Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv News: हजारांत गप्प, लाखांत सेटलमेंट! ४०० केव्ही लाईन प्रकल्पात शेतकऱ्यांची लूट? दमडीच्या भावात जमिनी घेतल्याचे आरोप

४०० केव्ही हाय व्होल्टेज लाईन प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अत्यल्प मोबदल्यात घेतल्या जात असल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. काही शेतकऱ्यांना हजारो रुपयांत गप्प केले जात असल्याचे समोर आलं आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 09, 2026 | 03:26 PM
हजारांत गप्प, लाखांत सेटलमेंट! ४०० केव्ही लाईन प्रकल्पात शेतकऱ्यांची लूट? दमडीच्या भावात जमिनी घेतल्याचे आरोप (फोटो सौजन्य-ChatGPT)

हजारांत गप्प, लाखांत सेटलमेंट! ४०० केव्ही लाईन प्रकल्पात शेतकऱ्यांची लूट? दमडीच्या भावात जमिनी घेतल्याचे आरोप (फोटो सौजन्य-ChatGPT)

Follow Us
Close
Follow Us:
  • शेतकऱ्यांना हजारोंत केलेजतेय गप्प
  • ठाम उभ्या राहिलेल्यांना लाखोंचा मोबदला
  • व्हिडिओ, दबाव, गुन्हे आणि प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न
शीतलकुमार शिंदे । धाराशिव : धाराशिव, तुळजापूर, वाशी, परांडा परिसरात सुरू असलेल्या ४००केव्ही हाय व्होल्टेज वीजवाहिनी प्रकल्पामुळे ग्रामीण भागात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. कार्ला, तोरंबा, ताकविकी, बामणी, केशेगावसह अनेक गावांतील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाच्या कामकाजावर फसवणुकीसह अन्य अनेक गंभीर आरोप केले आहेत. विकासाच्या नावाखाली शेतीवर अतिक्रमण, मोबदल्यात मोठी तफावत, मानसिक दबाव, व्हिडिओ ब्लॅकमेल, गुन्हे दाखल करण्याची भीती आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.

सुरुवात गोड बोलण्याने, शेवट दबावाने?

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला कंपनीचे प्रतिनिधी गावात येतात.“सरकारी प्रकल्प आहे”,“देशाच्या विकासासाठी काम आहे”, “मोबदला मिळेल”, “मोठे नुकसान होणार नाही” अशी आश्वासने दिली जातात. यानंतर मोजमाप सुरू होते, शेतात मशिनरी उतरते, टॉवरचे खड्डे खोदले जातात आणि काम वेगाने पुढे नेले जाते. अनेक ठिकाणी स्पष्ट लिखित संमती घेण्यापूर्वीच काम सुरू झाल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.

Mumbai News: जे. जे. ला मिळणार ‘ब्रॉन्कोस्कोप’ प्रणाली! इंडियन ऑईलच्या सीएसआर उपक्रमातून दर्जेदार उपचाराची सोय

प्रति गुंठा ३५०० चा ‘अधिकृत’ दर; पण प्रत्यक्ष व्यवहार लाखोंत?

मोबदल्याच्या बाबतीत सर्वात मोठी विसंगती समोर येत आहे. अनेक शेतकऱ्यांना प्रति गुंठा फक्त ३५०० ते ७००० रुपये दर सांगितला जातो. “रेडी रेकनरनुसार हाच अंतिम दर” असे सांगून व्यवहार पूर्ण करण्याचा प्रयत्न होतो. मात्र विरोध करणाऱ्या किंवा ठाम भूमिका घेणाऱ्या शेतकऱ्यांसोबत लाखोंमध्ये व्यवहार झाल्याचे आरोप समोर आले आहेत.

धक्कादायक आरोप काय?

अधिकृत कागदावर कमी मोबदला दाखवला जातो. उर्वरित मोठी रक्कम “सहकार्य”, “समन्वय”, “कामासाठी मदत” अशा वेगळ्या शीर्षकाखाली दिली जाते. एकाच व्यवहारासाठी दोन किंवा तीन स्टॅम्प पेपर वापरले जातात. उदाहरण म्हणून समोर आलेला दावा
अधिकृत मोबदला : सुमारे ७० हजार रुपये
स्वतंत्र करारातील रक्कम : ५ लाख ३० हजार रुपये
एकूण व्यवहार : जवळपास ६ लाख रुपये
यामुळे “अधिकृत दर” आणि “प्रत्यक्ष व्यवहार” यामध्ये मोठी दरी असल्याचा आरोप केला जात आहे.

विरोध केला की सुरू होतो ‘माईंड गेम’?

शेतकऱ्यांच्या आरोपानुसार, विरोध सुरू होताच परिस्थिती बदलते. शेतात काम सुरू ठेवले जाते मुद्दाम वाद घालण्याचा प्रयत्न होतो. शेतकऱ्याला चिडवले जाते, संतापलेल्या प्रतिक्रियेचे मोबाईल व्हिडिओ शूट केले जातात. यानंतर हेच व्हिडिओ पोलिसांकडे पाठवले जात असल्याचा आरोप आहे. परिणामी, स्वतःच्या जमिनीसाठी उभा राहिलेला शेतकरीच “कामात अडथळा आणणारा”, “धमकी देणारा” किंवा “गोंधळ घालणारा” म्हणून दाखवला जातो.

“मोबदला मागितला तर गुन्हा?”

तांदुळवाडी प्रकरण २२ जून २०२५ रोजी वाशी तालुक्यातील तांदुळवाडी येथे योग्य मोबदल्यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याला पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप झाला होता. स्वतःच्या जमिनीसाठी उभा राहिलेला शेतकरीच आरोपी ठरल्याची चर्चा जिल्हाभर झाली.
सारोळा (मा.) प्रकरण१५ ऑक्टोबर २०२५ रोजी योग्य मोबदल्यासाठी गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घातल्यानंतर तब्बल ८० शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

ग्रामीण भागात आता एकच भावना व्यक्त होत आहे

“मोबदला मागितला तर गुन्हा…
जमीन वाचवली तर गुन्हा…
आवाज उठवला तरी गुन्हा…”

गावांमध्ये बाऊन्सर, दहशत आणि प्रशासन शांत?

तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा परिसरात ५० हून अधिक वाहनांसह बाऊन्सर दाखल झाल्याची घटना चर्चेत आली होती. गावात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे आरोप झाले. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले, मात्र प्रशासनाने ठोस कारवाई केली नसल्याची टीका होत आहे.

कार्ला शिवारातील शेतकऱ्याने बदलला ‘खेळ’?

तुळजापूर तालुक्यातील कार्ला शिवारात मात्र परिस्थिती वेगळी घडल्याचा दावा करण्यात येत आहे.
तोरंबा येथील कृष्णाथ कुलकर्णी यांच्या शेतातून 400 KV लाईन नेण्याचे काम सुरू झाले. सुरुवातीला त्यांना प्रति गुंठा ३५०० रुपये दराने सुमारे २१ हजार रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा दावा आहे.

Kalyan News : “मुस्लिम नागरिकांना आम्ही घरं देणार नाही” ; कोनगावात अजब फतवा

मात्र कुलकर्णी यांनी स्पष्ट भूमिका घेतली

“आधी योग्य मोबदला, मगच काम.” यानंतर त्यांच्यावर दबाव वाढल्याचे सांगितले जाते. फोन कॉल, समजावणी, अप्रत्यक्ष धमक्या
“सरकारी काम अडवू नका” “केस होईल” “पोलीस येतील” असे प्रकार झाल्याचा आरोप आहे.

२१ हजारांपासून थेट ६ लाखांपर्यंत व्यवहार?

कृष्णाथ कुलकर्णी यांनी माघार घेतली नाही. प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत आणि पोलीस अधीक्षकांपर्यंत पोहोचले.
त्यानंतर ऑफर वाढत गेल्याचा दावा करण्यात आला.

५० हजार
१ लाख
अडीच लाख
३ लाख आणि अखेरीस ६ लाख रुपये
सुमारे ६ गुंठे क्षेत्रासाठी ६ लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचे सांगितले जात आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, अधिकृत कागदावर फक्त ७० हजार रुपयांचा मोबदला उर्वरित ५ लाख ३० हजार रुपये स्वतंत्र करारातून
असा व्यवहार झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

प्रशासनावर प्रश्नचिन्ह

शेतकऱ्यांचा आरोप आहे की, तक्रारी दिल्यानंतरही सुनावण्या उशिरा घेतल्या जातात, तोपर्यंत टॉवर उभे राहतात, तारा ओढल्या जातात
शेती बाधित होते, नंतरची सुनावणी केवळ औपचारिकता ठरते, यामुळे महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

“गप्प बसलात तर हजार… ठाम राहिलात तर लाख?”

या संपूर्ण प्रकरणातून ग्रामीण भागात एकच चर्चा सुरू झाली आहे, गप्प बसणाऱ्यांना कमी मोबदला, विरोध करणाऱ्यांवर दबाव, ठाम उभे राहिलेल्यांना मोठे व्यवहार, ४०० केव्ही किंवा २२० केव्ही वीजवाहिनी म्हणजे फक्त तारा नाहीत; त्या जमिनीच्या भविष्यातील वापरावर कायम परिणाम करणाऱ्या आहेत. मात्र याबाबतची संपूर्ण माहिती शेतकऱ्यांपासून लपवली जात असल्याचा आरोप आहे.

शेवटचा प्रश्न…

जर अधिकृत दर निश्चित असतील, तर काहींना हजारो आणि काहींना लाखो रुपये कसे? जर सर्व प्रक्रिया कायदेशीर असेल, तर वेगवेगळ्या स्टॅम्प पेपरवर स्वतंत्र व्यवहार का? आणि जर विकासासाठीच काम होत असेल, तर शेतकऱ्यांना दबाव, गुन्हे आणि भीतीच्या छायेत का जगावे लागत आहे? ग्रामीण भागात आता एकच भावना तीव्र होत आहे, “बापजाद्यांनी घाम गाळून उभी केलेली जमीन कवडीमोल भावात कंपनीच्या घशात ढकलू नका…”

Web Title: 400kv high voltage line farmers compensation scam allegations marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • Dharashiv
  • Farmers
  • maharashtra

संबंधित बातम्या

Sanjay Nirupam: “पंतप्रधानांनी काय आता पायी चालावे का?”; इंधन बचतीच्या आवाहनावरून विरोधकांना संजय निरुपम यांचे सडेतोड उत्तर
1

Sanjay Nirupam: “पंतप्रधानांनी काय आता पायी चालावे का?”; इंधन बचतीच्या आवाहनावरून विरोधकांना संजय निरुपम यांचे सडेतोड उत्तर

Dharashiv Crime : कळंब पोलीस ठाण्यात ACB ची धडक कारवाई; 36 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद
2

Dharashiv Crime : कळंब पोलीस ठाण्यात ACB ची धडक कारवाई; 36 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

Census 2026 Maharashtra: शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनो सावधान! जनगणनेच्या कामात हलगर्जीपणा केल्यास थेट गुन्हे दाखल होणार
3

Census 2026 Maharashtra: शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनो सावधान! जनगणनेच्या कामात हलगर्जीपणा केल्यास थेट गुन्हे दाखल होणार

Pratap Sarnaik : ओला, उबर, रॅपिडो अडचणीत? महाराष्ट्र सरकारने सायबर विभागाकडे केली FIR ची मागणी
4

Pratap Sarnaik : ओला, उबर, रॅपिडो अडचणीत? महाराष्ट्र सरकारने सायबर विभागाकडे केली FIR ची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.