Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

निधी मिळुनही म्हसवडकर पितायेत १० दिवसांतुन पिण्याचे पाणी! ना. गोरे यांचे स्वप्न सत्यात उतरवण्याची पालिका सदस्यांची धडपड

म्हसवड शहरातील वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी Jaykumar Gore यांनी अमृत २.० अंतर्गत सुमारे ८० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र, योजनेचे काम अंतिम टप्प्यात असूनही नागरिकांना १० ते १२ दिवसांनीच पाणी मिळत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 30, 2026 | 07:24 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

म्हसवड, महेश कांबळे  : राज्याचे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी म्हसवड शहरातील वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी अमृत २.० अंतर्गत सुमारे ८० कोटींचा निधी म्हसवड पालिकेला उपलब्ध करुन दिला आहे, मात्र आज ही म्हसवडकरांना पिण्याच्या पाण्यासाठी १० ते १२ दिवसांची प्रतिक्षा करावी लागत आहे. या योजनेचे काम अंतिम टप्प्यात असले तरी योजनेच्या जलवाहिनीला वारंवार होणारी गळती हेच मुख्य कारण पाणी विलंबाचे असुन या योजनेचा पालिकेचे पाणी पुरवठा सभापती युवराज सूर्यवंशी यांच्या सोबत घेतलेला ग्राउंड रिपोर्ट आम्ही तुमच्यासमोर घेवुन आलो आहोत.

आरोग्यमंत्र्यांचा किडनी विकारग्रस्तांना दिलासा! महा डायलिसिस योजनेअंतर्गत नवीन बारा डायलिसीस केंद्रांचे लोकार्पण

म्हसवड शहरासाठी जिवन प्राधिकरणाची वाढीव पाणी पुरवठा योजना आहे मात्र सदरची योजना कार्यान्वित होवुन ती यंदाच्या वर्षी कालबाह्य ही झाली आहे, सदर ची योजना कार्यान्वित करताना ती शहराच्या त्यावेळच्या परिस्थितीनुसार बनवलेल्या आराखड्यावर तयार करण्यात आली असली तरी सदर ची योजना पालिकेच्या ताब्यात येवुन जवळपास २५ वर्ष लोटली आहेत, या २५ वर्षात शहरातील वाढती लोकसंख्या वाढती नागरी वसाहत यामुळे सदर ची योजना शहरासाठी कमी पडु लागली आहे, अशातच सदर योजनेसाठी ही शेजारील माळशिरस तालुक्यातुन सुमारे २८ कि.मी. अंतरावरुन पाणी आणण्यात आले असुन ते माण तालुक्यातील कारखेल गावच्या परिसरात आणुन तेथुन ते जलशुध्दीकरण करुन शहरातील विविध भागातील पाण्याच्या टाक्यांमध्ये सायपन पध्दतीने सोडले जात आहे. मात्र या योजनेच्या साठवण तलाव ते जलशुध्दीकरण केंद्र या दरम्यानचे अंतर हे १२ कि.मी. अंतर असुन याठिकाणी सदर योजनेचे पाणी हे जलवाहिनीद्वारे आणले जात आहे, ही जलवाहिनी सुध्दा जीर्ण झाली असुन अनेक ठिकाणी तिला गळती लागली आहे. जलवहिनी जीर्ण झाल्याने ती वारंवार फुटत आहे त्याचा परिणाम शहराच्या पाणी पुरवठ्यावर होत आहे. ही बाब जेव्हा राज्याचे ग्राम विकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी म्हसवडकर जनतेची पाण्याची ओरड कायमस्वरुपी थांबवण्यासाठी राज्य शासनाच्या अमृत २.० योजनेंतर्गत सदर योजनेसाठी सुमारे ८० कोटींचा निधी म्हसवड पालिकेला उपलब्ध करुन दिला आहे. सदर चा निधी प्राप्त झाल्याने पालिकेनेही सदर योजनेच्या डागडुजीचे काम हाती घेत प्रत्यक्ष कामाला सुमारे अडीच वर्षापुर्वीच सुरुवात केली आहे.

मात्र ही सुरुवात करीत असताना पालिका प्रशासनाने ठेकेदारांवर आपली जरब न ठेवल्याने ठेकेदारांनी या कामी दिरंगाई तर केलीच आहे, याशिवाय काही ठिकाणी कामाचा दर्जा हा सुमार ठेवला आहे, वास्तविक पाहता जुन्या जलवाहिन्या कालबाह्य झाल्याने त्याला समांतर अशी नवीन जल वाहिनी टाकण्यात आली असली तरी ती टाकताना काही ठिकाणी जमिनीवरुन तर काही ठिकाणी जमिनी खालुन टाकली आहे, तर ज्या ठिकाणी जमिनीखालुन ही जल वाहिनी टाकली आहे तेथील शेतकर्यांना विचारात न घेता या वाहिन्या टाकण्यात आल्याने आता ते शेतकरी येथे आडवे पडले आहेत, किंबहुना त्यांना त्यांच्या शेतातील काम करताना काही ठिकाणी खोदकाम करावे लागत आहे ते खोदकाम करताना या जलवाहिन्या अनेक ठिकाणी फुटल्या आहेत, त्यामुळे साठवण तलावापासुन पाणी जलशुध्दीकरण केंद्रावर आणताना अनेक ठिकाणी पाण्याचे कारंजे उडत आहेत, हे लिकेज काढताना आता पालिका ठेकेदाराची दमछाक होत आहे मात्र त्याचा विपरीत परिणाम हा शहराच्या पाणी पुरवठ्यावर होत आहे.

अखेर ठरलं ! महाराष्ट्र दिनापासून मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ होणार खुला; प्रवास होणार अधिक गतिमान

गत काही महिन्यांपुर्वी म्हसवड पालिकेची निवडणुक संपन्न झाली आहे या निवडणुकीत राज्याचे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी म्हसवड पालिकेची सत्ता ताब्यात घेताना म्हसवडकरांना पिण्याचे पाणी २४ तास उपलब्ध करुन देण्याचा शब्द दिला आहे, म्हसवडकरांनीही मंत्री गोरे यांच्या या शब्दावर विश्वास ठेवुन त्यांच्या ताब्यात सत्ता म्हसवड करांनी पुर्ण सत्ता देत विरोधकांना व्हाइट वॉश दिला आहे. आता हीच म्हसवडकर जनता पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशा टाहो फोडत आहे, मंत्री गोरे यांनी योजनेसाठी भरघोस निधी उपलब्ध ही करुन दिला आहे, मात्र योजना मार्गी लागण्यास विलंब लागतोय तो जलवाहिनीच्या गळतीमुळे, आता हीच गळती थांबवण्यासाठी पालिकेचे पाणी पुरवठा सभापती युवराज सूर्यवंशी व त्यांचे मित्र धनाजी शिंदे हे पायाला भिंगरी बांधुन अहोरात्र उपाय योजना करीत आहेत, त्यांना नगराध्यक्षा पुजा विरकर व पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांचीही मोलाची साथ मिळत असल्यानेच जलवाहिनीला लागलेली गळती थांबवण्यात समाधान कारक यश आले आहे.

पुढील ८/१० दिवसांत ही गळती पुर्णपणे काढुन शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल असा विश्वास पाणी पुरवठा सभापती युवराज सूर्यवंशी यांनी व्यक्त केला आहे, तर ना. गोरे यांनी म्हसवडकर जनतेला २४ तास पाण्याचा शब्द सत्यात उतरण्यासाठी पालिकेचे सर्व सदस्य प्रयत्न करीत असुन पुढील काही महिन्यातच त्याला पण यश येईल असा विश्वास पालिकेतील सर्व सदस्यांकडुन व्यक्त केला जात आहे.

Web Title: Despite receiving funds residents of mhaswad are getting drinking water only once every ten days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 07:23 PM

Topics:  

  • Mhaswad
  • Satara

संबंधित बातम्या

सातारा वनविभागाला वन्यजीव बचावासाठी आधुनिक बळ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रुग्णवाहिका आणि रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण
1

सातारा वनविभागाला वन्यजीव बचावासाठी आधुनिक बळ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रुग्णवाहिका आणि रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण

BJP Seva Abhiyan Satara District: सर्वसामान्यांचे प्रश्न सुटणार!; साताऱ्यात भाजपाचे ‘सेवा अभियान’ यशस्वी
2

BJP Seva Abhiyan Satara District: सर्वसामान्यांचे प्रश्न सुटणार!; साताऱ्यात भाजपाचे ‘सेवा अभियान’ यशस्वी

Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana: बारामती परिमंडळातील २ लाख शेतकऱ्यांना आता दिवसा मिळणार वीज
3

Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana: बारामती परिमंडळातील २ लाख शेतकऱ्यांना आता दिवसा मिळणार वीज

Satara News: रस्ते खड्ड्यात अन् टोलवसुली सुरूच!; साताऱ्यात १९ ज्येष्ठ नागरिक संघटना आक्रमक
4

Satara News: रस्ते खड्ड्यात अन् टोलवसुली सुरूच!; साताऱ्यात १९ ज्येष्ठ नागरिक संघटना आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.