Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंपरी-चिंचवड शहरात नव्याने पाच हजार 667 रिक्षाचालकांना परवाने वाटप; परवाना देण्यास अनेक रिक्षा संघटनेने केला विरोध

पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवर आणखी मोठ्या प्रमाणावर रिक्षा धावणार असून 'आरटीओ'कडून आठ महिन्यांत 5 हजार 667 रिक्षाचालकांना परमीटचे वाटप करण्यात आले आहे. मात्र आहे त्या रिक्षा चालकांचा व्यवसाय होत नसल्याचे सांगत यास अनेक रिक्षा संघटनेने विरोध केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 26, 2023 | 12:43 PM
पिंपरी-चिंचवड शहरात नव्याने पाच हजार 667 रिक्षाचालकांना परवाने वाटप; परवाना देण्यास अनेक रिक्षा संघटनेने केला विरोध
Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवर आणखी मोठ्या प्रमाणावर रिक्षा धावणार असून ‘आरटीओ’कडून आठ महिन्यांत 5 हजार 667 रिक्षाचालकांना परमीटचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक बेरोजगार तरुणांना रोजगाराचे साधन प्राप्त होणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी दिली आहे. मात्र आहे त्या रिक्षा चालकांचा व्यवसाय होत नसल्याचे सांगत यास अनेक रिक्षा संघटनेने विरोध केला आहे.

चौकाचौकात चालकांनी रिक्षा स्टँड उभारले आहेत. ठरवून दिलेल्या जागेतच या रिक्षा थांबतात. ठरविलेल्या मार्गात सेवा देतात. मात्र, खासगी अ‍ॅपवर धावणार्‍या रिक्षांचा कुठलाच थांबा नसतो. त्यामुळे मिळेल त्या ठिकाणी या रिक्षा पार्क केल्या जातात. परिणामी बर्‍याचदा वाहतुकीची समस्या उद्भवत आहे. पर्यायाने, शहरातील नागरिकांना नाहक त्रासाला सामोर जावे लागत आहे. त्यावर तोडगा आवश्यक आहे. मात्र परमीटचे वाटप आरटीओकडून अद्यापही सुरूच आहे.

शहरातील नागरिक खासगी वाहनांचा ज्या प्रमाणात वापर करीत आहेत, त्याहून अधिक संख्येने सार्वजनिक वाहतुकीचा अवलंब करणारे नागरिक आहेत. सार्वजनिक वाहनांमध्ये महापालिकेच्या बस, ओला, उबेर आणि रिक्षा आदी वाहनांचा समावेश होतो. शहरात सार्वाजनिक वाहतुकीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने रिक्षांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. 2017 पासून रिक्षा परवाना वाटप खुला करण्यात आल्याने मागेल त्याला अटींची पूर्तता करून परमीट दिले जात आहे.

मेट्रोद्वारे नागरिकांना सक्षम सार्वजनिक सेवा मिळत आहे. त्यामुळे बर्‍याच रिक्षाचालकांचा दिवस भरणे देखील अवघड होऊन बसले आहे. रिक्षाच्या कर्जाचे हप्तेही थकले आहेत. त्यामध्ये आरटीओकडून परमीट वाटप सुरू असल्याने शहरातील रिक्षांमध्ये आणखी भर पडत आहे. त्यामुळे रिक्षांचे परमीट थांबवावे, अशी मागणी अनेक संघटनांकडून होत आहे.

रिक्षाचालकांना परमीटचे वाटप (वर्ष 2023)

जानेवारी : 422

फेब्रुवारी : 590

मार्च : 547

एप्रिल : 437

मे : 1009

जून : 1004

जुलै : 990

ऑगस्ट : 668

एकूण : 5667

रिक्षांचे वाढते प्रमाण शहरासाठी धोकेदायक : बाबा कांबळे

2017 सली महाराष्ट्र सरकारने मुक्त रिक्षा परवाना सुरू केला यामुळे पिंपरी चिंचवड पुणे व आसपासच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रिक्षा विकल्या जात आहेत. यामध्ये महिन्याला हजार रिक्षा नव्याने शहरांमध्ये येत आहेत. पूर्वी पिंपरी चिंचवड शहरामध्येपाच हजार रिक्षा होत्या. आता पिंपरी चिंचवड शहरातील रिक्षा ची संख्या 35000 पर्यंत पोहोचली आहे, एवढ्या मोठ्या संख्येने वाढणाऱ्या रिक्षाचं प्रमाण पाहता वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत गैरसोईचे असून, रिक्षा चालकांचा व्यवसाय देखील यामुळे एका भाकरी मध्ये अनेक वाटेकरी होत आहेत. रिक्षा व्यवसाय देखील अडचणीमध्ये आला आहे. या सर्व प्रश्नांवरती सरकारने तातडीने लक्ष देऊन मुक्तरिक्षा परवाना बंद करावा. तसेच नवीन इलेक्ट्रिक रिक्षाला परवानगी सक्ती करावी, अन्यथा स्मार्ट सिटी मेट्रो सिटी मध्ये सर्वत्र रिक्षा रिक्षा दिसतील. प्रवासी कमी आणि रिक्षा जास्त अशा प्रकारे भयानक अवस्था निर्माण होईल, ही परिस्थिती थांबवण्यासाठी सरकारने तातडीने उपयोजना करावी, अशी मागणी महाराष्ट्र रिक्षा पंचायत संस्थापक अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी केले आहे.

Web Title: Distribution of licenses to five thousand 667 rickshaw pullers in pimpri chinchwad city several rickshaw associations opposed the granting of the license nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2023 | 12:43 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • maharashtra
  • NAVARASHTRA
  • Pimpri
  • Riksha

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
1

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा
2

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!
3

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक
4

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.