
वर्षभर सोसावी लागणार वाहतूक कोंडी! पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या सविस्तर बातमी (फोटो सौजन्य-Gemini)
शहरात ३० रस्त्यांची व ४ उड्डाणपुलांची विकास कामे, दुरुस्ती, रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यात द्वारका येथील ग्रेड सेप्रेटरचे काम असेल. यासाठी द्वारका चौकात येणाऱ्या मोठ्या वाहनांसह एसटीबसेस, सिटी लिंक बसेसलाही प्रवेश बंद करण्यात आला आहे. शहरातून जाण्यासाठी या वाहनांना फेम थिएटर, पुढे बडाळागाव गाव कलानगर सिग्नल आणि पुढे पाथर्डी फाटा अथवा लेखानगरमार्गे मुंबई नाका असा पर्याय आहे. काही वाहनांना वडाळगावाजवळून साईनाथनगर चौफुली आणि पुढे इंदिरानगर अंडरपास व पुढे मुंबईनाका हा रस्ता देण्यात आला आहे. जाणाऱ्या वाहनांचा ताणही इंदिरानगर जॉगींग ट्रॅक रस्त्याने रवीशंकर मार्ग आणि डीजीपीनगर असा राहिल, जड अवजड वाहनांना दिवसभर शहराबाहेर रोखून धरण्याची व्यवस्था नसल्याने या वाहनांना बसेसबरोबर इंदिरानगर भागातूनच जावे लागेल, कलानगर सिग्नलजवळ मोठ्या वाहनांना पुरेसा टर्निंग रेडीयस नाही. परिणामी येथे वाहतूक कोंडी उद्भवू शकते. इंदिरानगर अंडरपास सुरू झाला तरी हे काम पूर्ण होण्यास सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. विशेष म्हणजे या कामासाठी हायवेवरील वाहतूक सहिंसरोडने वळवावी लागणार आहे. बस आणि जड वाहने नसताना मुंबईनाका सकाळ संध्याकाळच्या सुमारास वाहतूक कोंडीत सापडतो.
रवीशंकर मार्गपासून पुढे कलानगर असो की साईनाथनगर चौफुली मार्गे मुंबईनाका या भागात शाळा आहेत, शाळा भरताना आणि सुटताना विद्यार्थ्यांची, वाहनांची प्रचंड गर्दी असते, त्यामुळे येथील विद्याथ्यर्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा घोक्यात येणार आहे. काही वर्षांपूर्वी येथून जह वाहतूक सुरू असताना सातत्याने अपघात झालेत. नागरिकांचा रोष वाढल्याने हा मार्ग जह वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.
सर्व पर्यायाची चाचपणी केल्यानंतर हे मार्ग ठरवण्यात आले आहे. सध्या तरी त्यास दुसरा पर्याय नाही. आवश्यक त्या ठिकाणी ट्रैफिक वार्डन, वाहतूक पोलिस तैनात करण्यात येतील, त्याची तयारी सध्या सुरू आहे. वाहतूक कोंडी होऊ शकेल अथवा अपघाताची शक्यता असलेल्या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त देऊ, अशी प्रतिक्रिया वाहतूक विभागातील सहायक पोलीस आयुक्त अद्विती शिंदे यांनी दिली.