उस्मानाबाद : वाशी तालुक्यातील इंदापूर व वाशी येथे अफूची शेती केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांना 400 किलो अफुची झाडे जप्त केली असूनया प्रकरणी 2 शेतकऱ्यांना अटक करण्यात आली आहे. नरसिंग वेताळ व विश्वंभर पारडे अशी अटक केलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत.
इंदापूर परिसर हा कांदा पीकासाठी ओळखला जातो. त्यामुळे कांद्याचे फुल जेव्हा फुलोऱ्यात असते तेव्हा त्याखाली अफूचे फुल लपले जाते. असा विचार करून या शेतकऱ्यांनी कांद्याच्या पिकात अफूची शेती केल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पथकाने ही कारवाई केली. अफूची आढळलेली शेती जिल्हा परिषदेच्या शाळेपासून हाकेच्या अंतरावर आहे. ही अफूची शेती सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यावरून विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता व्यक्त होत आहे. नरसिंग वेताळ व विश्वंभर पारडे या दोन शेतकऱ्यांवर एमडीपीएस कायद्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. तसेच परिसरातील कोणत्याही शेतकऱ्याकडे अफू आढळली तर कडक कारवाई करण्यात येईल, असे वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खनाळ यांनी सांगितले.
[read_also content=”एसटी वाहकाची विषारी औषध पिऊन आत्महत्या; बस आगरात आणण्यातं आलं पार्थिव, उपषोणकर्त्यांना अश्रू अनावर https://www.navarashtra.com/dharashiv/marathwada/osmanabad/st-drtiver-commits-suicide-by-consuming-poisonous-drug-in-osmanabad-nrps-245452.html”]






