Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur News: बांधकाम व्यावसायिकांमुळे विकासाला गती; आमदार देवेंद्र कोठे यांचे प्रतिपादन

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या पदग्रहण समारंभात आमदार देवेंद्र कोठे यांनी बांधकाम व्यावसायिकांमुळे विकासाचा आलेख उंचावल्याचे सांगितले. पायाभूत सुविधा आणि शहरी विकासात या क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 19, 2026 | 06:36 PM
बांधकाम व्यावसायिकांमुळे विकासाला गती; आमदार देवेंद्र कोठे यांचे प्रतिपादन

बांधकाम व्यावसायिकांमुळे विकासाला गती; आमदार देवेंद्र कोठे यांचे प्रतिपादन

Follow Us
Follow Us:

सोलापूर : बांधकाम व्यावसायिकांमुळे शहराच्या विकासात भर पडते. त्यांच्यामुळे शहराच्या विकासाचा आलेख प्रगतीच्या दिशेने जातो, असे प्रतिपादन आमदार देवेंद्र कोठे यांनी केले. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या सोलापूर शाखेचा पदग्रहण समारंभ शनिवारी सायंकाळी हॉटेल फर्नच्या सभागृहात उत्साहात झाला.

याप्रसंगी व्यासपीठावर आमदार देवेंद्र कोठे, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या वेस्ट झोनचे उपाध्यक्ष महेश मुद्दा, माजी अध्यक्ष अविनाश पाटील, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, मावळते अध्यक्ष संतोष कलकुटगी, मावळते सचिव जी. के. देशमुख, नूतन चेअरमन मनोज म्हेत्रस, व्हाईस चेअरमन हणमंत कुलकर्णी, सचिव यशवंत पाथरूट, सहसचिव अमोल बंगाळे, खजिनदार सलिम दर्जी उपस्थित होते.

Karjat News : टोरंट वीज प्रकल्प विरोधात शिवसेना ठाकरे गट स्थानिकांच्या पाठीशी; जिल्हा पोलिस अधिक्षकांना दिलं निवेदन

आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, कोरोनासारख्या संकटाच्या काळातही टिकून राहून बांधकाम व्यवसायिकांनी विकासात योगदान दिले आहे. इमारतीचा दर्जा पाहून विकासाचे मोजमाप केले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दृष्टीने सोलापूर हे महत्त्वाचे शहर आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूरला भरघोस निधी देत आहेत. सोलापूरच्या विकासाचे सकारात्मक पाऊल पडत आहे. आगामी काही दिवसातच सोलापूरचे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन येत्या जून महिन्यापासूनच अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचेही आमदार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी सांगितले. महेश मुद्दा म्हणाले, बांधकाम व्यावसायिक आपले काम सचोटीने करतात. बांधकाम व्यावसायिकांनी प्रामाणिकपणे काम करून व्यवसाय मोठा करावा. सोलापूरच्या बांधकाम व्यवसायिकांचे काम अप्रतिम आहे.

असोसिएशनचे नूतन चेअरमन मनोज म्हेत्रस म्हणाले, बांधकाम व्यवसायिकांसाठी अभ्यास दौऱ्यांचे आयोजन करून अत्याधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक काम आणि विकासाचा नवा दृष्टिकोन बांधकाम व्यवसायिकांना देण्यासाठी प्रयत्नशील राहू. सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून उपक्रम राबवणार आहोत. तसेच बांधकाम व्यावसायिकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही नूतन चेअरमन मनोज म्हेत्रस यांनी सांगितले.

असोसिएशनचे माजी चेअरमन संतोष कलकुटगी यांनी प्रास्ताविक केले. मावळते सचिव जी. के. देशमुख यांनी अहवाल सादरीकरण केले. पल्लवी माने यांनी सूत्रसंचालन तर नूतन सचिव यशवंत पाथरूट यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमास दत्तात्रय मुळे, युवराज चुंबळकर, अशोक गांधी, एम. बी. कावळे, नामदेव म्हेत्रस, सुनील फुरडे, गुरुशांत धुत्तरगावकर, जगन्नाथ जाधव, सचिन देशमुख, संजय साठे, अजय गुजर, कौस्तुभ मोरे, बी. एम. जाधव, राम दुधाळ, अजय अन्नलदास, अभिनव साळुंखे, शशिकांत जिड्डीमनी आदी उपस्थित होते.

असोसिएशनचे नवनियुक्त पदाधिकारी

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची घोषणा करून यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. असोसिएशनचे नवनियुक्त पदाधिकारी पुढीलप्रमाणे – नूतन चेअरमन – मनोज म्हेत्रस, व्हाईस चेअरमन – हणमंत कुलकर्णी, सचिव – यशवंत पाथरूट, सहसचिव – अमोल बंगाळे, खजिनदार – सलिम दर्जी उपस्थित होते.

मालडबा ते ज्येष्ठांचा डबा; ‘परे’चा मोठा निर्णय! ३२ लोकलमध्ये विशेष कंपार्टमेंटची सुरुवात; ज्येष्ठांचा प्रवास सुलभ

Web Title: Devendra kothe builders association india event development growth news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 06:36 PM

Topics:  

  • maharashtra

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात
1

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
3

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’
4

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.