Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोई येथे ‘पीएमआरडीए’ची ऐतिहासिक मोहीम; 680 अनधिकृत पत्राशेड जमीनदोस्त

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) खेड तालुक्यातील मोई येथे बेकायदेशीर बांधकामांविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी आणि थरारक कारवाई केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 14, 2026 | 07:14 PM
मोई येथे ‘पीएमआरडीए’ची ऐतिहासिक मोहीम; 680 अनधिकृत पत्राशेड जमीनदोस्त

मोई येथे ‘पीएमआरडीए’ची ऐतिहासिक मोहीम; 680 अनधिकृत पत्राशेड जमीनदोस्त

Follow Us
Follow Us:

पिंपरी : पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) खेड तालुक्यातील मोई येथे बेकायदेशीर बांधकामांविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी आणि थरारक कारवाई केली आहे. मौजे मोई येथील ६८ गट क्रमांकांमधील सुमारे ३५ हेक्टर क्षेत्रावर पसरलेली तब्बल ६८० अनधिकृत पत्राशेड आणि व्यावसायिक बांधकामे प्राधिकरणाने भुईसपाट केली. सलग दोन दिवस आणि २० तास चाललेल्या या धडक कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात अनधिकृत बांधकाम करणाऱ्या भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.

 

१ हजार जवान आणि आधुनिक यंत्रसामग्रीचा फौजफाटा

ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने एखाद्या युद्धपातळीवर नियोजन केले होते. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि ‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल १ हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात होता. यामध्ये ६५० पोलीस कर्मचारी, ५० एमएसएफ जवान, राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी आणि प्राधिकरणाच्या १७० कर्मचाऱ्यांचा समावेश होता. सुरक्षेचा उपाय म्हणून अग्निशमन दलाच्या गाड्या आणि महावितरणचे कर्मचारी सज्ज होते. ६८० पत्राशेड हटवण्यासाठी १२ पोकलॅन, १२ जेसीबी, हायड्राक्रेन आणि गॅसकटर अशा आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला.

हे सुद्धा वाचा : दिघीतील ‘एमडी’च्या हायटेक प्रयोगशाळेचा पर्दाफाश; केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण पोलिसांची कारवाई

प्रशासनाचा अचूक समन्वय; शांततेत मोहीम फत्ते

अतिशय संवेदनशील समजल्या जाणाऱ्या या कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची फौज दोन दिवस घटनास्थळी तळ ठोकून होती. दक्षता अधिकारी अमोल झेंडे, सहआयुक्त हिम्मत खराडे यांच्यासह महसूल, आरोग्य आणि पंचायत समितीच्या समन्वयामुळे सलग २० तास चाललेली ही विक्रमी कारवाई अत्यंत शांततेत पार पडली.

“प्राधिकरणाच्या हद्दीत बेकायदेशीर पत्राशेड किंवा बांधकामे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाहीत. मोई येथील कारवाई ही केवळ सुरुवात आहे. नागरिकांनी अशा अनधिकृत बांधकामांच्या आमिषाला बळी पडू नये, आगामी काळातही ही मोहीम अशीच तीव्र राहील.” — डॉ. अभिजीत चौधरी, महानगर आयुक्त, पीएमआरडीए.

हे सुद्धा वाचा : तीन दिवसांपूर्वीच एकत्र राहायला आले…; प्रेयसीचा गळा चिरून हत्या, काही तासांतच प्रियकराने रेल्वेखाली मारली उडी

Web Title: Pmrda has taken action against unauthorized constructions at moi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 07:14 PM

Topics:  

  • maharashtra
  • PMRDA
  • Police News

संबंधित बातम्या

Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्याने बदलणार नाशिकचा वाहतूक नकाशा; ६५.६ किमी रिंग रोडसह १,४३५ किमी रस्त्यांचा महाप्रकल्प
1

Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्याने बदलणार नाशिकचा वाहतूक नकाशा; ६५.६ किमी रिंग रोडसह १,४३५ किमी रस्त्यांचा महाप्रकल्प

Gondiya News: रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू; बिबट्याचे मुंडके-धड झाले वेगळे! महालगाव शिवारातील घटना
2

Gondiya News: रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू; बिबट्याचे मुंडके-धड झाले वेगळे! महालगाव शिवारातील घटना

Nitesh Rane: दीड-दोन तासांचा प्रवास अवघ्या 15 मिनिटांत! सिंधुदुर्गात सुरू होणार आधुनिक फेरीबोट सेवा
3

Nitesh Rane: दीड-दोन तासांचा प्रवास अवघ्या 15 मिनिटांत! सिंधुदुर्गात सुरू होणार आधुनिक फेरीबोट सेवा

Smart Meter Protest: ‘स्मार्ट मीटर हटवा, अन्यथा उखडून फेकू’; शेकापचे जयंत पाटील यांचा सरकारला इशारा
4

Smart Meter Protest: ‘स्मार्ट मीटर हटवा, अन्यथा उखडून फेकू’; शेकापचे जयंत पाटील यांचा सरकारला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.