Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shaktipeeth Express News: वाळव्यातील एक इंच जमीनही देणार नाही; शक्तीपीठ विरोधी शेती बचाव संघर्ष समितीचा इशारा

"वाळवा तालुक्यातील मसुचीवाडी,नवे व जुनेखेड वाळवा, उरुण, येडेनिपाणी,कामेरी,येलूर,इटकरे कुरळप, ऐतवडे मार्गे हा शक्ती मार्ग कोल्हापूर जिल्ह्यात जाईल.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 04, 2026 | 05:07 PM
Shaktipeeth Expressway Protest, Dr. Bharat Patankar, Shramik Mukti Dal, Farmers Protest Maharashtra,

Shaktipeeth Expressway Protest, Dr. Bharat Patankar, Shramik Mukti Dal, Farmers Protest Maharashtra,

Follow Us
Follow Us:
  • शक्तीपीठ महामार्ग हा विकासाच्या नावाखाली शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण जनतेला उद्ध्वस्त करण्याचा सुनियोजित कट
  • गावे आणि जीवन उद्ध्वस्त करणारा महामार्ग कोणत्याही परिस्थितीत स्वीकारला जाणार नाही
  • शक्तीपीठ महामार्ग  म्हणजे ग्रामीण महाराष्ट्राच्या मानेवरचा फास
Shaktipeeth Express News: “शक्तीपीठ महामार्ग हा विकासाच्या नावाखाली शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण जनतेला उद्ध्वस्त करण्याचा सुनियोजित कट आहे. सिंचनाखालील असणारी सुपीक शेती, गावे आणि जीवन उद्ध्वस्त करणारा महामार्ग कोणत्याही परिस्थितीत स्वीकारला जाणार नाही. न मागता महामार्ग का देता ? त्यासाठी सिंचनासाठी रक्त सांडलेल्या हुतात्म्यांच्या रक्ताने भिजलेली एक इंच जमीनही देणार नाही,” असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे ज्येष्ठ नेते डॉ.भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.

शक्तीपीठ महामार्गाविरोधात पत्रकार परिषदेला बी.जी.पाटील (बळीराजा शेतकरी संघटना), कॉ. धनाजी गुरव (श्रमिक मुक्ती दल लोकशाहीवादी), शंकर महापुरे (राज्य उपाध्यक्ष दलित महासंघ), कॉ. दिग्विजय पाटील (श्रमिक मुक्ती दल लोकशाहीवादी), प्रा. रणजित चव्हाण (पुरोगामी संघटक), अजित हवालदार (संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष) आणि संतोष गोठणकर (धरणग्रस्त संघटना) यांची प्रमुख उपस्थिती होती.

Baramati Plane Accident: बारामती विमान अपघातप्रकरणी अरविंद सावंतांची मोठी मागणी; तांत्रिक त्रुटींकडेही वेधलं लक्ष

या प्रश्नी २७ फेब्रुवारीला ईश्वरपूर प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. डॉ.भारत पाटणकर म्हणाले, “देवधर्माच्या नावाखाली शक्तीपीठाचा मुलामा देऊन दोन चार भांडवलदारांच्या फायद्यासाठी लाखो शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा हा डाव आहे. कृष्णा–वारणा खोऱ्यातील सुपीक जमीन, सिंचन योजना, धरणग्रस्त पुनर्वसन, ग्रामीण रस्ते आणि गावांचा नैसर्गिक संपर्क तोडणारा हा महामार्ग म्हणजे ग्रामीण महाराष्ट्राच्या मानेवरचा फास आहे.

“वाळवा तालुक्यातील मसुचीवाडी,नवे व जुनेखेड वाळवा, उरुण, येडेनिपाणी,कामेरी,येलूर,इटकरे कुरळप, ऐतवडे मार्गे हा शक्ती मार्ग कोल्हापूर जिल्ह्यात जाईल. पूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातून जाणारा रस्ता तिकडे तीव्र विरोध आहे म्हणून बदलला आणि वाळवा तालुक्यात आणला गेला. तीव्र विरोध हाच निकष असेल तर आम्ही त्याला तीव्र विरोध करू”
बी. जी. पाटील म्हणाले, “या महामार्गामुळे पूरधोका वाढणार आहे, पाणी साचून शेती नापीक होणार आहे, ऊस व इतर पिकांच्या वाहतुकीवर गंभीर परिणाम होणार आहे. सरकारने हा प्रकल्प तात्काळ रद्द केला नाही, तर शेतकरी, शेतमजूर, धरणग्रस्त आणि कष्टकरी जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल.”

अपडेटेड Suzuki Access झाली लाँच! आता ‘या’ सेफ्टी फिचरमुळे तुमचा प्रवास होईल अधिकच सुरक्षित

सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका सुरू आहेत. शक्तीपीठ महामार्गाला पाठिंबा किंवा विरोध याबाबत कोणत्याही पक्षाला किंवा नेत्याला गावागावांत जाब विचारला जाईल. अन्यथा थेट उमेदवारांनी आपली भूमिका जाहीर करावी अशी मागणी धनाजी गुरव यांनी केली. सर्व राजकीय पुढाऱ्यांनी आपली भूमिका जाहीर करताना
समर्थन दिले तर महामार्ग बाधित गावातून एकही मत देणार नसल्याचे यावेळी जाहीर केले गेले.

Web Title: Shaktipeeth express news the shaktipeeth anti project farmers protection struggle committee warns the state government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 05:07 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Purandar Airport
  • Purandar News

संबंधित बातम्या

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
1

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्तांना मदतीचा आदेश उद्याच काढणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा
2

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्तांना मदतीचा आदेश उद्याच काढणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा

Maharashtra Drought : ‘10-12 दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर महागात पडेल,’ दुष्काळ जाहीर करण्यासाठी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
3

Maharashtra Drought : ‘10-12 दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर महागात पडेल,’ दुष्काळ जाहीर करण्यासाठी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम

मोठी बातमी! शेतकऱ्यांना मोठा धक्का; Purandar Airport प्रकरणात हायकोर्टाने फेटाळली याचिका
4

मोठी बातमी! शेतकऱ्यांना मोठा धक्का; Purandar Airport प्रकरणात हायकोर्टाने फेटाळली याचिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.