Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विठ्ठलाच्या साक्षीने कर्जमुक्तीचा श्रीगणेशा! पंढरीतून ५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा; ‘शब्द पाळला’ म्हणत मुख्यमंत्र्यांची घोषणा

पंढरपूर येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजने'चा शुभारंभ करण्यात आला. ३१ जुलैपूर्वी १७ लाख शेतकऱ्यांना १३ हजार कोटींचा लाभ मिळणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 24, 2026 | 09:09 PM
पंढरीतून ५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा; 'शब्द पाळला' म्हणत मुख्यमंत्र्यांची घोषणा (Photo Credit- X)

पंढरीतून ५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा; 'शब्द पाळला' म्हणत मुख्यमंत्र्यांची घोषणा (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • विठ्ठलाच्या साक्षीने कर्जमुक्तीचा श्रीगणेशा!
  • पंढरीतून ५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘शब्द पाळला’ म्हणत मुख्यमंत्र्यांची घोषणा
पंढरपूर | शिवाजी हळणवर: आषाढी वारीच्या पावन वातावरणात राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणाऱ्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजने’चा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंढरपूरातून करण्यात आला. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील सात शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमुक्ती प्रमाणपत्रे व नव्या पीककर्जाचे धनादेश प्रदान करण्यात आले.

पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित सुधाकर पंत परिचारक राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, विजयकुमार देशमुख, अभिजीत पाटील,उत्तमराव जानकर, नारायणराव पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, बाजार समितीचे अध्यक्ष हरीश गायकवाड, उपसभापती राजू गावडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी आणि वारकरी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंढरपूर येथे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ मधील पात्र शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात प्रमाणपत्रांचे वितरण केले. तसेच यावेळी कर्जमुक्त झालेल्या या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर जिल्हा… pic.twitter.com/VOyDlWu9RX — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 24, 2026


यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा शब्द राज्य सरकारने पाळला असून, ही देशातील सर्वात मोठी कर्जमाफी आहे. राज्यातील ५६ लाख शेतकरी या योजनेचा लाभ घेणार असून, पहिल्या टप्प्यात १७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात १३ हजार कोटी रुपये ३१ जुलैपूर्वी जमा केले जाणार आहेत. त्यानंतर बँकांकडून माहिती प्राप्त होताच पुढील याद्या जाहीर केल्या जातील. एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मुख्यमंत्री म्हणाले की, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन देण्यात येणार आहे. कर्जमाफीचा शुभारंभ राज्याच्या कोणत्याही शहरातून न करता शेतकरी आणि वारकरी यांच्या पवित्र संगमभूमी असलेल्या पंढरपूरातून करण्यामागे विशेष भावना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी कृषी क्षेत्रासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना सांगितले की, ७.५ हॉर्स पॉवरपर्यंतच्या कृषीपंपांची थकीत वीजबिलेही माफ करण्यात आली असून ५० लाख शेतकऱ्यांचे तब्बल ४८ हजार कोटी रुपयांचे वीजदेयक शासनाने भरले आहे. याशिवाय ठिबक सिंचन, यांत्रिकीकरण, खत अनुदान अशा विविध योजनांवर गतवर्षी ९५ हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला.

Maharashtra Dry Day: विकेंडला पार्टीचा प्लॅन? थांबा! राज्यभरात दारू विक्री बंद; बार, पब आणि वाईन शॉप्स राहणार बंद, काय आहे कारण?

‘महा विस्तार’ एआय ॲपचा वापर करा

शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढावा यासाठी महाराष्ट्राने देशात प्रथमच ‘महा विस्तार’ हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ॲप विकसित केले असून, जवळपास ५० लाख शेतकऱ्यांनी त्यावर नोंदणी केली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या ॲपद्वारे खत व्यवस्थापन, कीड नियंत्रण, पाणी व्यवस्थापन, आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि पीक सल्ला शेतकऱ्यांना त्यांच्या बोलीभाषेत उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पंढरपूर कॉरिडॉरमध्ये शंभर टक्के पुनर्वसन

पंढरपूर कॉरिडॉरबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, सर्व बाधितांचे शंभर टक्के समाधानकारक पुनर्वसन करण्यात येईल. महाराष्ट्रातील कोणत्याही तीर्थक्षेत्रात झाले नाही, इतके उत्तम पुनर्वसन पंढरपूरमध्ये करण्याचा सरकारचा निर्धार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वाढत्या भाविकांसाठी सुरक्षित, शिस्तबद्ध आणि आधुनिक सुविधा निर्माण करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वारीसाठी विक्रमी ३५ लाख वारकरी

यंदाच्या आषाढी वारीसाठी ३५ लाखांहून अधिक वारकरी पंढरपुरात दाखल झाल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, सुमारे २१ किलोमीटर लांबीची दर्शन रांग लागली आहे. जर्मन हँगर, वैद्यकीय सेवा, पाद्यसेवा, निवास आणि इतर सुविधा प्रशासनाने उत्तम प्रकारे उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी नमूद केले.

भीमा नदीवरील बंधारे आणि रेल्वे मार्गालाही गती

भीमा नदीवर बॅरेज उभारण्याबाबत आवश्यक निर्देश दिले जातील तसेच चंद्रभागा नदीवरील नवीन पूल ‘पूल कम बंधारा’ म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. कोल्हापूर-सांगलीतील अतिरिक्त पाणी डायव्हर्जन कॅनलद्वारे उजनी धरणात ३५ ते ४० टीएमसी पाणी आणण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच लोणंद-पंढरपूर आणि पंढरपूर-विजापूर रेल्वे मार्ग पूर्ण करण्यासाठीही शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमात ‘इन्फ्रामॅन : देवेंद्र फडणवीस – मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकाचे तसेच निवासी मूकबधिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी कृषी महोत्सवातील विविध दालनांना भेट देऊन आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती घेतली.

Ashadhi Ekadashi 2026: आषाढीला अन्नासह सोशल मीडियाचाही उपवास! विठ्ठलनामात रमण्यासाठी मंदिर विश्वस्तांचे भक्तांना अनोखे आवाहन

Web Title: Devendra fadnavis launches ahilyadevi holkar farmer loan waiver scheme in pandharpur marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 09:08 PM

Topics:  

  • aashadhi ekadashi
  • CM Devendra Fadanvis
  • farmer
  • pandharpur

संबंधित बातम्या

आदरणीय पी डी पाटील यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडवले – बाळासाहेब पाटील
1

आदरणीय पी डी पाटील यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडवले – बाळासाहेब पाटील

दुष्काळसदृश यादीत बुलढाण्याचा समावेश करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची विनंती
2

दुष्काळसदृश यादीत बुलढाण्याचा समावेश करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची विनंती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.