Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अडीच कोटींच्या देवळी ते भोरस रस्त्याचे तीनतेरा! वर्षभरातच पडले रस्त्यावर भलेमोठे खड्डे

अडीच कोटी खर्च करून तयार करण्यात आलेला तालुक्यातील देवळी ते भोरस या चार किलो मीटरच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. यामुळे प्रशासनावर नाराजी व्यक्त झाली.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 31, 2025 | 02:47 PM
Deoli to Bhoras bad road Potholes in Chalisgaon constructed at a cost of Rs. 2.5 crore

Deoli to Bhoras bad road Potholes in Chalisgaon constructed at a cost of Rs. 2.5 crore

Follow Us
Close
Follow Us:

Jalgaon Road Condition: चाळीसगाव: अडीच कोटी खर्च करून तयार करण्यात आलेला तालुक्यातील देवळी ते भोरस या चार किलो मीटरच्या रस्त्याचे तीन तेरा वाजले आहेत. वर्षभरातच या रस्त्यावर भलेमोठे खड्डे पडले. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच रस्त्यावरील दोन ठिकाणी असलेल्या नाल्यांवर फरशीच बसवण्यात आली नसल्याने वाहनधारकांना तसेच शेतकऱ्यांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे.

देवळी ते भोरस रस्त्याचे अंदाज पत्रकाप्रमाणे काम झालेले नाही. अडीच कोटींचा रस्ता तयार करताना साधी फरशी बसवण्याची तसदी घेण्यात आली नाही. त्यामुळे हा रस्ता पावसाळ्यात एक प्रकारे पाण्यातच असल्याचे दिसून येते. यासंबंधी चाळीसगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगून देखील ते याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या देवळी ते भोरस रस्त्याची सुधारणा करणे प्राजिमा १४३ किमी १६/२०० ते २०/६०० हा रस्ता गेल्यावर्षी तयार करण्यात आला. त्यासाठी २.५० लाख रूपये खर्च झाले.
नाशिकच्या वैष्णवी इंफ्रा. कंपनीने हे काम केल्याचे सांगण्यात येते. मात्र प्रत्यक्षात या कामाचा आणि रस्त्याचे तीन तेरा वाजले आहेत.

तरवाडे, न्हावे, ढोमणे, करगाव, लांबवडगाव भागातील नागरीकांना मालेगाव, पिलखोड, देवळी, टाकळी प्र. दे. कडे जाण्यासाठी हा रस्ता अत्यंत सोईचा आणि वेळेची बचत करणारा रस्ता आहे, त्यामुळे या रस्त्यावर दिवसभर वर्दळ असते. त्याशिवाय देवळी, चिंचखेडे, भोरस या भागातील शेतकऱ्यांना दैनंदिन शेतात ये-जा करण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

खाऱ्या नाल्यावर फरशी नाही…

आमदार मगेश चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून या रस्त्याचे काम गेल्या वर्षीं झाल्याने शेतकऱ्याऱ्यांसह पंचक्रोशीतील नागरिकांची मोठी सोय झाल्याने समाधान व्यक्त होत असले तरी या रस्त्यावर खाप्य नाला व अन्य एका ठिकाणच्या नाल्यावर फरशीच बसविण्यात आली नाही. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकानी गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागते. लागत ऑक्टोबरमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील खाऱ्या नात्याला कायम पाणी असते. पावसाळ्यात तर पुरामुळे काही दिवस वाहतूक ठप्प पडली होती.

रस्त्याच्या गुणवत्तेबाबत बोंबाबोंब…

  • सुमारे अडीच कोटी रूपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या या रस्त्याच्या गुणवत्तेबाबत बोंबाबोंब दिसून येते.
  • वर्षभरातच रस्त्यावर खड्डे पडू लागले आहे. त्यामुळे रस्त्याच्या दर्जाबाबत सांशकता व्यक्त होत आहे.
  • भोरस गावाकडे जाणाऱ्या मार्गावर एका ठिकाणी भले मोठे खड्डे पडले आहे. पाच महिन्यापासून हा प्रकार नित्याचाच झाला आहे.
  • या रस्त्याच्या कामावर खर्च झालेले अडीच कोटी रूपये पाण्यात गेले की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: Deoli to bhoras bad road potholes in chalisgaon constructed at a cost of rs 25 crore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 02:47 PM

Topics:  

  • daily news
  • Jalgaon News

संबंधित बातम्या

गुटका, पान अन् चैनीपासून कधी मिळणार सुटका? भिंतीवर थुंकणाऱ्यांचे आधी गाल रंगवा
1

गुटका, पान अन् चैनीपासून कधी मिळणार सुटका? भिंतीवर थुंकणाऱ्यांचे आधी गाल रंगवा

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत “मिशन स्वाभिमान”; विशेष कर संकलन करणाऱ्या ग्रामपंचायतीचा विशेष सन्मान
2

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत “मिशन स्वाभिमान”; विशेष कर संकलन करणाऱ्या ग्रामपंचायतीचा विशेष सन्मान

सरकारी नोकऱ्यांच्या भत्यामध्ये वाढ; मात्र त्याने उत्पादकता वाढणार का? मोठा प्रश्न निर्माण
3

सरकारी नोकऱ्यांच्या भत्यामध्ये वाढ; मात्र त्याने उत्पादकता वाढणार का? मोठा प्रश्न निर्माण

ST Bus: दिवाळीत धुळे विभागाला ‘लक्ष्मी’ पावली! लालपरीची तब्बल ४ कोटी ३१ लाखांची बंपर कमाई
4

ST Bus: दिवाळीत धुळे विभागाला ‘लक्ष्मी’ पावली! लालपरीची तब्बल ४ कोटी ३१ लाखांची बंपर कमाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.