शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या दोन लाख शेतकरी कुटुंबांची दिवाळी गोड होणार, प्रताप सरनाईकांचा पुढाकार
या उपक्रमासाठी परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी सहकार्य केले आहे. दिवाळी फराळासाठी आवश्यक असलेल्या साखर, मैदा, रवा, बेसन, डालडा यासह पणत्या, उटणे, लक्ष्मीची पावले आणि नवीन वर्षाची दिनदर्शिका अशा साहित्याचा शिध्यामध्ये समावेश आहे.
Akola News : विजेचा शून्य वापर, तरीही 850 रुपयांचे आले बिल; बिलाच्या आकारणीवर प्रश्नचिन्ह
२ नोव्हेंबर रोजी तामलवाडी, येणेगूर आणि उत्तर जेवळी येथे, तर ३ नोव्हेंबर रोजी पळसप, येडशी, येरमाळा आणि पारगाव येथे शिधा वाटपाचे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांना पालकमंत्री प्रताप सरनाईक उपस्थित राहून शेतकरी कुटुंबीयांशी संवाद साधणार आहेत.
दुष्काळामुळे शेतकरी कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या घरातील चूल विझू नये, मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य हरवू नये आणि दुष्काळातही दिवाळीचा सण अंधारात जाऊ नये, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याबरोबरच त्यांच्या मनात जगण्याचा विश्वास निर्माण करणे, हीच खरी माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दिवाळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण मानला जातो. मात्र, दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांसाठी हा सण साजरा करणे कठीण होते. अशा कुटुंबांना मदतीचा हात देण्यासाठी राबवण्यात येणारा हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
दोन लाख शेतकरी कुटुंबांना दिवाळी शिध्याचे वाटप झाल्यामुळे त्यांच्या सणाच्या आनंदात भर पडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारातून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिवाळीच्या काळात दिलासा मिळणार आहे.






