तुळजापूरमध्ये 'पिंटू गंगणे' यांचे वर्चस्व कायम? (Photo Credit- X)
विकासाच्या कामांमुळे जनाधार
गंगणे यांच्या नगराध्यक्षपदाच्या काळातील जलपुरवठा सुधारणा, रस्ते दुरुस्ती, स्वच्छता उपक्रम, शहरातील सुविधा उभारणी ही कामे सामान्य नागरिकांच्या मनात ठसा उमटवून गेली आहेत. परिपूर्ण कारभाराची सलगता जनतेला हवी असून “विकासाचे चाक थांबू देणार नाही” अशा भावनेने गंगणे समर्थकांनी प्रचारयंत्रणा आक्रमक केली आहे.
राणा पाटलांची ठाम साथ
भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची गंगणे यांना मिळालेली ठाम साथ हा गंगणे यांच्यासाठी महत्त्वाचा बळकटीबिंदू मानला जात आहे. शहरातील गल्लीबोळात तरुणांपासून महिलांपर्यंत सर्वच स्तरांमधील सकारात्मक प्रतिसादामुळे गंगणे यांच्या विजयाची शक्यता अधिक बळावली असल्याचे निरीक्षकांचे म्हणणे आहे.
गंगणे यांनी व्यक्त केला विश्वास
“१५ वर्षांच्या कारभारात तुळजापूरला विकासाचा नवा चेहरा दिला. भावी पिढीसाठी अजून मोठ्या योजना राबवायच्या आहेत. जनता पुन्हा विश्वास दाखवेल,” असा विश्वास गंगणे यांनी व्यक्त केला आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार अमर मगर यांनी लढत चुरशीची केली असली, तरी गंगणे यांचा अनुभव, जनाधार आणि ठोस कामगिरी पाहता त्यांच्या विजयाला बळ मिळत असून ३ नोव्हेंबरला विकासाचा झेंडा पुन्हा फडकताना दिसू शकेल, अशी जनतेतील चर्चा सध्या रंगत आहे.






