Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धाराशिव जिल्हा परिषद राज्यात अव्वल; प्रत्येक गावात डिजिटल सायन्स लॅब ते सौरऊर्जा; ‘धाराशिव व्हिजन २०३०’ची राज्यभर चर्चा

'आपला जीव धाराशिव व्हिजन २०३०' या महत्त्वाकांक्षी उपक्रमामुळे धाराशिव जिल्हा परिषद राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरली आहे. ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी या मॉडेलची राज्यभर अंमलबजावणी करण्याची ग्वाही दिली...

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 27, 2026 | 07:16 PM
धाराशिव जिल्हा परिषद राज्यात अव्वल; प्रत्येक गावात डिजिटल सायन्स लॅब ते सौरऊर्जा; 'धाराशिव व्हिजन २०३०'ची राज्यभर चर्चा

धाराशिव जिल्हा परिषद राज्यात अव्वल; प्रत्येक गावात डिजिटल सायन्स लॅब ते सौरऊर्जा; 'धाराशिव व्हिजन २०३०'ची राज्यभर चर्चा

Follow Us
Follow Us:
  • ‘आपला जीव धाराशिव व्हिजन २०३०’चे राज्यभर अनुकरण होणार
  • धाराशिव जिल्हा परिषद राज्यातील पहिली
  • नव्या ‘मिनी मंत्रालया’साठी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : धाराशिव जिल्हा परिषदेने ‘आपला जीव धाराशिव व्हिजन २०३०’च्या माध्यमातून राज्यासमोर विकासाचा नवा आदर्श उभा केला असून, या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेचे राज्यातील सर्व जिल्हा परिषदांनी अनुकरण करावे, अशी घोषणा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सोमवारी केली. याचवेळी धाराशिव जिल्हा परिषदेच्या प्रस्तावित नवीन प्रशासकीय इमारतीसाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ठोस ग्वाहीही त्यांनी दिली.

जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या प्रांगणात आयोजित ‘आपला जीव धाराशिव व्हिजन २०३०’ कार्यक्रमात बोलताना मंत्री गोरे यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांच्या नेतृत्वाखाली मांडण्यात आलेल्या विकास आराखड्याचे तोंडभरून कौतुक केले. विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेला पूरक ठरणारे हे व्हिजन असून, अशा प्रकारचे नियोजन करणारी धाराशिव जिल्हा परिषद राज्यातील पहिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कर्जमुक्तीची दुसरी यादी जाहीर ! धाराशिवच्या 46046 शेतकऱ्यांना मोठा दिलासा

या व्हिजनमधील प्रत्येक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ग्रामविकास विभाग जिल्हा परिषदेच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, अशी ग्वाही देतानाच, धाराशिवमधून सुरू झालेले हे अभियान राज्यभर पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या धाराशिवमधून विकासाचा नवा अध्याय सुरू झाल्याचे सांगताना मंत्री गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकसित महाराष्ट्र आणि दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या संकल्पनेचा उल्लेख केला. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील अतिरिक्त पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळविणाऱ्या महत्त्वाकांक्षी योजनेला गती मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.

‘व्हिजन २०३०’मधील ठळक संकल्प
प्रत्येक गावात डिजिटल सायन्स लॅब
आधुनिक वाचनालय आणि अभ्यासिका
प्रत्येक गावात विद्युत शवदाहिनी
प्रत्येक घरावर सौरऊर्जा प्रकल्प
शून्य वीजबिल गाव संकल्पना
आशा सेविका व पर्यवेक्षिकांना स्कूटर
हजारो महिलांना उद्योगासाठी आर्थिक मदत
सायंकाळी ७ ते ९ ‘टीव्ही-मोबाईल बंद’ ‘अभिमन्यू’ अभियान
प्लास्टिकमुक्त गावांसाठी ₹१,००० दंडाची तरतूद
११० गणांत उभारल्या जाणार विद्युत शवदाहिनी

जिल्ह्यातील ११० पंचायत समिती गणांमध्ये वित्त आयोगाच्या निधीतून विद्युत शवदाहिनी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यावरण संवर्धनाबरोबरच नागरिकांचा खर्च कमी करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी दिली.

‘मिनी मंत्रालय’ उभारणीला हिरवा कंदील

१९९० मध्ये उभारलेली विद्यमान जिल्हा परिषद इमारत अपुरी पडत असल्याने नवीन प्रशासकीय इमारतीची मागणी सकारात्मकरीत्या पूर्ण केली जाईल. विद्यमान अध्यक्षा आणि उपाध्यक्ष यांच्या कार्यकाळातच धाराशिवच्या नव्या ‘मिनी मंत्रालया’चे स्वप्न साकार करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

“धाराशिव जिल्हा परिषद राज्यातील पहिली आहे, जिने ‘व्हिजन २०३०’सारखा दूरदृष्टीचा विकास आराखडा तयार केला. याचे अनुकरण संपूर्ण राज्याने करावे.”
— जयकुमार गोरे, ग्रामविकास मंत्री

“प्रत्येक गावात विद्युत शवदाहिनी, प्रत्येक घरावर सौरऊर्जा आणि ‘७ ते ९ टीव्ही-मोबाईल बंद’ हा उपक्रम धाराशिवच्या सामाजिक परिवर्तनाचा पाया ठरेल.”
— अर्चना पाटील, अध्यक्षा, जिल्हा परिषद, धाराशिव.

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठबळामुळे रेल्वे, पाणी, रोजगार आणि पर्यटन क्षेत्रातील मोठे प्रकल्प वेगाने मार्गी लागत आहेत.”
— राणाजगजितसिंह पाटील, आमदार, तुळजापूर.

‘व्हिजन २०३०’च्या माध्यमातून विकासाचे नवे मॉडेल सादर करणारी धाराशिव जिल्हा परिषद आता राज्यासाठी ‘रोल मॉडेल’ ठरणार असल्याचे संकेत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या घोषणेमुळे स्पष्ट झाले असून, नव्या जिल्हा परिषद भवनाच्या आश्वासनाने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Dharashiv News: धाराशिव जिल्ह्यासाठी मोठी घोषणा! दलित वस्त्यांच्या विकासासाठी ५ कोटींच्या कामांना मंजुरी

Web Title: Dharashiv vision 2030 model to be implemented across maharashtra jaykumar gore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 07:16 PM

Topics:  

  • Dharashiv
  • maharashtra
  • Zilla Parishad

संबंधित बातम्या

TET पेपरफुटी प्रकरणी दादा भुसेंनी सात दिवसात राजीनामा द्यावा, अन्यथा…; काँग्रेसचा इशारा
1

TET पेपरफुटी प्रकरणी दादा भुसेंनी सात दिवसात राजीनामा द्यावा, अन्यथा…; काँग्रेसचा इशारा

Bhandara: बसस्थानकावरील पाणपोई बंदच; परिवहन विभागाच्या उदासीनतेमुळे प्रवाशांचे हाल, पाण्यासाठी करावी लागतेय भटकंती
2

Bhandara: बसस्थानकावरील पाणपोई बंदच; परिवहन विभागाच्या उदासीनतेमुळे प्रवाशांचे हाल, पाण्यासाठी करावी लागतेय भटकंती

E-Toilet आहे की मृत्यूचा सापळा? माथेरानमध्ये पुन्हा ई-टॉयलेटमध्ये पर्यटक अडकला; ३८.७० लाखांच्या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह
3

E-Toilet आहे की मृत्यूचा सापळा? माथेरानमध्ये पुन्हा ई-टॉयलेटमध्ये पर्यटक अडकला; ३८.७० लाखांच्या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह

Mira Road News: मीरा रोडच्या पूनम सागर सोसायटीत घोणस सापाची एंट्री; रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण
4

Mira Road News: मीरा रोडच्या पूनम सागर सोसायटीत घोणस सापाची एंट्री; रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.