Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv News: वेतन फरकासाठी ८ हजारांची लाच घेताना शिक्षण विभागातील अधीक्षक रंगेहात जेरबंद

वेतन फरकासाठी ८ हजारांची लाच घेताना शिक्षण विभागातील अधीक्षकाला एसीबीने रंगेहात पकडले. वरिष्ठ वेतनश्रेणीचा सुमारे १ लाख ८४ हजार ६०० रुपयांचा फरक काढून देण्यासाठी आरोपीने सुरुवातीला १० हजार रुपयांची लाच मागितली होती.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 02, 2026 | 02:46 PM
वेतन फरकासाठी ८ हजारांची लाच घेताना शिक्षण विभागातील अधीक्षक रंगेहात जेरबंद (फोटो सौजन्य-Gemini)

वेतन फरकासाठी ८ हजारांची लाच घेताना शिक्षण विभागातील अधीक्षक रंगेहात जेरबंद (फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us
Follow Us:
  • वेतन फरकासाठी ८ हजारांची लाच
  • शिक्षण विभागातील अधीक्षक रंगेहात जेरबंद
  • तक्रारदाराने लाच देण्यास नकार
धाराशिव : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या सापळा कारवाईत माध्यमिक शिक्षण विभागातील वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील अधीक्षक इम्रानखान पठाण यास ८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात जेरबंद करण्यात आले. इम्रानखान अहमदपाशा पठाण (वय ४०), पद – अधीक्षक (वर्ग २), वेतन व भविष्य निर्वाह निधी, माध्यमिक शिक्षण विभाग, धाराशिव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो सध्या धाराशिव येथे भाड्याने राहत असून मूळचा उदगीर (जि. लातूर) येथील आहे.

Kolhapur News : उन्हाच्या कडाक्यानंतर पावसाची दमदार बॅटींग; अवकाळी गारांमुळे कोल्हापूरकरांची उडाली दाणादाण

तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिलेल्या तक्रारीनुसार, २०१६ ते २०२४ या कालावधीतील वरिष्ठ वेतनश्रेणीचा सुमारे १ लाख ८४ हजार ६०० रुपयांचा फरक काढून देण्यासाठी आरोपीने सुरुवातीला १० हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली असता आरोपीने १० हजार रुपयांवरून तडजोड करून ८ हजार रुपये लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर १ एप्रिल रोजी सापळा रचण्यात आला. सापळा कारवाईदरम्यान, सेंट्रल बिल्डिंगमधील (मध्यवर्ती प्रशासकीय इमारत) वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालयात आरोपीने तक्रारदाराकडून ८ हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्याला रंगेहात ताब्यात घेतले.

आरोपीकडून मनगटी घड्याळ, एअरबड्स, अंदाजे २० हजार रुपये किमतीचा मोबाईल तसेच ९३० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. आरोपीचा मोबाईल पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आला असून त्याच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे करत आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक विजय वगरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली असून, पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे व अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा यशस्वी करण्यात आला.

मनुष्यबळ कमतरतेमुळे डासजन्य आजारांमध्ये वाढ! मंजूर २,२०० पदांपैकी सुमारे ४० टक्के पदे रिक्त असल्याची माहिती

Web Title: Education department superintendent caught red handed taking 8000 bribe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • Dharashiv
  • education
  • india

संबंधित बातम्या

NEET PG 2026: शून्य किंवा निगेटिव्ह गुण मिळवलेल्यांनाही प्रवेश मिळणार का? पात्रता पर्सेंटाईलवरून पुन्हा पेटला वाद!
1

NEET PG 2026: शून्य किंवा निगेटिव्ह गुण मिळवलेल्यांनाही प्रवेश मिळणार का? पात्रता पर्सेंटाईलवरून पुन्हा पेटला वाद!

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..
2

Harmanpreet Kaur Education: क्रिकेटच्या मैदानात धुमाकुळ घालणारी हरमनप्रीत कौर शिक्षणात किती पुढे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..

Harmanpreet Kaur Resignation: हरमनप्रीत कौरचा मोठा निर्णय! टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा
3

Harmanpreet Kaur Resignation: हरमनप्रीत कौरचा मोठा निर्णय! टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा

IMD Weather Update: सावधान! हवामान पुन्हा बदलणार! ६ ते १० ऑक्टोबर पाऊस-हिमवृष्टीचा इशारा, ‘या’ राज्यांना IMDचा अलर्ट
4

IMD Weather Update: सावधान! हवामान पुन्हा बदलणार! ६ ते १० ऑक्टोबर पाऊस-हिमवृष्टीचा इशारा, ‘या’ राज्यांना IMDचा अलर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.