Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: रस्ते खड्ड्यात अन् टोलवसुली सुरूच!; साताऱ्यात १९ ज्येष्ठ नागरिक संघटना आक्रमक

सातारा ते पाचवडदरम्यानच्या सेवा रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून, अनेक ठिकाणी रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. महामार्गालगतचे बॅरिकेड्स व लोखंडी साहित्यही गायब असल्याचे आंदोलकांनी निदर्शनास आणून दिले.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 13, 2026 | 03:20 PM
Satara Pune Bengaluru Highway News,Satara, NH4, Toll Naka

Satara Pune Bengaluru Highway News,Satara, NH4, Toll Naka

Follow Us
Follow Us:
  • हलक्या वाहनांसाठी १० रुपये, चारचाकी वाहनांसाठी २० रुपये, तर अवजड/१२ चाकी वाहनांसाठी ३० रुपये टोल आकारावा.
  • सातारा ते पाचवडदरम्यानच्या खड्डेमय सेवा रस्त्यांचे तातडीने डांबरीकरण करावे.
  • खड्डे बुजवून तयार केलेल्या धोकादायक उंचवट्यांची पाहणी करून कारवाई करावी.
Satara Pune Bengaluru Highway Toll Issue News: पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील आणेवाडी आणि तासवडे टोलनाक्यांवरील टोलवसुलीच्या मुद्द्यावरून साताऱ्यातील ज्येष्ठ नागरिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. महामार्ग तसेच सेवा रस्त्यांची दुरवस्था कायम असताना वाहनचालकांकडून टोल आकारणी सुरूच असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. टोलदरात मोठी कपात करून वाहनचालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी १९ ज्येष्ठ नागरिक संघटनांनी केली.

ज्ञानविकास मंडळाचे कार्यवाहक प्रसाद चाफेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करण्यात आली. जिल्हा परिषद सदस्य राजू शेळके, डॉ. कर्मवीर मार्तंडराव सूर्यवंशी, चर्चा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. हेमलता हिरवे, उपाध्यक्ष ओम सूर्यवंशी, सचिव उदय शंकर सूर्यवंशी, खजिनदार डॉ. ओंकार हिरवे यांच्यासह विविध ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

Satara District Bank Election: जावळीत सोसायटी ठरावांवरून राजकीय संग्राम; ३२ मतदार अज्ञात स्थळी रवाना

सातारा ते पाचवडदरम्यानच्या सेवा रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून, अनेक ठिकाणी रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. महामार्गालगतचे बॅरिकेड्स व लोखंडी साहित्यही गायब असल्याचे आंदोलकांनी निदर्शनास आणून दिले. खड्डे बुजविण्याच्या नावाखाली करण्यात आलेल्या कामामुळे रस्त्यावर उंचवटे निर्माण झाले असून, वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.हलक्या वाहनांसाठी १० रुपये, चारचाकी वाहनांसाठी २० रुपये, तर अवजड व १२ चाकी वाहनांसाठी ३० रुपये टोल आकारावा, अशी मागणी करण्यात आली.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन रस्त्यांची दुरुस्ती, सेवा रस्त्यांची स्थिती आणि टोलवसुलीबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी चाफेकर यांनी केली.रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून तातडीने बैठक घेऊन याबाबत लवकर उपाययोजना करण्यात यावी अशी अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांकडे ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली .

Mumbai News: अरे देवा! नॉनव्हेज खात असाल तर घर मिळणार नाही…; इस्टेट एजंटच्या व्हायरल व्हिडीओने मुंबईत

आंदोलकांच्या मागण्यांची दखल घेत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी संबंधित निवेदन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठवून पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. आंदोलनात निमा, चार्टर्ड अकाउंटंट असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशनसह विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले. आयएमएचे ज्येष्ठ पदाधिकारी डॉ. अशोक सूर्यवंशी यांचीही उपस्थिती होती.

 

Web Title: Satara pune bengaluru highway anewadi tasawade toll protest senior citizens

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Pune
  • Satara

संबंधित बातम्या

Satara District Bank Election: जावळीत राजकारण तापणार; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिंदे-शिवेंद्रराजे आमनेसामने
1

Satara District Bank Election: जावळीत राजकारण तापणार; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिंदे-शिवेंद्रराजे आमनेसामने

Satara Water Crisis: विहिरीत उतरले मळीमिश्रित पाणी; जावळीतील नेवेकरवाडीत पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न
2

Satara Water Crisis: विहिरीत उतरले मळीमिश्रित पाणी; जावळीतील नेवेकरवाडीत पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न

म्हसवड येथे संत नामदेव महाराजांचा ६७६ वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात संपन्न
3

म्हसवड येथे संत नामदेव महाराजांचा ६७६ वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात संपन्न

मराठ्यांच्या वाटेला जाल तर जिंदगीत यशस्वी होऊ देणार नाही – मनोज जरांगे पाटील
4

मराठ्यांच्या वाटेला जाल तर जिंदगीत यशस्वी होऊ देणार नाही – मनोज जरांगे पाटील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.