Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं आश्वासन, म्हणाले; निवडणुका संपताच…

निवडणुका होताच युवा प्रशिक्षणार्थीचा प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 25, 2025 | 05:01 PM
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं आश्वासन, म्हणाले; निवडणुका संपताच...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं आश्वासन, म्हणाले; निवडणुका संपताच...

Follow Us
Close
Follow Us:
  • निवडणुका संपताच युवा प्रशिक्षणार्थीचा प्रश्न मार्गी लावणार
  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं आश्वासन
  • पाठपुरावा करून तरुणांच्या हाताला रोजगार देऊ – शहाजी पाटील
जत : राज्यातील लाडका भाऊ म्हणत राज्य शासनाने एक लाख ३४ हजारांहून अधिक तरुणांच्या हाताला मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी माध्यमातून रोजगार दिला. पण आज ११ महिने झाले, मुदत संपली म्हणून त्यांना घरचा रस्ता दाखविला आहे. त्या तरुणांवर, त्यांच्या कुटूंबियावर उपासमारीची वेळ आली आहे. तेव्हा त्यांना पुन्हा कामावर रुजू करून घ्यावे, अशी कळकळीची मागणी चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती तथा श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा ह.भ.प. तुकाराम बाबा महाराज यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. शिंदे यांनी त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत निवडणुका होताच युवा प्रशिक्षणार्थीचा प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही दिली.

युवा प्रशिक्षणार्थीच्या न्याय, हक्कासाठी मागील वर्षभरापासून ह.भ.प. तुकारामबाबा महाराज यांनी संपूर्ण महाराष्ट्रात लढा उभारला आहे. मुंबईचे आझाद मैदानावर ठिय्या मांडला, हजारो युवा प्रशिक्षणार्थीना सोबत घेत मुंबईच्या आझाद मैदानावर लक्षवेधी छत्री आंदोलन केले. सांगली येथील आझाद मैदानावर आंदोलन केले, पुणे जिल्ह्यातील देहू येथील तुकाराम महाराज यांच्या ज्या इंद्रायणी डोहात गाथा बुडविल्या होत्या तेथून युवा प्रशिक्षणार्थीच्या मागण्यासाठी पायी दिंडी सुरू केली. तुकाराम बाबांच्या या दिंडी आंदोलनाने शासनाचे लक्ष वेधून घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील एक लाख ३४ हजार युवा प्रशिक्षणार्थीना पाच महिन्यांची मुदतवाढ दिली व तसा अध्यादेश जारी केला. ह.भ.प. तुकाराम बाबा महाराज यांच्या आंदोलनाचे हे मोठे यश मानले जाते. त्यांच्यामुळे पाच महिन्यांची मुदतवाढ मिळाली पण पुढे काय हा मुख्य प्रश्न होता.

विविध मार्गे आंदोलन, ३६ जिल्ह्यांचा दौरा

तुकाराम बाबांनी पुन्हा आंदोलन हाती घेत ३६ जिल्ह्यांचा दौरा केला. तसेच युवा प्रशिक्षणार्थी संघटित केले. सांगलीच्या कृष्णामाई घाटावर आमरण उपोषण, अन्नत्याग आंदोलन सुरू केले. पाच दिवस सांगलीतील स्टेशन चौकात अन्नत्याग आंदोलन सुरू होते. नोव्हेंबरच्या सुरुवातीला नाशिक येथील गोदावरी घाटावर आमरण उपोषण सुरू केले. नुकतेच त्यांनी माजी आमदार शहाजी पाटील यांच्या उपस्थितीत या योजनेचे जनक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सांगोल्यात भेट घेत निवेदन दिले.

पाठपुरावा करून तरुणांच्या हाताला रोजगार देऊ – शहाजीबापू पाटील

राज्यातील युवकांना प्रशिक्षण मिळाले पण त्यांच्यावर पुन्हा ११ महिन्याची मुदत संपल्याने बेरोजगारांची कुऱ्हाड कोसळली आहे. माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ही योजना सुरू झाली. लाखो तरुणांना रोजगार व आत्मविश्वास वाढला. या तरुणाईने महायुतीला भक्कम साथ दिली आहे तेव्हा त्यांना वाऱ्यावर सोडणे बरोबर नाही. ही योजना पुन्हा सुरू व्हावी यासाठी पाठपुरावा करून तरुणांचा हाताला रोजगार मिळवून देणारच असल्याचे सांगोल्याचे माजी आमदार तथा शिवसेनेचे वरिष्ठ नेते शहाजीबापू पाटील यांनी यावेळी युवा प्रशिक्षणार्थीशी बोलताना सांगितले.

Web Title: Deputy chief minister eknath shinde has made a big promise from sangola

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 05:01 PM

Topics:  

  • Eknath shinde Shivsena
  • Election News
  • shahajibapu patil

संबंधित बातम्या

आमच्या दादा , भाऊला निवडून द्या! लहान मुलांचा निवडणुकीसाठी सर्रास वापर
1

आमच्या दादा , भाऊला निवडून द्या! लहान मुलांचा निवडणुकीसाठी सर्रास वापर

Pune Election : प्रभाग 9 साठी राष्ट्रवादीचा प्रगती अहवाल अन् ‘जनहितनामा’ प्रसिद्ध
2

Pune Election : प्रभाग 9 साठी राष्ट्रवादीचा प्रगती अहवाल अन् ‘जनहितनामा’ प्रसिद्ध

Pune Election : भाजपच्या सभेला नागरिकांचा प्रतिसाद! प्रभाग 09 साठी जाहीरनामा प्रसिद्ध
3

Pune Election : भाजपच्या सभेला नागरिकांचा प्रतिसाद! प्रभाग 09 साठी जाहीरनामा प्रसिद्ध

मुंबईतील लोकसंख्या बदल अन् राजकीय गणिते; राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरुच
4

मुंबईतील लोकसंख्या बदल अन् राजकीय गणिते; राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरुच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.