Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv News: ग्रामीण जनतेसाठी सुलभ सेवा! ई-गव्हर्नन्समुळे धाराशिव प्रशासन अधिक गतिमान

जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमांनी ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला आहे. महसूल विभाग हा थेट ग्रामीण नागरिकांशी निगडित असलेला विभाग आहे

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 29, 2026 | 04:36 PM
ग्रामीण जनतेसाठी सुलभ सेवा! ई-गव्हर्नन्समुळे धाराशिव प्रशासन अधिक गतिमान

ग्रामीण जनतेसाठी सुलभ सेवा! ई-गव्हर्नन्समुळे धाराशिव प्रशासन अधिक गतिमान

Follow Us
Follow Us:

 

  • ग्रामीण जनतेसाठी सुलभ सेवा!
  • ई-गव्हर्नन्समुळे धाराशिव प्रशासन अधिक गतिमान
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स विशेष कृती कार्यक्रमांतर्गत धाराशिव जिल्ह्याने राज्यात तृतीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. हे यश केवळ एक क्रमांक नसून, जिल्ह्यातील प्रशासनात विशेषतः महसूल विभागात झालेल्या डिजिटल परिवर्तनाचे द्योतक मानले जात आहे.

जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमांनी ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला आहे. महसूल विभाग हा थेट ग्रामीण नागरिकांशी निगडित असलेला विभाग आहे. जमीन नोंदी, शेत रस्ते, विविध प्रमाणपत्रे, तक्रारींचे निराकरण अशा अनेक बाबींमध्ये नागरिकांना या विभागाशी सतत संपर्क असतो. ई-गव्हर्नन्समुळे सेवा सुलभ, जलद आणि पारदर्शक झाल्याने नागरिकांचा वेळ, श्रम आणि खर्च वाचत आहे.

धाराशिव जिल्ह्यात विकसित करण्यात आलेल्या डिस्ट्रिक्ट डॅशबोर्ड प्रणालीमुळे विविध शासकीय योजनांचा एकत्रित आढावा घेणे सुलभ झाले आहे. यामुळे महसूल प्रशासनाला योजनांची अंमलबजावणी, प्रगती आणि पाठपुरावा अधिक प्रभावीपणे करता येत आहे. निर्णय प्रक्रियेला वेग मिळाल्याने नागरिकांच्या समस्यांवर त्वरित उपाययोजना शक्य होत आहेत. कल्पवृक्ष – स्मार्ट जीआर प्रणाली ही महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरली आहे. शासन निर्णय, परिपत्रके आणि कायदे यांची अद्ययावत माहिती एका क्लिकवर उपलब्ध होत असल्याने कामकाज अधिक अचूक आणि सुसंगत झाले आहे. यामुळे निर्णय घेताना होणाऱ्या त्रुटी कमी होऊन प्रशासनातील पारदर्शकता वाढली आहे.

ग्रामीण भागाशी थेट संबंध असलेली जीवनरेखा प्रणाली, डिजिटल परिवर्तनाची महत्त्वाची कडी ठरली आहे. गट नंबर व सर्वे नंबरनिहाय शेत रस्त्यांची नोंद केल्यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारींचे जलद निराकरण शक्य झाले आहे. परिणामी शेती उत्पादन, वाहतूक आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. महसूल विभागाच्या कामकाजात यामुळे अधिक सुसूत्रता आणि जबाबदारीची भावना निर्माण झाली आहे.

ई-गव्हर्नन्समध्ये धाराशिवचा डंका! राज्यस्तरीय स्पर्धेत पटकावला तृतीय क्रमांक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव

तुळजाई चॅटबॉटमुळे ग्रामीण नागरिकांना विविध योजनांची माहिती घरबसल्या मिळू लागली आहे. संजय गांधी योजना, पुरवठा विभाग, नैसर्गिक आपत्ती यांसारख्या सेवांची माहिती काही क्षणांत मिळत असल्याने नागरिकांचा प्रशासनावर विश्वास अधिक दृढ होत आहे.

ई-ऑफिस प्रणालीमुळे पेपरलेस कार्यालय संकल्पना प्रत्यक्षात येत असून संचिकांची हालचाल वेगवान झाली आहे. महसूल विभागातील कामकाज अधिक पारदर्शक, उत्तरदायी आणि वेळेत पूर्ण होऊ लागले आहे. यामुळे नागरिकांच्या कामांना विलंब न होता सेवा वितरण अधिक विश्वासार्ह बनले आहे.

या सर्व उपक्रमांच्या यशामागे जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सांघिक प्रयत्न महत्त्वाचे ठरले आहेत. जिल्हाधिकारी पुजार यांनीही अत्याधुनिक तंत्रज्ञान, विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)चा वापर वाढवून प्रशासन अधिक सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

एकूणच, ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमामुळे धाराशिव जिल्ह्यातील महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख बनले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना सुलभ सेवा देण्याच्या दिशेने हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे असून, भविष्यातील सुशासनाचा मजबूत पाया म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.

पवन ऊर्जा प्रकल्पांचा ‘काळा’ कारभार! मोबदला मागणाऱ्या खानापूरच्या शेतकऱ्यांवर ‘खंडणी’चे गुन्हे; कंपन्यांचा मनमानी कारभार उघड

Web Title: Accessible services for rural citizens dharashiv administration becomes more dynamic through e governance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 04:36 PM

Topics:  

  • Dharashiv
  • Dharashiv News

संबंधित बातम्या

हिमोफिलिया आजारावरील जगातील पहिल्या आयुर्वेदिक संशोधन प्रकल्पाचा समारोप; ‘धाराशिव पॅटर्न’ची राष्ट्रीय पातळीवर दखल
1

हिमोफिलिया आजारावरील जगातील पहिल्या आयुर्वेदिक संशोधन प्रकल्पाचा समारोप; ‘धाराशिव पॅटर्न’ची राष्ट्रीय पातळीवर दखल

Dharashiv News : शासकीय दिनदर्शिकेला फाटा? धाराशिवमध्ये शाहू महाराज जयंती २५ जूनला साजरी केल्याने प्रश्नचिन्ह
2

Dharashiv News : शासकीय दिनदर्शिकेला फाटा? धाराशिवमध्ये शाहू महाराज जयंती २५ जूनला साजरी केल्याने प्रश्नचिन्ह

२०२९ च्या पंतप्रधानपदासाठी भाजपात रस्सीखेच; फोडाफोडीचे राजकारण सुरू – उद्धव ठाकरे
3

२०२९ च्या पंतप्रधानपदासाठी भाजपात रस्सीखेच; फोडाफोडीचे राजकारण सुरू – उद्धव ठाकरे

धाराशिवमध्ये 500 कोटींचे प्लॉट खरेदी, ओमराजेंच्या मागे ईडी लागली? संजय राऊतांचा गंभीर आरोप
4

धाराशिवमध्ये 500 कोटींचे प्लॉट खरेदी, ओमराजेंच्या मागे ईडी लागली? संजय राऊतांचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.