Devendra Fadnavis
मुंबई : भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये विरोधकांवर जोरदार निशाणा साधत, भाजपने कार्यकर्त्यांना आपले कार्य लोकांपर्यंत पोहचवण्याचे आदेश दिले आहेत.
आपली लढाई इंडियाशी नाही, विरोधकांशी आहे
देशातील परिवारवादी पक्षांना मोदी पुढे जावे असे वाटत नाही. जगात नाव होते तेव्हा आपल्याकडे कोणी वाकड्या नजरेने बघत नाही. भारताच्या जनेतेचा मोदींवर विश्वास आहे.
देशातीला इंडिया आघाडीच्या नेत्यांमागे देशांमध्ये अराजक निर्माण करणाऱ्या शक्ती असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
लोकसभेची तयारी करण्याचे आदेश
आपण लोकसभेच्या निवडणुकीत 40 ते 42 जागा निवडून आणायच्या आहेत. आपण ठरवले तर मोठे यश आपण मिळवू शकतो. मराठा आरक्षण भाजप सरकारनेच दिले, आणि टीकवले आता आपले सरकार गेल्यानंतर हे आरक्षण गेले. ज्या सरकारच्या काळात हे आरक्षण गेले, तेच आज आम्हाला शिकवत आहेत. महाराष्ट्रात समाजा-समाजामध्ये फूट वाढू नये याकरिता महाराष्ट्राला विकासाकडे न्यायचे आहे.
तीन घटक पक्षांपैकी भाजप हा मोठा पक्ष
भाजप हे सरकारमध्ये मोठा भाऊ, सरकार तीन पक्षांचे असले तरी भाजप मोठा भाऊ
राज्यात काही नेत्यांचा अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे. महाराष्ट्रातील सरकार हे ओबीसी, धनगर, दीन-दलित सर्वांचे मागे हे सरकार उभे आहे.लोकसभा निवडणुकीसाठी आपल्यावर मोठी जबाबदारी आहे.
काही लोकं खूप चांगलं काम करतात आणि जे काहीच प्रत्येकाने आपली जबाबदारी सांभाळून काम केले पाहिजे. त्यामुळे जे काही करीत नाही त्यांना काम करण्याची संधी दिली जाणार आहे.
2024 लोकसभा निवडणुकीचे शिलेदार
भारताच्या इतिहासामध्ये ही निवडणूक सुवर्णअक्षरामध्ये लिहीली जाणार आहे. कोणीही ताकदवान आला तरी भारताला थांबवू शकणार नाही. या निवडणुकीमध्ये संघाचे सैनिक होण्याचे भाग्य आपल्याला मिळणार आहे. ही निवडणूक आपण जिंकलो तर भारताचा विकास कोणीही रोखू शकणार नाही. 2024 ला मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार