Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati News: परतवाडा महामार्गाचे चौपदरीकरण करा! अरुंद रस्ता, वाढती वर्दळ आणि वाढत्या अपघातांचा धोका कायम

वाढत्या वाहनसंख्येच्या तुलनेत रस्त्याची रुंदी अपुरी पडत असल्याने वाहनचालकांना अनेकदा धोकादायक पद्धतीने ओव्हरटेक करावे लागते. परिणामी, अपघातांचा धोका वाढत असल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे. या मार्गावर वारंवार होणारे अपघात अनेक कुटुंबांसाठी वेदनादायी ठरत आहेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 01, 2026 | 02:30 PM
परतवाडा महामार्गाचे चौपदरीकरण करा! अरुंद रस्ता, वाढती वर्दळ आणि वाढत्या अपघातांचा धोका कायम

परतवाडा महामार्गाचे चौपदरीकरण करा! अरुंद रस्ता, वाढती वर्दळ आणि वाढत्या अपघातांचा धोका कायम

Follow Us
Follow Us:

अमरावती जिल्ह्यातील सर्वाधिक वर्दळीच्या आणि महत्त्वाच्या अमरावती-परतवाडा महामार्गावर वाढत्या वाहतुकीमुळे अपघातांचा धोका वाढत आहे. रस्ता अरुंद पडत असल्याने या महामार्गाचे तातडीने चौपदरीकरण करून वाहतूक सुरक्षित व सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. जिल्ह्यातील अध्यपिक्षा अधिक वाहतुकीचा भार झेलणारा आणि सर्वाधिक वर्दळीचा मार्ग म्हणून अमरावती-परतवाडा मुख्य रस्त्याची ओळख आहे. जिल्ह्यातील बहुतांश प्रमुख रस्त्यांचे चौपदरीकरण झाले असताना, अमरावती-परतवाडा मार्ग मात्र अद्याप विकासापासून कोसो दूर असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.(फोटो सौजन्य – AI)

Amravati New: सर्वेक्षणाच्या नादात शिक्षकच झाले शाळाबाह्य! शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षणही करावे लागणार; मनस्ताप कायम

वाढत्या वाहतूक भाराच्या तुलनेत हा रस्ता अरुंद पडत असून, अपघातांच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याने या महामार्गाचे तातडीने चौपदरीकरण करण्यात यावे, अशी मागणी जोर आहे. अमरावती परतवाडा मार्गावरून दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, चांदूर बाजार, चिखलदरा, धारणी तसेच धारणी मध्यप्रदेशाकडे जाणाऱ्या वाहनांची दिवसरात्र मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या मार्गावरून प्रवासी वाहतूक, मालवाहतूक तसेच खासगी वाहनांची सतत ये-जा सुरू असते. मेळघाट व मध्यप्रदेशाला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने या रस्त्याचे वाहतुकीच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. या महामार्गावर वलगाव, आसेगाव आणि पूर्णा नगर यांसारख्या मोठ्या लोकसंख्येच्या गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये स्थानिक वाहतूक, पादचारी, दुचाकीस्वार तसेच प्रवासी वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, वाढत्या वाहनसंख्येच्या तुलनेत रस्त्याची रुंदी अपुरी पडत असल्याने वाहनचालकांना अनेकदा धोकादायक पद्धतीने ओव्हरटेक करावे लागते. परिणामी, अपघातांचा धोका वाढत असल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे. या मार्गावर वारंवार होणारे अपघात अनेक कुटुंबांसाठी वेदनादायी ठरत आहेत.

शासनाने तातडीने सर्वेक्षण करावे :

या महत्त्वपूर्ण मार्गाची वाहतूक क्षमता, अपघातप्रवण ठिकाणे आणि भविष्यातील वाहनवाढ लक्षात घेऊन शासनाने तातडीने सर्वेक्षण करावे. आवश्यक निधी मंजूर करून चौपदरीकरणाच्या कामाला गती द्यावी, अशी मागणी प्रवासी, वाहनचालक, व्यापारी, स्थानिक नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.

‘रूफटॉप सोलर’ने उजळणार गरिबांचे घर! २५०० रुपयात वीजबिलातून सुटका; अतिरिक्त वीज विकून उत्पन्नाचीही संधी

अपघातात एखादा जीव गमावल्यास त्याची भरपाई कोणत्याही विकासकामातून होऊ शकत नाही. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर संबंधित कुटुंबावर आर्थिक व मानसिक संकट कोसळते. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी रस्त्याच्या विकासाला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना ब्रिटिशकालीन वृक्ष मोठ्या प्रमाणात असून, त्यापैकी काही वृक्ष जीर्ण व धोकादायक झाले आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Demand for four laning of paratwada highway grows as narrow roads and rising traffic increase accident risk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • Amaravati
  • Bad Road
  • maharashtra

संबंधित बातम्या

साखर आयुक्तालयाचा सहकारी साखर कारखान्यांना दणका; केवळ ऊस पुरवठ्यावर सभासदत्व देता येणार नाही
1

साखर आयुक्तालयाचा सहकारी साखर कारखान्यांना दणका; केवळ ऊस पुरवठ्यावर सभासदत्व देता येणार नाही

गणेशम फेज २ सोसायटीत आग, दोन चिमुरड्यांची सुखरूप सुटका; मोठा अनर्थ टळला
2

गणेशम फेज २ सोसायटीत आग, दोन चिमुरड्यांची सुखरूप सुटका; मोठा अनर्थ टळला

Water Storage Crisis: पाणीटंचाईचे संकट गडद! धरणे-तलाव कोरडे; २२६ पैकी केवळ ५ प्रकल्पांत ५० टक्क्यांहून अधिक साठा
3

Water Storage Crisis: पाणीटंचाईचे संकट गडद! धरणे-तलाव कोरडे; २२६ पैकी केवळ ५ प्रकल्पांत ५० टक्क्यांहून अधिक साठा

विसर्जनप्रसंगी विद्यार्थ्यांवर काळाने घातला घाला; दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
4

विसर्जनप्रसंगी विद्यार्थ्यांवर काळाने घातला घाला; दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.