
Prataprao Jadhav on Buldhana Drought Situation
मात्र, या यादीत बुलढाणा जिल्ह्याचा समावेश नसल्याने जिल्ह्यातील सद्यस्थितीचा तातडीने फेरआढावा घेण्याची गरज असल्याचे नामदार जाधव यांनी पत्रात नमूद केले. बुलढाणा जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद यासह विविध खरीप पिकांवर परिणाम झाला. उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या साप्ताहिक पर्जन्यमान अहवालानुसार २ सप्टेंबर संपलेल्या आठवड्यात बुलढाणा जिल्ह्यातील पर्जन्यमान सामान्यापेक्षा सुमारे ८७ टक्के कमी नोंदविण्यात आले. ५ सप्टेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील आवश्यक भागात हवामान परिस्थिती अनुकूल असल्यास कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविण्याची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली होती. मात्र, पर्जन्यस्थिती आणि खरीप पिकांवरील संकट कायम असल्याचे ना. जाधव यांनी निदर्शनास आणून दिले.
बुलढाणा जिल्ह्याचा दुष्काळसदृश परिस्थितीच्या निकषांनुसार तातडीने फेरआढावा घेऊन १८ जिल्ह्यांच्या यादीत समावेश करावा, खरीप पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसान सर्वेक्षण व पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नियमानुसार तातडीची आर्थिक मदत व पीकनुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, हवामान परिस्थिती अनुकूल असल्यास आवश्यक भागात कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविण्याबाबत तातडीने निर्णय घेण्याची विनंतीही केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. आवश्यक आर्थिक व प्रशासकीय मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.
Washim News: वाशिम जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करा; पालकमंत्री भरणे यांचे प्रशासनाला निर्देश