Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv News: वीजचोरी ते फिडर ट्रिपिंग; महावितरणचा अधिकाऱ्याला दणका! अधीक्षक अभियंता संजय आडे यांच्यावर निलंबनाची कारवाई

Dharashiv News: वीजचोरीविरोधातील कारवाईत अपयश, थकबाकी वसुलीतील दिरंगाई तसेच स्मार्ट मीटर पडताळणी, ट्रान्सफॉर्मर बिघाड आणि फिडर ट्रिपिंगसह विविध कामांतील त्रुटींवर महावितरणने कठोर भूमिका घेतली आहे. २४ ऑगस्टच्या आदेशानुसार धाराशिवचे अधीक्षक अभियंता संजय आडे यांना निलंबित करण्यात आले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 25, 2026 | 01:42 PM
वीजचोरी ते फिडर ट्रिपिंग; महावितरणचा अधिकाऱ्याला दणका! धाराशिवचे अधीक्षक अभियंता संजय आडे यांच्यावर निलंबनाची कारवाई (फोटो सौजन्य-ChatGPT)

वीजचोरी ते फिडर ट्रिपिंग; महावितरणचा अधिकाऱ्याला दणका! धाराशिवचे अधीक्षक अभियंता संजय आडे यांच्यावर निलंबनाची कारवाई (फोटो सौजन्य-ChatGPT)

Follow Us
Follow Us:
  • महावितरणचा अधिकाऱ्याला दणका!
  • धाराशिवचे अधीक्षक अभियंता संजय आडे यांच्यावर निलंबनाची कारवाई
  • वीजचोरी ते फिडर ट्रिपिंग; कामातील त्रुटी भोवल्या
 

शीतलकुमार शिंदे । धाराशिव : वीजचोरी रोखणे, थकीत वीजबिलांची वसुली करणे, स्मार्ट मीटर ग्राहकांची पडताळणी पूर्ण करणे आणि वीज वितरणातील तांत्रिक बिघाड कमी करणे या महत्त्वाच्या आघाड्यांवर धाराशिव मंडळाची कामगिरी असमाधानकारक ठरल्याने महावितरणने धाराशिव मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय श्रावण आडे यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई केली आहे. छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक तथा सक्षम अधिकारी धनंजय औंढेकर यांनी निलंबन आदेश जारी केला आहे. आदेशात आडे हे १४ ऑक्टोबर २०२४ पासून धाराशिव मंडळात अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. (Dharashiv News)

वरिष्ठांच्या वारंवार सूचनांनंतरही कामगिरीत सुधारणा नाही

महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी २७ एप्रिलपासून ८ ऑगस्टपर्यंत विविध तारखांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतलेल्या आढावा बैठकीत कामगिरी सुधारण्याच्या सूचना दिल्या होत्या. विशेषतः स्मार्ट मीटर बसविल्यानंतर बिल न भरल्यामुळे स्वयंचलितपणे वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांची १०० टक्के पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या पडताळणीमुळे वीजचोरी अथवा अनधिकृत वीजवापर रोखण्यासोबतच थकीत वीजबिलांची वसुली करण्यास मदत होणे अपेक्षित होते. मात्र २० ऑगस्टच्या आढावा बैठकीत धाराशिव मंडळाची कामगिरी समाधानकारक नसल्याचे निदर्शनास आले.

पुणे महापालिकेत भाजप-राष्ट्रवादीचा वाद पेटला; सुनील टिंगरेंचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

वीज वितरणातील गळती १९.७८ टक्क्यांवरून ३०.३७ टक्क्यांवर

आदेशातील निरीक्षणानुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये धाराशिव मंडळातील लघुदाब वाहिनीची वितरण व AT&C वीजहानी १९.७८ टक्के होती. आर्थिक वर्ष २०२६-२७च्या पहिल्याच तिमाहीत ही वीजहानी वाढून ३०.३७ टक्क्यांवर गेल्याचे आदेशात नमूद आहे. त्यामुळे वीज वितरणातील गळती कमी करण्याच्या कामगिरीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

१७,३९८ ग्राहक पडताळणीसाठी प्रलंबित

स्मार्ट मीटरमुळे स्वयंचलितपणे वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांपैकी धाराशिव मंडळात तब्बल १७,३९८ ग्राहकांची पडताळणी प्रलंबित होती. त्यापैकी १०,५६९ ग्राहकांची पडताळणी झाल्याचे आदेशात नमूद असून, अद्याप ३९.२ टक्के ग्राहकांची पडताळणी बाकी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. वरिष्ठांनी वारंवार सूचना देऊनही एवढ्या मोठ्या प्रमाणावर पडताळणी प्रलंबित राहणे ही बाब महावितरणने गंभीर मानली.

२,४०० वीजचोरी प्रकरणांचे उद्दिष्ट; प्रत्यक्षात केवळ ३५९ कारवाया

धाराशिव मंडळाला २,४०० वीजचोरी प्रकरणे पकडण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र एप्रिल ते जुलै या कालावधीत केवळ ३५९ वीजचोरीची प्रकरणे पकडल्याचे आदेशात नमूद आहे. ऑगस्ट २०२६मध्येही कारवाई अत्यल्प झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

याहून गंभीर बाब म्हणजे पकडण्यात आलेल्या वीजचोरी प्रकरणांमध्येही दंडात्मक किंवा फौजदारी कारवाई प्रलंबित असल्याचे आदेशात नमूद आहे. त्यामुळे वीजचोरी रोखण्याबरोबरच कंपनीचा महसूल सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीनेही मंडळाची कामगिरी अपुरी ठरल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.

१,१५० ग्राहकांकडून अनधिकृत वीजवापर; FIR मात्र शून्य

पडताळणी झालेल्या ग्राहकांपैकी १,१५० ग्राहक अनधिकृतपणे वीज वापरत अथवा वीजचोरी करत असल्याचे आढळले. त्यापैकी केवळ ५८ ग्राहकांवर वीज कायद्यातील कलम १३५ आणि तीन ग्राहकांवर कलम १२६ अंतर्गत कारवाई करण्यात आली. मात्र एकाही प्रकरणात FIR दाखल झालेला नसल्याचे निलंबन आदेशात नमूद आहे. याशिवाय पडताळणी झालेल्या ग्राहकांपैकी केवळ ५,६०४ ग्राहक ‘अंधारात’ असल्याची माहिती देण्यात आली असून, हे प्रमाण पडताळणी झालेल्या ग्राहकांच्या ५३ टक्के असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

पॉवर ट्रान्सफॉर्मरचे बिघाड वाढले

तांत्रिक पातळीवरही धाराशिव मंडळाची कामगिरी समाधानकारक नसल्याचे आदेशातून समोर आले आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६मध्ये चार पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाले होते. त्याच्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२६-२७मध्ये २४ ऑगस्ट २०२६पर्यंत सहा पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याचे नमूद आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ट्रान्सफॉर्मर बिघाडाचे प्रमाण ५० टक्क्यांनी वाढल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

DTC बिघाडाचे प्रमाणही वाढले

आर्थिक वर्ष २०२५-२६मध्ये एप्रिल ते जुलै या कालावधीत DTC नादुरुस्त होण्याचे प्रमाण ५.६८ टक्के होते. २०२६-२७च्या याच कालावधीत ते वाढून ५.७४ टक्के झाल्याचे आदेशात नमूद आहे. त्यामुळे वितरण यंत्रणेतील तांत्रिक बिघाड कमी करण्याच्या प्रयत्नांवरही महावितरणने नाराजी व्यक्त केली आहे.

३४,२१६ थकबाकीदार ग्राहक; महिन्याचे काम अद्याप अपूर्ण

५ हजार रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या नॉन-स्मार्ट मीटर ग्राहकांची यादी ४ मे रोजी क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आली होती. अशा ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करून मीटर काढणे आणि थकबाकी भरल्यानंतर स्मार्ट मीटर बसवून पुरवठा सुरू करणे, हे काम एका महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश होते.

मात्र धाराशिव मंडळातील ३४,२१६ ग्राहकांपैकी केवळ १०,३२१ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. तब्बल २०,७९६ ग्राहक थकबाकी न भरताही वीज वापरत असल्याचे आदेशात नमूद आहे. तसेच या यादीतील केवळ ६,८०४ ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्यात आल्याचे आढळले.

फिडर ट्रिपिंगचा वाढता त्रास

औद्योगिक फिडर्सवरील वारंवार व्यत्ययाबाबतही महावितरणने गंभीर निरीक्षण नोंदविले आहे. धाराशिव मंडळातील २३ नॉन-अॅग्रीकल्चरल/औद्योगिक फिडर्सवर एप्रिलमध्ये ४३, मेमध्ये ९९, जूनमध्ये ८२ आणि जुलैमध्ये १०० forced outages नोंदविण्यात आले आहेत.

तामलवाडी ३३ केव्ही फिडरची सरासरी ट्रिपिंग संख्या एप्रिलमध्ये १५, मेमध्ये ८, जूनमध्ये १७ आणि जुलैमध्ये २४ इतकी होती. येणेगूर ३३ केव्ही फिडरवरही अनुक्रमे ११, १८, २६ आणि २४ अशी सरासरी ट्रिपिंग नोंदविण्यात आली. या व्यत्ययांमध्ये सुधारणा करण्याच्या सूचना देऊनही अपेक्षित सुधारणा झाली नसल्याचे निलंबन आदेशात स्पष्टपणे नमूद आहे.

‘गंभीर स्वरूपाचे गैरकृत्य’ ठरवत निलंबन

वरील सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर संबंधित कृत्ये गैरकृत्याच्या सदरात येत असून ती गंभीर स्वरूपाची आहेत, असे महावितरणने आदेशात नमूद केले आहे. अधीक्षक अभियंता या पदावर संजय आडे यांना कायम ठेवणे कंपनीच्या कामकाजास व हितसंबंधास बाधक ठरणार असल्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित कर्मचारी सेवाविनियम २००५ मधील विनियम क्र. ८८(क) आणि अनुसूची ‘ग’ तसेच सुधारचिठ्ठी क्र. ४२, दिनांक ४ मे २०१९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून सक्षम अधिकाऱ्यांनी आडे यांना आदेशाच्या दिनांकापासून पुढील कार्यवाही होईपर्यंत महावितरणच्या सेवेतून निलंबित केले आहे.

निलंबन काळात छत्रपती संभाजीनगर येथे हजेरी

निलंबन काळात आडे यांना कार्यालयीन कामकाजाच्या ठराविक दिवशी छत्रपती संभाजीनगर येथील संबंधित कार्यालयात हजेरी देण्याचे आदेश आहेत. निलंबन काळात नियमांनुसार निर्वाह भत्ता देय राहणार असून, सक्षम परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नसल्याचे आदेशात नमूद आहे.

आकडे बोलतात; आता जबाबदारीही ठरली!

वीजचोरीविरोधातील कारवाईचे अपुरे प्रमाण, हजारो ग्राहकांची प्रलंबित पडताळणी, मोठ्या प्रमाणातील थकबाकीदार ग्राहकांवर अपेक्षित कारवाईचा अभाव, ट्रान्सफॉर्मर व DTC बिघाडात वाढ आणि वारंवार ट्रिप होणारे फिडर्स—या सर्व बाबी एकत्रितपणे पाहता धाराशिव मंडळाच्या कामकाजावर महावितरणने गंभीर ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे केवळ एका अधिकाऱ्याचे निलंबन करून प्रश्न संपणार की या त्रुटींमागील संपूर्ण प्रशासकीय साखळीचीही जबाबदारी निश्चित होणार, याकडे आता धाराशिवकरांचे लक्ष लागले आहे.

पुणे जिल्ह्यात FDA ची पुन्हा मोठी कारवाई; भेसळयुक्त अन्नसाठ्यांवर कारवाईचा बडगा

Web Title: Dharashiv news superintending engineer sanjay aade suspended mahadiscom action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 01:42 PM

Topics:  

  • Dharashiv
  • Electricity Bill
  • maharashtra

संबंधित बातम्या

‘महाराष्ट्रात राहायचं असेल तर…’, परप्रांतीय रिक्षाचालकांच्या आंदोलनावरून वाद पेटला; मराठी एकीकरण समितीने दिला थेट इशारा
1

‘महाराष्ट्रात राहायचं असेल तर…’, परप्रांतीय रिक्षाचालकांच्या आंदोलनावरून वाद पेटला; मराठी एकीकरण समितीने दिला थेट इशारा

समुद्राच्या तळाशी दडलेला इतिहास उलगडणार! विजयदुर्ग, जंजिरासह देशातील ५ ठिकाणी पुरातत्व विभागाची शोधमोहीम
2

समुद्राच्या तळाशी दडलेला इतिहास उलगडणार! विजयदुर्ग, जंजिरासह देशातील ५ ठिकाणी पुरातत्व विभागाची शोधमोहीम

Tukaram Mundhe: आता क्रिकेटच्या मैदानाबाहेर FDAची ‘धडाकेबाज बॅटिंग’! MCAच्या फूड आउटलेट्सवर मुंढेंची कारवाई
3

Tukaram Mundhe: आता क्रिकेटच्या मैदानाबाहेर FDAची ‘धडाकेबाज बॅटिंग’! MCAच्या फूड आउटलेट्सवर मुंढेंची कारवाई

मुबलक साठा असताना अचानक साखरेची दरवाढ का? राजू शेट्टी यांचा हल्लाबोल; 20 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
4

मुबलक साठा असताना अचानक साखरेची दरवाढ का? राजू शेट्टी यांचा हल्लाबोल; 20 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.