Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv News : पीकविमा प्रकरणात शेतकऱ्यांचा मोठा विजय; विमा कंपनीचे अपील फेटाळले, 7 दिवसांत भरपाईचे आदेश

धाराशिव जिल्ह्यातील खरीप 2025 सोयाबीन पीकविमा प्रकरणात केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीने (TAC) विमा कंपनीचे अपील फेटाळून राज्य तांत्रिक सल्लागार समितीचा (STAC) निर्णय कायम ठेवला आहे. पात्र शेतकऱ्यांना सात दिवसांत पीकविमा भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले असून, 14 वगळलेल्या मंडळांतील शेतकऱ्यांनाही न्याय मिळावा...

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 14, 2026 | 06:32 PM
पीकविमा प्रकरणात शेतकऱ्यांचा मोठा विजय; विमा कंपनीचे अपील फेटाळले, 7 दिवसांत भरपाईचे आदेश

पीकविमा प्रकरणात शेतकऱ्यांचा मोठा विजय; विमा कंपनीचे अपील फेटाळले, 7 दिवसांत भरपाईचे आदेश

Follow Us
Follow Us:

धाराशिव जिल्ह्यातील खरीप 2025 हंगामातील सोयाबीन पीकविमा प्रकरणात शेतकऱ्यांच्या बाजूने महत्त्वाचा निर्णय झाला आहे. केंद्रीय तांत्रिक सल्लागार समिती (TAC) ने विमा कंपनीचे अपील फेटाळून लावत महाराष्ट्र राज्य तांत्रिक सल्लागार समिती (STAC) चा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना सात दिवसांच्या आत पीकविमा भरपाई अदा करण्याचे आदेश संबंधित विमा कंपनीला देण्यात आले आहेत. केंद्रीय समितीने स्पष्ट केले की, विमा कंपनीचे अपील ग्राह्य धरण्यासाठी आवश्यक निकष आणि प्रक्रिया पूर्ण झालेली नव्हती. त्यामुळे राज्य समितीचा निर्णय कायम ठेवण्यात आला. तसेच आदेशाचे पालन न झाल्यास विमा कंपनीवर आर्थिक दंडासह प्रशासकीय कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

आमदार कैलास पाटील यांची भूमिका

या निर्णयानंतर आमदार कैलास पाटील यांनी हा धाराशिवमधील हजारो शेतकऱ्यांच्या संघर्षाचा आणि न्यायाचा विजय असल्याचे म्हटले. मात्र, जिल्ह्यातील 14 मंडळांतील शेतकरी अद्याप या निर्णयाच्या कक्षेबाहेर असल्याचे त्यांनी नमूद केले.

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिराच्या इनाम जमिनींच्या कथित घोटाळ्याची चौकशी; १५ दिवसांत अहवालासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने विशेष बैठक घेऊन या 14 मंडळांतील पात्र शेतकऱ्यांनाही पीकविमा मंजूर करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. “प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात पीकविमा जमा होईपर्यंत आमचा संघर्ष सुरू राहील. उर्वरित 14 मंडळांतील शेतकऱ्यांनाही न्याय मिळाल्याशिवाय ही लढाई थांबणार नाही,” असे कैलास पाटील यांनी स्पष्ट केले.

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे स्वागत

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनीही केंद्रीय समितीच्या निर्णयाचे स्वागत करत हा शेतकऱ्यांच्या न्यायाचा विजय असल्याचे म्हटले. TAC ने STAC चा निर्णय कायम ठेवत पात्र शेतकऱ्यांना सात दिवसांत प्रलंबित पीकविमा देण्याचे आदेश दिले आहेत, यामुळे 2025 च्या पीकविम्याचा मार्ग मोकळा झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, आदेशाचे पालन न झाल्यास विमा कंपनीवर आर्थिक दंड आणि प्रशासकीय कारवाई होऊ शकते. त्यामुळे धाराशिवमधील हजारो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. “हा विजय जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या हक्काचा, न्यायाचा आणि सातत्यपूर्ण लढ्याचा आहे. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाईची रक्कम जमा होईपर्यंत पाठपुरावा सुरू राहील,” असे राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या अपेक्षा

या निर्णयामुळे पात्र शेतकऱ्यांना लवकरच पीकविमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असला, तरी 14 वगळलेल्या मंडळांतील शेतकऱ्यांनाही समान न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आता राज्य सरकार आणि संबंधित यंत्रणा याबाबत पुढील निर्णय काय घेतात, याकडे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

एससी आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात धाराशिवमध्ये रणशिंग; समन्वय समिती जाहीर, संविधान बचाव मोर्चाच्या तारखेवरून चर्चा

Web Title: Dharashiv soybean crop insurance tac order compensation kailas patil ranajagjitsinh patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 06:32 PM

Topics:  

  • Dharashiv
  • maharashtra

संबंधित बातम्या

Navi Mumbai News: नवी मुंबई अँटी करप्शनची धडक कारवाई; रिक्षा परमिट ट्रान्सफरसाठी लाच घेताना RTO एजंट ताब्यात
1

Navi Mumbai News: नवी मुंबई अँटी करप्शनची धडक कारवाई; रिक्षा परमिट ट्रान्सफरसाठी लाच घेताना RTO एजंट ताब्यात

Chiplun News: खडपोलीकरांची प्रतीक्षा संपणार! डेक स्लॅब-जोडरस्त्यांचे काम सुरू, जानेवारीत पूल खुला होण्याची शक्यता
2

Chiplun News: खडपोलीकरांची प्रतीक्षा संपणार! डेक स्लॅब-जोडरस्त्यांचे काम सुरू, जानेवारीत पूल खुला होण्याची शक्यता

Mira Bhayandar News: कोट्यवधींच्या वास्तूंची दुरवस्था! मीरा-भाईंदर महापालिकेच्या निष्काळजीपणाचा कळस
3

Mira Bhayandar News: कोट्यवधींच्या वास्तूंची दुरवस्था! मीरा-भाईंदर महापालिकेच्या निष्काळजीपणाचा कळस

दैनंदिन कचरा संकलनात होणारा खोळंबा टळणार! बंद पडणाऱ्या वाहनांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी पालिकेची १.४८ कोटींची नवी यंत्रणा
4

दैनंदिन कचरा संकलनात होणारा खोळंबा टळणार! बंद पडणाऱ्या वाहनांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी पालिकेची १.४८ कोटींची नवी यंत्रणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.