Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुकीत रंगत! भाजपाचा प्रभाग निहाय झंझावाती प्रचार, आमदारांसह सर्व पाटील कुटुंबीय मैदानात

धाराशिव नगरपालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात! नगराध्यक्ष उमेदवार नेहा काकडे यांच्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील, मल्हार पाटील आणि अर्चना पाटील यांच्यासह संपूर्ण भाजप कुटुंब प्रभागनिहाय झंझावाती प्रचार करत आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 30, 2025 | 07:32 PM
धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुकीत रंगत!

धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुकीत रंगत!

Follow Us
Close
Follow Us:

 

  • धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुकीत रंगत!
  • पाटील कुटुंबाचा झंझावात
  • भाजपचा ‘वचननामा’ प्रसिद्ध, खासदार ओमराजेंची टीका
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : शहरातील नगरपालिकेच्या निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात असून निवडणुकांसाठी स्वतः व्यक्तिशः राणाजगजितसिंह पाटील, आमदारपुत्र मल्हार पाटील यांच्यासह त्यांच्या माता जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चना पाटील यांनी शहरातील प्रत्येक प्रभाग पिंजून काढत आहेत. प्रत्येक प्रभागातील उमेदवारांसह नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नेहा काकडे यांना सोबत घेत पदयात्रा काढल्या जात आहेत. घरोघरी जात प्रचाराचा वेग वाढवला आहे. त्यास लोकांचाही प्रतिसाद मिळत असून प्रचारात रंगत वाढली आहे.

मागील कांही दिवसांपासून धाराशिव शहरातील भीमनगर, बौद्धनगर, खिरणीमळा, नेहरू चौक, काळा मारुती चौक, निंबाळकर गल्ली, माऊली चौक, दर्गा रोड, अण्णाभाऊ साठे चौक, आंबेडकर नगर, खाजानगर, गणेश नगर, समर्थ नगर, बार्शीनाका, तांबरी विभाग, बँक कॉलनी, पोस्ट कॉलनी, शाहू नगर आदींसह शहरातील सर्व भागात प्रचारासाठी कॉर्नर सभा आणि पदयात्रांत आघाडी घेतली आहे. यामुळे विरोधी पक्षांनाही प्रचारात आपली यंत्रणा ताकतीने उतरविणे भाग पडले असून त्यांच्याही प्रभागनिहाय पदयात्रा होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

हे देखील वाचा: तुळजापूरमध्ये ‘पिंटू गंगणे’ यांचे वर्चस्व कायम? १५ वर्षांच्या विकासावर भाजपला पुन्हा विजयाची अपेक्षा!

दरम्यान भाजपाने वचननामा नावाने आपला २८ कलमी जाहीरनामा प्रसिद्ध केला असून शहरातील रस्ते, गटारी, आरोग्य, शिक्षण, मनोरंजन आणि सुरक्षा व्यवस्था यांसह अन्य विषयांच्या आगामी पांच वर्षात करावयाच्या कामाचे यात वचन देण्यात आले आहे. २४ कोटींचा निधी खर्चून शहरात ठिकठिकाणी चार बगीचे, उद्याने निर्माण करण्यात येणार आहेत. शहरातील मोक्यांच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात येणार आहेत. ५०० खाटांच्या मंजूर रुग्णालयाची निर्मिती करण्यात येणार आहे. नगरपालिकांच्या शाळांची गुणवत्ता वाढ करण्यासाठी सर्व शाळांना आधुनिक करण्यात येणार आहे. शहरातील रस्ते आणि गटारींचे बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे. महिलांसाठी अत्याधुनिक व्यायामशाळेसह पदवीधर विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका निर्माण करण्याचे यात वचन देण्यात आले आहे.

दरम्यान राणा पाटील आणि परिवाराचा भाजपासाठी प्रचाराचा झंझावात पाहता अनेक संघटना आणि अपक्ष उमेदवार त्यांना पाठिंबा देत असून वेगवेगळ्या विभागातील अनेक विरोधी पक्षातील लोक भाजपात दाखल होत आहेत. शहरातील पारधीपीडी हा परिसर काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र तिथे मोठ्या प्रमाणात भाजपाला जनसमर्थन मिळत असल्याचे दिसून येत असून काल निघालेल्या रॅलीत महिला, वृद्धांसह मोठ्याप्रमाणात पारधी समाज बांधव मल्हार पाटील यांच्या नेतृत्वात निघालेल्या रॅलीत सहभागी झाले होते.

खासदार ओम राजेंचा प्रहार

यावर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी जोरदार टीका केली असून या वचननाम्याचा समाचार घेतला आहे. मागील चाळीस वर्षात आपल्या घराण्याची या जिल्ह्यावर सत्ता असताना कांहीही न करणाऱ्या लोकांनी वचननामा प्रसिद्ध करून दिलेली आश्वासने ही लोकांची फसवणूक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हे देखील वाचा: Dharashiv News: धाराशिवमध्ये ८ नगरपरिषद निवडणुका: २८७ केंद्रांवर होणार मतदान, ३ डिसेंबरला निकाल

Web Title: Dharashiv municipality elections in full swing bjps ward wise campaigning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 07:31 PM

Topics:  

  • BJP
  • Dharashiv
  • Maharashtra Local Body Election

संबंधित बातम्या

Sunil Shelke Vs Bala Bhegade : ZP व पंचायत समिती निवडणुकीच्या युतीवरुन मामा भाच्यांत युद्ध
1

Sunil Shelke Vs Bala Bhegade : ZP व पंचायत समिती निवडणुकीच्या युतीवरुन मामा भाच्यांत युद्ध

“हिंमत असेल तर मतपत्रिकेवर निवडणूक घ्या…” नाना पटोलेंचं भाजपला खुलं आव्हान; शिंदे-अजित पवारांबाबत केला मोठा दावा
2

“हिंमत असेल तर मतपत्रिकेवर निवडणूक घ्या…” नाना पटोलेंचं भाजपला खुलं आव्हान; शिंदे-अजित पवारांबाबत केला मोठा दावा

Rahul Gandhi on Central Govt: ‘पंतप्रधान मोदी गरिबांना उपाशी पाहू इच्छितात…’, मनरेगा चौपाल येथे राहुल गांधींची केंद्रावर टीका
3

Rahul Gandhi on Central Govt: ‘पंतप्रधान मोदी गरिबांना उपाशी पाहू इच्छितात…’, मनरेगा चौपाल येथे राहुल गांधींची केंद्रावर टीका

काशीतील हिंदुंची शेकडो मंदिरे उद्वस्थ, PM मोदी अन् योगींनी माफी मागावी; नाना पटोलेंची मागणी
4

काशीतील हिंदुंची शेकडो मंदिरे उद्वस्थ, PM मोदी अन् योगींनी माफी मागावी; नाना पटोलेंची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.