Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: सुपारीच्या बागा करपल्या, कच्ची फळे गळाली; तीव्र उष्णतेने बागायतदार संकटात, पंचनामे करून मदत देण्याची मागणी

ऑक्टोबर हीटमुळे उत्पादनाबाबतची चिंता वाढली आहे. यंदाच्या तीव्र उन्हामुळे सुपारीचे घोस करपून जाणे आणि कच्ची फळे गळून पडण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे फळबाग मालकांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 24, 2026 | 02:04 PM
Raigad News: सुपारीच्या बागा करपल्या, कच्ची फळे गळाली; तीव्र उष्णतेने बागायतदार संकटात, पंचनामे करून मदत देण्याची मागणी

Raigad News: सुपारीच्या बागा करपल्या, कच्ची फळे गळाली; तीव्र उष्णतेने बागायतदार संकटात, पंचनामे करून मदत देण्याची मागणी

Follow Us
Follow Us:
  • ऑक्टोबर हीटमुळे उत्पादनाबाबतची चिंता वाढली
  • पाण्याची कमतरता निर्माण झाल्याने सुपारीच्या झाडांवरील कच्ची फळे मोठ्या प्रमाणावर गळून पडली
  • पात्र बागायतदारांना आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी
अलिबाग: रायगड जिल्ह्यात यंदा मे आणि जून महिन्यांत जाणवलेल्या तीव्र उष्णतेचा मोठा फटका सुपारीच्या बागांना बसला आहे. तापमानाचा पारा चाळीस अंशांच्या आसपास पोहोचल्याने आणि पाण्याची कमतरता निर्माण झाल्याने सुपारीच्या झाडांवरील कच्ची फळे मोठ्या प्रमाणावर गळून पडली आहेत.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पाणी टंचाईचा बसतोय मोठा फटका; दुष्काळाच्या चाहुलीने शेतकरी धास्तावले

काही भागांत ५० ते ७० टक्क्यांपर्यंत फळगळ झाल्याचा अंदाज बागायतदारांनी व्यक्त केला आहे. त्यातच ऑक्टोबर हीटमुळे उत्पादनाबाबतची चिंता वाढली असून, भविष्यात अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळेही सुपारी उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक भरपाई द्यावी, अशी मागणी अलिबाग तालुका नारळ सुपारी प्रक्रिया सहकारी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.  (फोटो सौजन्य – AI Created) 

अलिबागसह रायगड जिल्ह्यातील कोकण किनारपट्टीवर सुपारी हे बागायतदारांचे महत्त्वाचे नगदी पीक आहे. वर्षभर बागांची निगा राखणे, खते देणे, औषध फवारणी करणे आणि पाणीपुरवठा यासाठी बागायतदार मोठा खर्च करतात. मात्र, यंदाच्या तीव्र उन्हामुळे सुपारीचे घोस करपून जाणे आणि कच्ची फळे गळून पडण्याचे प्रकार वाढले आहेत. परिणामी, अपेक्षित उत्पन्न कमी होण्याची शक्यता आहे आणि फळबाग मालकांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे.

कृषी विभागाने बाधित क्षेत्राचे तातडीने सर्वेक्षण करून नुकसानीची नोंद घ्यावी आणि पात्र बागायतदारांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. बदलते हवामान, चक्रीवादळे, वाढते तापमान आणि पाण्याची अनिश्चित उपलब्धता यामुळे या बागा टिकवून ठेवणे आणि त्यातून अपेक्षित उत्पादन घेणे दिवसेंदिवस कठीण होत आहे.

नुकसानीचे पंचनामे करावेत

वर्षभर मेहनत करून सुपारीचे पीक हातातोंडाशी आले असताना तीव्र उन्हामुळे मोठ्या प्रमाणावर फळगळ झाली आहे. त्यामुळे बागायतदारांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. शासनाने या परिस्थितीची तातडीने दखल घेऊन नुकसानीचे पंचनामे करावेत आणि बागायतदारांना नुकसानभरपाई द्यावी. – रमेश नाईक, अध्यक्ष, सुपारी संस्था

Drought Affected Students : दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! आता परीक्षा अर्जासाठी ‘झिरो चलन’ सुविधा

चक्रीवादळांनीही सुपारी बागांचे कंबरडे मोडले

रायगडमधील सुपारी उत्पादकांना गेल्या काही वर्षांत निसर्ग चक्रीवादळ आणि त्यानंतरच्या तौवते चक्रीवादळाचा मोठा फटका बसला होता. विशेषतः श्रीवर्धन, मुरूड आणि अलिबाग तालुक्यांतील अनेक सुपारी बागांचे नुकसान झाले. वादळाच्या तडाख्यात सुपारीची हजारो झाडे उन्मळून पडली, तर काही बागा उद्धवस्त झाल्या. त्यामुळे सुपारी उत्पादनावर दीर्घकालीन परिणाम झाला आहे. या नुकसानीतून सावरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच आता तीव्र उष्णता आणि पाण्याच्या कमतरतेमुळे बागायतदारांसमोर नवे संकट उभे राहिले आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Extreme heat damages areca nut plantations in raigad fruit loss estimated at 70 percent hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 02:04 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Chandrapur News: शाळेला लागून जंगल, संरक्षण भिंत चार वर्षांपासून अपूर्ण; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
1

Chandrapur News: शाळेला लागून जंगल, संरक्षण भिंत चार वर्षांपासून अपूर्ण; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Chandrapur News: चंद्रपुरात पाणीटंचाईचे संकट! वर्धा नदीतील पाणीसाठा घटल्याने चिंता, जलसंकटावर कायमस्वरूपी उपायाची गरज
2

Chandrapur News: चंद्रपुरात पाणीटंचाईचे संकट! वर्धा नदीतील पाणीसाठा घटल्याने चिंता, जलसंकटावर कायमस्वरूपी उपायाची गरज

पारावरच्या आणि चावडीवरच्या गोष्टींना एवढे महत्त्व का? छगन भुजबळ यांचे वक्यव्य
3

पारावरच्या आणि चावडीवरच्या गोष्टींना एवढे महत्त्व का? छगन भुजबळ यांचे वक्यव्य

Housing Problems: उपोषणे झाली, आश्वासनेही मिळाली; तरी टाटा कंपनीकडून ना जमीन, ना घरे! तापकीरवाडीतील आदिवासींच्या समस्या कायम
4

Housing Problems: उपोषणे झाली, आश्वासनेही मिळाली; तरी टाटा कंपनीकडून ना जमीन, ना घरे! तापकीरवाडीतील आदिवासींच्या समस्या कायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.