सौजन्य - नवराष्ट्र टीम
संयुक्त पूर्व परीक्षा गट ‘ब’ ही परीक्षा ४ जानेवारीला घेण्याचा निर्णय झाला. त्याच दरम्यान म्हणजे ३१ डिसेंबर ते ७ जानेवारी दरम्यान यूजीसी नेट परीक्षा होत आहे. त्यामुळे आता कोणती परीक्षा द्यायची असा प्रश्न उमेदवारांपुढे आहे. यासंदर्भात स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनचे अध्यक्ष महेश घरबुडे म्हणाले, एक तर परीक्षा वेळेवर होत नाहीत. वेळापत्रक जाहीर झाले, तर दोन- दोन परीक्षा एकत्र येत आहेत. आता आयोग बदल करणार का?, याकडे सर्व विध्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
युजीसी-नेट परीक्षा. ३१ डिसेंबर २०२५ ते ७ जानेवारी दरम्यान तर एमपीएससी मार्फत घेण्यात येणारी संयुक्त पूर्व परीक्षा गट ‘ ब’ ४ जानेवारी २०२६ रोजी. दोन्ही परीक्षा एकाचं दिवसी आल्यामुळे विद्यार्थी गोंधळून गेले आहेत. एक तर परीक्षा वेळेवर होत नाहीत. वेळाकपत्रक जाहीर झालं तर दोन परीक्षा एकत्र येत आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी एका परीक्षाला मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. -महेश घरबुडे (अध्यक्ष, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन)






