• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Raigad »
  • Karjat News Accident Season Is Not Over Death Trap Is Becoming On Karjat Kalyan State Highway

Karjat News : अपघाताचं सत्र संपता संपेना; कर्जत-कल्याण राज्यमार्गावर होतोय मृत्यूचा सापळा

कर्जत-कल्याण राज्यमार्गावर नेरळ पोलीस ठाण्याजवळ असलेल्या पुलावर एक भीषण अपघात घडला आहे. दिवसेंदिवस हा राज्यमार्ग मृत्यूचा सापळा होत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 01, 2026 | 03:08 PM
Karjat News : अपघाताचं सत्र संपता संपेना; कर्जत-कल्याण राज्यमार्गावर होतोय मृत्यूचा सापळा
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • अपघाताचं सत्र संपता संपेना
  • कर्जत-कल्याण राज्यमार्गावर होतोय मृत्यूचा सापळा
 
कर्जत/ संतोष पेरणे : कर्जत-कल्याण राज्यमार्गावर नेरळ पोलीस ठाण्याजवळ असलेल्या पुलावर एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात नेरळ येथील मोहाची वाडी येथील रहिवासी चंद्रकांत ऐनकर वय वर्ष ४५ यांचा जागीच मृत्यू झाला. ऐन होळीच्या सणादरम्यान ही दुर्घटना घडल्याने संपूर्ण नेरळ परिसरात शोककळा पसरली आहे.अपघात घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत ऐनकर हे आपल्या दुचाकीवरून नेरळ बाजारपेठेत काही वस्तूंच्या खरेदीसाठी गेले होते. बाजारातील काम आटोपून ते पुन्हा आपल्या घराकडे परतत असताना, नेरळ पोलीस ठाण्याजवळील पुलावर त्यांच्या दुचाकीची फुलाला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, चालक ऐनकर पुलावरून खाली कोसळले. या गंभीर दुखापतीमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच नेरळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावून ऐनकर यांना तात्काळ उपचारासाठी रायगड हॉस्पिटल येथे हलवले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघातामुळे कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील रस्त्यांच्या नियोजनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.राज्यमार्गाचे रुंदीकरण काही ठिकाणी झाले आहे, तर काही ठिकाणी रस्ता अत्यंत अरुंद आहे. यामुळे वाहनचालकांचा गोंधळ उडतो. नेरळ पोलीस ठाण्याजवळील पूल दोन विभागांत विभागलेले आहेत, मात्र त्यांना जोडणारा रस्ता एक पदरी आहे. दोन पूल आणि त्यांना जोडणारा हा अरुंद रस्ता वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरत आहे. याच तांत्रिक त्रुटीमुळे चंद्रकांत ऐनकर यांचा अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Karjat News : पोशीर धरणाला विरोध कायम ; जमिनीसाठी शेतकऱ्यांनी घेतला आक्रमक पवित्रा

काही दिवसांपूर्वी देखील कर्जत चौक येथे भीषण अपघात झाला होता. येथून चौक कडे जाणाऱ्या एर्टिगा गाडीला समोरून येणाऱ्या एसटी गाडीने जोरदार धडक दिली.रस्त्याच्या मधोमध एसटीने ईटीका गाडीला धडक दिल्याने त्या अपघात ग्रस्त गाडीचे चालक आणि सोबत असलेले कामगार गंभीर जखमी झाले . नेरळ येथे राहणारा रिंकू सिंग आपल्या कामगाराला सोबत घेऊन वांगणी येथून चौक कडे चालला होता.त्यांची एम एच ०५ इ ए ५७१३ इर्टिका जीप घेऊन कर्जत चौक रस्त्याने चौककडे जात होती.वांगणी येथून कल्याण कर्जत रस्त्याने कर्जत आणि पुढे कर्जत चौक रस्त्याने जात असताना पनवेल येथून कर्जतकडे येणारी एसटी गाडी एम एच २० बी एल ३६२५ ही एसटी गाडी रिंकू सिंग यांच्या गाडीवर आदळली. ओव्हरटेक करीत असताना ही एसटी गाडी इर्टिका गाडीवर आदळली होती आणि त्यावेळी अपघात झाला होता.या अपघातात गाडीचे चालक गंभीर दुखापतग्रस्त झाल्याने रायगड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले गेले.तेथे उपचार घेऊन पुढील उपचारासाठी पनवेल येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. पण रिंकू सिंग यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने त्यांचे नातेवाईक यांनी त्यांना मुंबई येथील केईएम रुग्णालयात हलवले.तेथे रिंकू सिंग यांच्यावर उपचार सुरू होते,मात्र 19 फेब्रुवारी च्या रात्री अपघातानंतर दहाव्या दिवशी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे हे राज्यमार्ग दिवसेंदिवस अपघाताचा सापळा होत आहेत.

Karjat News : अखेर ‘स्वच्छता अभियान’ यशस्वी; गावकऱ्यांच्या श्रमदानाने तालुका झाला कचरा मुक्त

Web Title: Karjat news accident season is not over death trap is becoming on karjat kalyan state highway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 03:06 PM

Topics:  

  • karjat news
  • navarshtra news
  • Raigad News

संबंधित बातम्या

Karjat News : अखेर ‘स्वच्छता अभियान’ यशस्वी; गावकऱ्यांच्या श्रमदानाने तालुका झाला कचरा मुक्त
1

Karjat News : अखेर ‘स्वच्छता अभियान’ यशस्वी; गावकऱ्यांच्या श्रमदानाने तालुका झाला कचरा मुक्त

Karjat News : पोशीर धरणाला विरोध कायम ; जमिनीसाठी  शेतकऱ्यांनी घेतला आक्रमक पवित्रा
2

Karjat News : पोशीर धरणाला विरोध कायम ; जमिनीसाठी शेतकऱ्यांनी घेतला आक्रमक पवित्रा

Karjat News : प्रस्तावित शिलार धरण हद्दपार करणारच; आक्रमक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांचा निर्धार
3

Karjat News : प्रस्तावित शिलार धरण हद्दपार करणारच; आक्रमक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांचा निर्धार

Karjat News : भविष्यात शेतीच देशाला तारणार ; जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मयांक गांधी यांचं वक्तव्य
4

Karjat News : भविष्यात शेतीच देशाला तारणार ; जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मयांक गांधी यांचं वक्तव्य

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Nashik News : कथित कंटेनर लुटीचा तपास CIDकडे, ग्रामीण दलालाला बसणार झटका?; पोलिस महासंचालकांचा मोठा निर्णय

Nashik News : कथित कंटेनर लुटीचा तपास CIDकडे, ग्रामीण दलालाला बसणार झटका?; पोलिस महासंचालकांचा मोठा निर्णय

Mar 01, 2026 | 04:57 PM
माळेगाव कारखाना क्रमांक एकचा करण्याचे अजित दादांचे स्वप्न पूर्ण करू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आश्वासन

माळेगाव कारखाना क्रमांक एकचा करण्याचे अजित दादांचे स्वप्न पूर्ण करू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आश्वासन

Mar 01, 2026 | 04:51 PM
Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Mar 01, 2026 | 04:50 PM
Delhi Crime: महिलेने आधी लिव्ह इन पार्टनरला दुधातून गुंगीचे औषध दिलं, नंतर गुप्तांग कापलं…; नेमकं प्रकरण काय?

Delhi Crime: महिलेने आधी लिव्ह इन पार्टनरला दुधातून गुंगीचे औषध दिलं, नंतर गुप्तांग कापलं…; नेमकं प्रकरण काय?

Mar 01, 2026 | 04:48 PM
एमबीएसाठी १. ८० लाख परीक्षार्थी! अर्जातील दुरुस्तीसाठी २८ फेब्रु. ते २ मार्चदरम्यान सुविधा

एमबीएसाठी १. ८० लाख परीक्षार्थी! अर्जातील दुरुस्तीसाठी २८ फेब्रु. ते २ मार्चदरम्यान सुविधा

Mar 01, 2026 | 04:40 PM
Mumbai News :  मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mumbai News : मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mar 01, 2026 | 04:32 PM
Nashik News : महानिर्मिती-एनटीपीसी लिमिटेडची संयुक्त मोहीम;15 गिगावॅटकडे राज्याची झेप

Nashik News : महानिर्मिती-एनटीपीसी लिमिटेडची संयुक्त मोहीम;15 गिगावॅटकडे राज्याची झेप

Mar 01, 2026 | 04:27 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Mar 01, 2026 | 03:34 PM
Virar :  जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Mar 01, 2026 | 03:31 PM
Sunil Tatkare On Rohit Pawar : भाजपकडे तिकीट मागायला कोण गेलं होतं? तटकरेंची रोहित पवारांवर टीका

Sunil Tatkare On Rohit Pawar : भाजपकडे तिकीट मागायला कोण गेलं होतं? तटकरेंची रोहित पवारांवर टीका

Feb 28, 2026 | 07:59 PM
Dhule News :  मध्यवर्ती बस स्थानक येथील नोंदणी कक्षाच्या बाहेर ज्येष्ठ नागरिकांच्या लांबच लांब रांगा

Dhule News : मध्यवर्ती बस स्थानक येथील नोंदणी कक्षाच्या बाहेर ज्येष्ठ नागरिकांच्या लांबच लांब रांगा

Feb 28, 2026 | 07:53 PM
Sangli : मानाच्या गदा शासनाला परत करत, आझाद मैदानावर आंदोलनाचा ज्येष्ठ मल्लांचा इशारा

Sangli : मानाच्या गदा शासनाला परत करत, आझाद मैदानावर आंदोलनाचा ज्येष्ठ मल्लांचा इशारा

Feb 28, 2026 | 07:48 PM
Kolhapur Marathi School News राज्यातील एकही मराठी शाळा शाळा बंद करु देणार नाही,तीव्र लढा उभारला जाईल

Kolhapur Marathi School News राज्यातील एकही मराठी शाळा शाळा बंद करु देणार नाही,तीव्र लढा उभारला जाईल

Feb 28, 2026 | 07:43 PM
Latur Crime News : विविध भागात दहशत माजवत, गाड्यांची तोडफोड घरांवर केली होती दगडफेक

Latur Crime News : विविध भागात दहशत माजवत, गाड्यांची तोडफोड घरांवर केली होती दगडफेक

Feb 28, 2026 | 07:36 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.