Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सातारा वनविभागाला वन्यजीव बचावासाठी आधुनिक बळ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रुग्णवाहिका आणि रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण

जखमी आणि संकटात सापडलेल्या वन्यजीवांच्या तातडीच्या बचावासाठी सातारा वनविभागाला वन्यजीव रुग्णवाहिका आणि विशेष रेस्क्यू वाहन मिळाले आहे. ४० लाखांच्या निधीतून ही वाहने खरेदी करण्यात आली आहेत.

  • By विवेक
Updated On: Aug 16, 2026 | 07:09 PM
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रुग्णवाहिका आणि रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रुग्णवाहिका आणि रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण

Follow Us
Follow Us:

सातारा, दि. १५ प्रतिनिधी : जिल्ह्यातील वन्यजीवांच्या संरक्षण आणि संवर्धनाच्या कामाला आता आधुनिक साधनसुविधांची जोड मिळाली आहे. जखमी, आजारी अथवा संकटात सापडलेल्या वन्यजीवांना तातडीने सुरक्षितपणे बाहेर काढून उपचारासाठी हलविण्यासाठी सातारा वनविभागाच्या ताफ्यात वन्यजीव रुग्णवाहिका आणि विशेष रेस्क्यू वाहन दाखल झाले आहे.

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून या दोन्ही वाहनांचे लोकार्पण राज्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या ‘वन्यप्राणी अपंगालयाची स्थापना’ या राज्य योजनेअंतर्गत लेखाशीर्ष २४०६-२२३२ मधून सातारा वनविभागाला ४० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून बचाव व उपचारासाठी आवश्यक असलेल्या वाहनांची खरेदी करण्यात आली आहे.

सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र असल्याने विविध प्रकारच्या वन्यजीवांचा अधिवास येथे आढळतो. वनक्षेत्रालगतच्या मानवी वस्त्यांमध्ये वन्यजीवांचा वावर वाढल्याने विहिरीत पडणे, वाहनांच्या धडकेत जखमी होणे, वस्तीत शिरणे किंवा अन्य कारणांमुळे संकटात सापडण्याच्या घटना घडतात. अशा वेळी वनविभागाच्या पथकाला घटनास्थळी तातडीने पोहोचून वन्यजीवांचा सुरक्षित बचाव करण्यासाठी ही वाहने उपयुक्त ठरणार आहेत.

चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी

उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या नियोजनातून वन्यजीव संरक्षणासाठी ही सुविधा उपलब्ध झाली आहे. रेस्क्यू मोहिमेसाठी आवश्यक साधनसामग्रीची सुविधा वाहनांमध्ये असल्याने बचावकार्य अधिक वेगाने आणि सुरक्षितपणे करण्यास मदत होणार आहे. जखमी वन्यजीवांना कमीत कमी त्रास होईल, याची दक्षता घेत त्यांना उपचार केंद्रापर्यंत पोहोचविणे शक्य होणार आहे.

अपघातग्रस्त वन्यजीव, विहिरी अथवा अन्य ठिकाणी अडकलेले प्राणी आणि मानवी वस्तीत आलेले वन्यजीव यांच्या बचावासाठी या वाहनांचा प्राधान्याने वापर केला जाणार आहे. वेळेत उपचार मिळाल्यामुळे जखमी व आजारी वन्यजीवांचे प्राण वाचविण्यासोबतच त्यांच्या पुढील पुनर्वसनाची प्रक्रिया अधिक परिणामकारकपणे राबविता येणार आहे.

माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्पाविरोधात गाढव मोर्चा; अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओच्या घोषणांनी परिसर दणाणला

कराड तालुक्यातील वराडे येथील वन्यजीव उपचार केंद्रालाही या सुविधेचा मोठा फायदा होणार आहे. रेस्क्यूपासून उपचार आणि पुनर्वसनापर्यंतची यंत्रणा अधिक सक्षम होण्यास या वाहनांची मदत मिळणार आहे.

वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने जिल्ह्यातील वनविभागाच्या बचाव यंत्रणेला मिळालेले हे आधुनिक बळ महत्त्वपूर्ण मानले जात आहे. संकटात सापडलेल्या वन्यजीवांना तत्काळ मदत मिळवून देण्याबरोबरच त्यांच्या सुरक्षित उपचार व पुनर्वसनाला या सुविधेमुळे गती मिळणार आहे.

Web Title: Satara forest department wildlife ambulance rescue vehicle launch

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 07:09 PM

Topics:  

  • Forest Department
  • Satara
  • Satara News
  • Shambhuraj Desai

संबंधित बातम्या

Leopard : चांदबिबी महाल परिसरात बिबट्याचे दर्शन, गाडीपासून अवघ्या पाच फुटावर होता उभा
1

Leopard : चांदबिबी महाल परिसरात बिबट्याचे दर्शन, गाडीपासून अवघ्या पाच फुटावर होता उभा

Maharashtra Drought 2026: पाटणसह पाच तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करा; शंभूराज देसाईंचा सरकारकडे पाठपुरावा
2

Maharashtra Drought 2026: पाटणसह पाच तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करा; शंभूराज देसाईंचा सरकारकडे पाठपुरावा

Crop Damage Survey: ई-पिक पाहणी केली का? खंडाळा तालुक्यात प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी सुरू
3

Crop Damage Survey: ई-पिक पाहणी केली का? खंडाळा तालुक्यात प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी सुरू

Satara News: साताऱ्यात पालिकेची धडक कारवाई; मंगळवार तळ्यालगतचे बांधकाम जेसीबीने हटविले
4

Satara News: साताऱ्यात पालिकेची धडक कारवाई; मंगळवार तळ्यालगतचे बांधकाम जेसीबीने हटविले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.