
पाथर्डीत मुख्यमंत्र्यांचे महत्वाचे वक्तव्य
ते वीर सावरकर मैदानावर आयोजित प्रचार सभेत बोलत होते. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार मोनिका राजळे, सुरेश धस, दिलीप भालसिंग, अनिल मोहिते, अक्षय कर्डीले, सुवेंद्र गांधी, विवेक नाईक, राहुल राजळे, धनंजय बडे, दिगंबर भवार आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार अभय आव्हाड उपस्थित होते.
वाशी सुविधा केंद्रातून हंगामातील डाळिंबाचा पहिला कंटेनर समुद्रमार्गे अमेरिकेसाठी रवाना
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यात साडेसहा कोटी लाडक्या बहिणी असल्या तरी विधानसभेत माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या आमदार मोनिका राजळे या माझ्यासाठी खऱ्या लाडक्या बहीण आहेत. त्यांच्या पाठीशी मी ठाम उभा आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनीच मला राजकारणात पुढे आणले. सात दशके देशावर राज्य करणाऱ्यांनी शहरांकडे दुर्लक्ष केले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर स्मार्ट सिटी, हर घर जल यांसारख्या योजनांमुळे शहरांचा सर्वांगीण विकास झाला.
शहरवासीयांना नियमित पाणीपुरवठा व वीज उपलब्ध करून देणे, तसेच प्रदूषणमुक्त शहरे निर्माण करणे, ही कामे सरकार प्राधान्याने करत आहे. ही निवडणूक केवळ पालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी नसून केंद्र व राज्य सरकारच्या योजना योग्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. वकील संघटनेने मागणी केलेली न्यायालयासाठी नवीन इमारत उभारण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
पाथर्डी आणि शेवगाव पाणीपुरवठा योजनेचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. पाथर्डी शहरातील अनेक उद्घाटन कार्यक्रम रखडलेले असून, गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्या हस्ते व्हावे, ही पाथर्डीकरांची इच्छा असल्याचे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले. निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर मुख्यमंत्री वेळ देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नगर जिल्ह्यात इतरत्र नसावी अशी भव्य नगर परिषद प्रशासकीय इमारत पाथर्डीत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Thane Election 2025: ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांसाठी शिवसेनेतून ३३४८ इच्छुक
आमदार मोनिका राजळे म्हणाल्या, विरोधी पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराने लिंगायत समाजाच्या जमिनीवर आरक्षण टाकून भूखंड गिळंकृत केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. आमच्यावर टीका करणाऱ्याचा कारखाना अडचणीत आल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनीच मदत केली. तरीही हे सरकारने काय दिले, असा सवाल केला जातो. मी स्वतः कारखानदार असून शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याने त्या कारखान्याला निधी देण्यास विरोध केला नाही, अशी टीका त्यांनी अप्रत्यक्षपणे ढाकणे यांच्यावर केली.