Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pratap Sarnaik : महिला ई-रिक्षा योजनेसाठी सरकारचा मोठा निर्णय; अनुदान 40% पर्यंत, बॅटरी तंत्रज्ञान सुधारण्यावर भर

मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) महिला ई-रिक्षा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र मार्ग निश्चित करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. तसेच ई-रिक्षांच्या बॅटरी तंत्रज्ञानात सुधारणा करण्यासाठी संबंधित कंपन्यांसोबत चर्चा करण्याचे आदेश देण्यात आले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 14, 2026 | 05:44 PM
महिला ई-रिक्षा योजनेसाठी सरकारचा मोठा निर्णय; अनुदान 40% पर्यंत, बॅटरी तंत्रज्ञान सुधारण्यावर भर

महिला ई-रिक्षा योजनेसाठी सरकारचा मोठा निर्णय; अनुदान 40% पर्यंत, बॅटरी तंत्रज्ञान सुधारण्यावर भर

Follow Us
Follow Us:
  • एमएमआर भागात पिंक ई-रिक्षांसाठी मार्ग निश्चित करून
  • इलेक्ट्रिक वाहनांना चालना द्या
  • अनुदान 40% पर्यंत, बॅटरी तंत्रज्ञान सुधारण्यावर भर
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) परिसरात महिला ई-रिक्षा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही अशा विशिष्ट मार्गांची आखणी करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले आहेत. तसेच ई-रिक्षांची कार्यक्षमता आणि वेग वाढविण्यासाठी बॅटरी तंत्रज्ञानात सुधारणा करण्याबाबत उत्पादक कंपन्यांशी तातडीने चर्चा करण्यास सांगितले आहे. मंत्रालयात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत महिला ई-रिक्षा योजनेच्या अंमलबजावणीबाबत बैठक पार पडली. या बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रताप सरनाईक यांचा स्तुत्य उपक्रम! वारकऱ्यांसाठी स्वखर्चातून सुरू केली ‘मोफत मोबाईल चार्जिंग’ सुविधा

प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, कमी वेगाच्या ई-रिक्षा मुख्य रस्ते किंवा महामार्गांवर चालविण्याऐवजी अंतर्गत रस्त्यांवर चालवल्यास वाहतुकीवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. यासाठी वाहतूक पोलीस आणि परिवहन विभागाने संयुक्तपणे योग्य मार्ग निश्चित करावेत. ई-रिक्षांमध्ये उपलब्ध असलेल्या जीपीएस प्रणालीच्या माध्यमातून वाहनांचे प्रभावी नियंत्रण आणि देखरेख ठेवता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ई-रिक्षांच्या वेग आणि क्षमतेबाबत येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी परिवहन विभाग, वाहतूक पोलीस आणि संबंधित उत्पादक कंपन्यांची संयुक्त बैठक आयोजित करून बॅटरी तंत्रज्ञानातील सुधारणा आणि आवश्यक तांत्रिक बदलांवर चर्चा करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, महिला ई-रिक्षा योजनेअंतर्गत शासनाचे अनुदान 20 टक्क्यांवरून 40 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आले आहे. या नव्या स्वरूपात लाभार्थ्यांना 40 टक्के शासकीय अनुदान, 50 टक्के बँक कर्ज आणि 10 टक्के स्वतःचा हिस्सा भरावा लागणार आहे.

तटकरे यांनी पुढे सांगितले की, एमएमआर परिसरातील विद्यमान तांत्रिक निकषांमुळे एल-3 प्रवर्गातील ई-रिक्षा सुरू करता आलेल्या नाहीत. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ मजबूत करण्यासाठी निवडक मार्गांवर महिला ई-रिक्षा योजना सुरू करण्याच्या सूचना दिल्या असून, त्यानुसार या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.

महिला सक्षमीकरणासोबतच पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करणे आणि महिलांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

मुंबई-पुणे रेल्वेच्या ३० गाड्या रद्द होताच प्रवाशांच्या मदतीला धावली ‘लालपरी’, उद्यापासून २०० अतिरिक्त बसफेऱ्या सुरू

Web Title: Mmr women e rickshaw scheme pratap sarnaik aaditi tatkare subsidy route plan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 05:44 PM

Topics:  

  • Aditi Tatkare
  • maharashtra
  • pratap sarnaik

संबंधित बातम्या

गणेश भक्तांना लुटणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला बेड्या; फरासखाना पोलिसांची उत्तर प्रदेशात मोठी कारवाई
1

गणेश भक्तांना लुटणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला बेड्या; फरासखाना पोलिसांची उत्तर प्रदेशात मोठी कारवाई

Gondiya News: १०८ रुग्णवाहिकेचा ३ लाख रुग्णांना लाभ! रुग्णांना मिळाली तातडीची मदत, गोंदियात आपत्कालीन रुग्णवाहिकासेवेचा विस्तार
2

Gondiya News: १०८ रुग्णवाहिकेचा ३ लाख रुग्णांना लाभ! रुग्णांना मिळाली तातडीची मदत, गोंदियात आपत्कालीन रुग्णवाहिकासेवेचा विस्तार

अपघातातील नुकसान भरपाईच्या नावाखाली तरुणीकडून 50 हजार उकळले, नंतर…; पुण्यातील प्रकार
3

अपघातातील नुकसान भरपाईच्या नावाखाली तरुणीकडून 50 हजार उकळले, नंतर…; पुण्यातील प्रकार

Jalgaon Dal Price Hike: सणासुदीत खिशाला मोठी कात्री! डाळी महागल्या, मठानेही गाठले १८० रुपये
4

Jalgaon Dal Price Hike: सणासुदीत खिशाला मोठी कात्री! डाळी महागल्या, मठानेही गाठले १८० रुपये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.