Jalgaon Dal Price Hike: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Jalgaon News: चाळीसगाव (वा.) सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भडका उडाल्याने डाळींचे दर शंभरीपार, सामान्य जनतेच्या खिशाला कात्री ! राज्यात एकीकडे दुष्काळाचे सावट, तर दुसरीकडे वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.
सणासुदीच्या तोंडावर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने सामान्य जनतेसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. गहू, तांदूळ आणि विविध प्रकारच्या डाळींचे वाढलेले दम पाहता सर्वसामान्यांनी जगायचे तरी कसे असा प्रश्न पडला आहे. एकीकडे उत्पन्न मर्यादित, तर दुसरीकडे रोजच्या गरजेच्या वस्तूंच्या किमती गगनाला भिडत असल्याने गृहिणींचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. Jalgaon Dal Price Hike:
बाजारात डाळींचे दर शंभरीपार गेल्याने सर्वसामान्य ग्राहकांना आर्थिक फटका बसत आहे. बाजारभावानुसार, चणाडाळीचा दर १०० रुपये, मूगडाळ १३०, तूरडाळ १५०, चवळी डाळ १४०, तर मसूर डाळ १०० रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे. तर गावरान मठाचे दर १७० ते १८० रुपये किलोपर्यंत पोहचले आहेत.
राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत अन्नधान्याच्या किमतीमध्ये वाढ झाल्यास त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होत आहे. मात्र, वाढत्या महागाईचा भार सहन करणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी ठोस उपाययोजना होणे आवश्यक आहे. बाजारातील दरांवर नियंत्रण ठेवणे, साठेबाजी आणि कृत्रिम दरवाढीवर लक्ष ठेवणे, तसेच गरजू कुटुंबाना परवडणाऱ्या दरात जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
Jalgaon News: “कुणी घेईल का कांद्याचं रोप?” यावलच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आर्त हाक!
डाळीसोबतच ज्वारी, बाजरी, आणि गव्हाचे दरही सामान्य ग्राहकांच्या चितेत भर घालत आहेत. गहू आणि लोकवन गहू यांचे दर प्रतिकिलो ३५ रुपये असल्याने कुटुंबाच्या महिन्याच्या किराणा खर्चात वाढ होत आहे. तांदळाच्या दरवाढीमुळेही सर्वसामान्य ग्राहकांचे बजेट बिघडत असल्याची भावना व्यक्त होत आहे. पूर्वी महिन्याच्या सुरुवातीलाच किराणा भरून ठेवणाऱ्या कुटुंबांना आता प्रत्येक वस्तूचे प्रमाण ठरवून खरेदी करावी लागत आहे. महागाईमुळे काही कुटुंबांना आपल्या दैनंदिन गरजांमध्ये कपात करावी लागत असून, सणासुदीचा खर्च भागवायचा कसा, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
Jalgaon News: ठेचा-भाकरी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठणार! गिरणेच्या पाण्यासाठी आंदोलनाचा इशारा
जीवनावश्यक वस्तूच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या नाराजीत भर पडत आहे. सणासुदीच्या काळात नागरिकाना दिलासा देण्यासाठी सरकारने बाजारभावांवर लक्ष ठेवावे आणि महागाई नियंत्रणासाठी प्रभावी पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Ans: १०० रुपये किलो.
Ans: मूगडाळ १३० रुपये आणि तूरडाळ १५० रुपये किलो.
Ans: १७० ते १८० रुपये किलो.






