Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ! वैद्यकीय महाविद्यालयात कायदा धाब्यावर बसवून रातोरात मेसचे कंत्राट बदलले

रोजच्या जेवणासाठी असणारी व्यवस्था अचानक कोलमडल्याने सर्व विद्यार्थी परेशान तर विद्यार्थ्यांचे पालक काळजीने हैराण झाले आहेत. या परिस्थितीस जबाबदार असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 12, 2025 | 06:57 PM
विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ! वैद्यकीय महाविद्यालयात कायदा धाब्यावर बसवून रातोरात मेसचे कंत्राट बदलले

विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ! वैद्यकीय महाविद्यालयात कायदा धाब्यावर बसवून रातोरात मेसचे कंत्राट बदलले

Follow Us
Close
Follow Us:
  • रोजच्या जेवणासाठी असणारी व्यवस्था अचानक कोलमडली
  • मेस चालू होण्यास वेळ लागल्याने विद्यार्थ्यांना उपाशी
  • विद्यार्थ्यांच्या पालकांना काळजीने मनस्ताप
धाराशिव : सर्व नियम धाब्यावर बसवत येथील वैद्यकीय महाविद्यालयातील मेस (खानावळ) चालकाला काढून अन्य व्यक्तीस ही मेस चालविण्यासाठी अचानक दिल्याने वैद्यकीय विद्यालयातील निवासी विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. हा सर्व मनमानी कारभार अचानक आणि सुलतानी पद्धतीप्रमाणे केल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान रोजच्या जेवणासाठी असणारी व्यवस्था अचानक कोलमडल्याने सर्व विद्यार्थी परेशान तर विद्यार्थ्यांचे पालक काळजीने हैराण झाले आहेत. या परिस्थितीस जबाबदार असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे.

मागील कांही वर्षांपासून येथील वैद्यकीय महाविद्यालयात श्री योग बहुउद्देशीय सामाजिक संस्थेस मेस चालविण्यासाठी निविदेद्वारे कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. मुदत संपल्याने मध्यंतरी आणखी काही महिन्यांचा कालावधी वाढवून देण्यात आला होता. मात्र कसलीही निविदा प्रक्रिया न राबवता बुधवारी (१० नोव्हेंबर) ही मेस चालविण्यासाठी एका व्यक्तीस कार्यारंभ आदेश देण्यात आला. त्याच दिवशी मेस चालविणाऱ्या पूर्वीच्या संस्थेस काढून टाकण्यात आल्याचे कळविण्यात आले. त्या संस्थेने गुरुवारी (११ नोव्हेंबर) एक दिवसाची मुदत मागून घेत मेसची जागा सर्व साहित्यासह सोडली. दरम्यान दुसरा मेस चालक येण्यास उशीर झाल्याने आणि मेस चालू होण्यास वेळ लागल्याने विद्यार्थ्यांना उपाशी राहावे लागले. विद्यार्थ्यांच्या पालकांना काळजीने मनस्ताप सहन करावा लागला.

Pune Weather: पुण्याचं झालं काश्मीर! शहरात कडाक्याची थंडी; सर्वात नीचांकी तापमानाची नोंद

दरम्यान मेससाठी कुठलीही निविदा प्रक्रिया न राबविता आपल्या मर्जीतील एकास ही मेस चालविण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. शहरात महिला बचत गट आणि बेरोजगारांच्या अनेक संस्था असताना एका व्यक्तीस हे कंत्राट देण्याचे कारण गुलदस्त्यात असून यात मोठे अर्थकारण असल्याचे बोलले जात आहे. अचानकपणे घेतलेल्या या तुघलकी निर्णयास वैद्यकीय महाविद्यालयातील कोणता भस्मासुर कारणीभूत असेल हा प्रश्नही यामुळे उपस्थित झाला आहे.

या महाविद्यालयात मुली आणि मुले मिळून ४०० विद्यार्थी संख्या असून चहा, नाष्टा आणि दोनवेळा जेवण देण्यात येते. जिल्ह्यासह पर जिल्ह्यातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी इथे वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. मेस प्रकरणात मनमानीपाने चालू असलेल्या गैरकरभरामुळे विद्यार्थ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या प्रकारास विद्यार्थी संसद हे विदयार्थी संगठन जबाबदार असल्याचे संबंधित जबाबदार वरिष्ठ सांगत असले तरी कुठलेही नियम व कायदे न पळता मनमानी पद्धतीने सुरू असलेला वैद्यकीय महाविद्यालयातील कारभार यामुळे चव्हाट्यावर आला आहे.

दरम्यान मी नागपूर मुक्कामी आहे. या मेसचे कंत्राट आपण बदलले नसून विद्यार्थी संसदेने बदलेले आहे. विद्यार्थ्यांची कसलीही गैरसोय झालेली नाही. असे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र चौहान यांनी दैनिक नवराष्ट्रला सांगितले आहे. मात्र निविदा प्रक्रिया पूर्ण न करता, आशा पद्धतीने मेसचे कंत्राट एका मर्जीतील व्यक्तीस देणे हे कुठल्या नियमात बसते. हा प्रश्न यामुळे अनुत्तरीतच राहिला आहे. दरम्यान या मनमानी कारभाराची चौकशी होऊन दोषींवर तात्काळ कारवाई व्हावी अशी मागणी केली जात आहे.

नवी मुंबईत केवळ 111 जागा आणि BJP मध्ये तब्बल 700 पेक्षा अधिक इच्छुक, छाननी करून प्रदेशाकडे पाठवण्यात येणार यादी

Web Title: In the medical college the law was overridden and the mess contract was changed overnight

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 06:57 PM

Topics:  

  • Dharashiv
  • maharashtra

संबंधित बातम्या

Nagpur | महायुतीची तयारी पक्की! सर्व निवडणुका एकत्र लढणार – अमोल मिटकरी
1

Nagpur | महायुतीची तयारी पक्की! सर्व निवडणुका एकत्र लढणार – अमोल मिटकरी

एका बाजूला पक्षांतर तर दुसरीकडे कॅशबॉम्ब शिवसेनेला कोण घेरतंय?
2

एका बाजूला पक्षांतर तर दुसरीकडे कॅशबॉम्ब शिवसेनेला कोण घेरतंय?

NAGPUR | महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र राहणार का? एकनाथ शिंदेंचे मोठे वक्तव्य
3

NAGPUR | महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र राहणार का? एकनाथ शिंदेंचे मोठे वक्तव्य

Nanded : सक्षम ताटे प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची आईची मागणी
4

Nanded : सक्षम ताटे प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची आईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.