 
        
        जळगाव महापालिकेतर्फे प्रभाग रचनेची प्रारूप मतदार यादी जाहीर होणार असून हरकतींसाठी मुदत देण्यात आली (फोटो - सोशल मीडिया)
जळगाव: प्रभागनिहाय प्रारूप यादी ६ नोव्हेंबर रोजी होईल जाहीर होणार आहे. प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी महापालिकेतर्फे लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. यात नागरिकांची घरे दुसऱ्या प्रभागात गेली असल्यास प्रत्येकांनी वैयक्तिक ताक्रार करणे गरजेचे असल्याची माहिती महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी दिली आहे. महापालिकेतर्फे प्रभाग रचनेची प्रारूप मतदार यादी ६ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यावरील हरकती व सूचना मागणविण्यात येणार आहेत, त्याबाबतचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला आहे.
महानगरपालिकच्या मतदार यादींचा कार्यक्रम खालीलप्रमाणे
मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक ९ जुलै २०२५, १४ ऑक्टोबर २०२५ महापालिकेने निवडणूक आयोगांना दिलेल्या युजर आयडी व पासवर्डचा वापर करून १ जुलै २०२५ रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार याद्या राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईडवरून डाऊनलोड करणे, ६ नोव्हेंबर २०२५ राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या तारखेस अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवरून महानगरपालिकाच्या सार्वत्रिक निवडणुकीकरता तयार केलेली प्रारूप मतदार यादी. हरकती व सूचना मागविण्यासाठी प्रसिध्दी, १४ नोव्हेंबर २०२५ प्रारूप मतदार यादीवरील हरकती व सूचना दाखल करण्याचा अंतिम तारीख ही २८ नोव्हेंबर २०२५ असणार आहे. प्रारूप मतदार यादीवरीत दाखल हरकतीवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करून प्रसिध्द करण्यासाठी ४ डिसेंबर २०२५ ही ताराखी असणार आहे, मतदान केंद्राच्या ठिकाणचे यादी प्रसिध्द करणे, १० डिसेंबर २०२५ मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिध्द करणे असा कार्यक्रम असणार आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ग्रुपने आलेल्या हरकती स्वीकारल्या जाणार नाहीत
प्रभाग रचनेची मतदार यादी जाहीर झाल्यानंतर काही नागरिकांची दुसऱ्या प्रभागात नावे गेल्याच्या तक्रारी असतील त्यांनी ती वैयक्तिक स्वरूपात देण्याची गरज आहे. जर एखाद्या गल्लीतील दहा घरे दुसऱ्या प्रभागातील गेले असतील तर दहा घरांतील नागरिकांना ग्रुपने तक्रार करता येणार नाही. प्रत्येकाने वैयक्तिक तक्रार करण्याची आहे. या मागचे कारण सांगतांना त्यांनी स्पष्ट केले की, प्रत्येक नागरिकाला आपल्या प्रभागांमध्ये वैयक्तिक बोलावून त्यांच्या हरकतीची सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना आपले मत मांडणे सोयीस्कर होईल, व त्यांच्या कारीची सुनावणीही योग्य प्रकारे होईल.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
५१० मतदार केंद्रासाठी १६६ इमारतीची आयुक्तांकडून पाहणी
महापालिकेच्या निवडणूकीसाठी सुविधाचा अभाव असणारी मतदान केंद्र बदलण्यात येणार आहेत. अशी माहिती महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी दिली. महापालिका निवडणूकीसाठी जळगाव शहरात तब्बल ५१० मतदान केंद्र आहेत. त्यासाठी तब्बल १६६ इमारतीची पाहणी आयुक्तांनी केली आहे. मतदान केंद्राबाबत काही सूचनाही दिलेल्या आहेत.
महापालिका आयुक्तांनी केलेल्या पाहणीदरम्यान काही मतदान केंद्रांची दुरावस्था लक्षात घेता अतिरीक्त १०० केंद्र हे राखीव म्हणून निवडण्यात आले आहे. मतदान केंद्रावरील सुविधांचा आढावा या पाहणीदरम्यान मतदान केंद्रावरील सुविधांचा आढावा देखील घेण्यात आला आहे.






