात आहे. गेल्या महिन्यातच, फेब्रुवारीमध्ये त्याने मथुरा येथील एका तरूणीशी लग्न केले. लग्नानंतर, तो हनिमूनसाठी दुबईला गेला होता. हनिमूननंतर पत्नीसह दोन दिवसांपूर्वीच तो गावी परतला होता. पण गेल्या काही महिन्यांपासून सुरक्षा यंत्रणा त्याच्या प्रत्येक हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून होती. तो गावात पोहोचताच, यूपी एटीएसने त्याला अटक केली आणि १० मार्च २०२६ रोजी न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला तुरुंगात पाठवले.
IndiGo मध्ये मोठी उलथापालथ! CEO Pieter Elbers यांचा तडकाफडकी राजीनामा
काही काळापासून तपास यंत्रणांना आग्र्यातून कोणीतरी पाकिस्तानमधील हँडलर्सशी संपर्क साधून देशाची धोरणात्मक माहिती लीक करत असल्याची माहिती मित होती. एटीएसने इलेक्ट्रॉनिक आणि भौतिक देखरेखीद्वारे सापळा रचला त्यावेळी आदर्श कुमारचे नाव संशयित म्हणून समोर आले.
आदर्शच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा विचार करता, त्याचे वडील बलवीर सिंग दारू कंत्राटदार म्हणून काम करतात. तो तीन बहिणींमध्ये सर्वात धाकटा मुलगा होता आणि संपूर्ण कुटुंबाला त्याचा अभिमान होता. सात वर्षांपूर्वी तो नौदलात सामील झाला तेव्हा गावात आनंदाचे वातावरण होते, परंतु आज तेच गावाने त्याला देशद्रोही म्हणत आहे.
एटीएस (ATS) अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपी आदर्श कुमारने केवळ गोपनीय कागदपत्रेच शेअर केली नाहीत तर तो पाकिस्तानी नेटवर्कला सहकार्य करत होता. त्याने अनेक देशविरोधी कारवायांमध्येही सहभागी असल्याचे आढळून आले. त्याच्याकडून अनेक इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त करण्यात आले आहेत. या पुराव्यांच्या माध्यमातून त्याच्या देशविरोधी हालचांली सिद्ध होत आहेत. त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
या अटकेनंतर, उत्तर प्रदेश एटीएस आता आदर्श ज्या संपूर्ण नेटवर्कशी संबंधित होता त्याची चौकशी करत आहे. सुरक्षा संस्थांसाठी एक सैनिक शत्रू एजंटच्या जाळ्यात कसा अडकला, हा एक मोठा चिंतेचा विषय बनला आहे. या हेरगिरी प्रकरणात नौदलातील किंवा इतर विभागातील इतर व्यक्तींचा सहभाग आहे का याचाही तपास सुरू आहे. आरोपीचे संपर्क आणि बँक खात्यांची कसून तपासणी केली जात आहे, त्याला आतापर्यंत किती पैसे मिळाले आहेत आणि त्याने किती मोठे कट रचले, यासंबंधीची माहिती मिळवली जात आहे.






