Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“नो लिमिट, नो ब्लॅक मार्केट!”, जिल्हाधिकारी कार्तिकेयन अ‍ॅक्शन मोडमध्ये; पंढरपूर पेट्रोल पंपावर अचानक धाड

सोलापूर जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल टंचाईच्या अफवा आणि शॉर्ट सेलिंगच्या तक्रारी वाढत असताना जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी थेट मैदानात उतरून अ‍ॅक्शन मोड सुरू केला आहे. पंढरपूर शहरातील एका पेट्रोल पंपावर त्यांनी अचानक तपासणी करत इंधन पुरवठ्याचा आढावा घेतला.

  • By विवेक
Updated On: May 26, 2026 | 09:13 PM
District Collector Karthikeyan raids on Pandharpur petrol pump, Pandharpur, Solapur, Petrol Diesel Shortage,

District Collector Karthikeyan raids on Pandharpur petrol pump, Pandharpur, Solapur, Petrol Diesel Shortage,

Follow Us
Follow Us:

पंढरपूर | प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल टंचाईच्या अफवा आणि शॉर्ट सेलिंगच्या तक्रारी वाढत असताना जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी थेट मैदानात उतरून अ‍ॅक्शन मोड सुरू केला आहे. पंढरपूर शहरातील एका पेट्रोल पंपावर त्यांनी अचानक तपासणी करत इंधन पुरवठ्याचा आढावा घेतला. तपासणीत सर्व व्यवहार सुरळीत आढळले असले तरी “कृत्रिम टंचाई आणि काळाबाजार खपवून घेतला जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा दिला आहे.

सोलापूर जिल्ह्याला पेट्रोल डिझेल व गॅस पुरवठा करणाऱ्या बीपीसीएल एचपीसीएल व आयओसीएल या सर्व कंपन्यांनी जिल्ह्याला प्राधान्य देऊन मोठ्या प्रमाणात बदल स्टॉक उपलब्ध ठेवावा. तसेच दैनंदिन मागणीप्रमाणे जिल्ह्याच्या शहर व ग्रामीण भागात इंधन पुरवठा सुरळीतपणे ठेवणे आवश्यक असल्याचे निर्देश जिल्हाधिकारी एस कार्तिकीयन यांनी दिले

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात BPCL, HPCL आणि IOCL कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत सोलापूर जिल्ह्यासाठी किमान सात दिवसांचा बफर स्टॉक ठेवण्याचे आदेश देण्यात आले. ग्रामीण भागातही दररोज नियमित इंधन पुरवठा सुरू ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या.

“विक्रीवर मर्यादा घालू नका”

काही पेट्रोल पंपांवर कंपनीकडून मर्यादित विक्रीचे बंधन घातल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या. यावर जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी संताप व्यक्त करत, जिल्हा प्रशासनाच्या परवानगीशिवाय कोणत्याही विक्रेत्यावर विक्री मर्यादा लागू करू नयेत, असे स्पष्ट निर्देश कंपन्यांना दिले.

जिल्हा पुरवठा अधिकारी श्री सरडे यांनी काही पेट्रोल पंप चालकांकडून द्रव व मोठ्या प्रमाणात एकाच व्यक्तीला इंधनपुरवठा होत आहे अशा तक्रारी ग्रामीण भागातून येत आहेत तसेच बार्शी करमाळा अक्कलकोट या तालुक्यातून इंधनपुरवठा विस्कळीत झाल्याबाबत ही तक्रारी येत असल्याने या भागातील पेट्रोल पंप सुरू राहतील. या दृष्टीने कंपन्यांनी त्या ठिकाणच्या विक्रेत्यांना पुरवठा करावा असा सूचना दिल्या. जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा अनाधिकृत साठवणूकीसह काळाबाजार रोखण्यासाठी तसेच काही नागरिकाकडून, पेट्रोल विक्रेत्याकडून, पेट्रोल डिझेलचे शॉर्ट सेलिंग सुरू असल्याच्या तक्रारी आल्या होत्या त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी आज पंढरपूर शहरातील एका पेट्रोल पंपावर तपासणी केली .वजन व मापे विभागाला सर्व पेट्रोल पंपांचे कॅलिब्रेशन तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कमी मोजमाप किंवा फसवणूक आढळल्यास कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

“दिल्लीतल्या नाकर्त्या नेतृत्वाला खुश करण्यासाठी…” हर्षवर्धन सकपाळांच्या पंतप्रधान मोदींवरील टीकेला बावनकुळेंचे प्रत्युत्तर

तालुकानिहाय भरारी पथके सज्ज

इंधनाचा काळाबाजार आणि अनधिकृत साठेबाजी रोखण्यासाठी प्रत्येक तालुक्यात संयुक्त भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. तहसीलदार, पोलीस निरीक्षक, नायब तहसीलदार, पुरवठा अधिकारी यांचा या पथकात समावेश असून पेट्रोल पंपांवर नियमित तपासणी केली जाणार आहे.

नागरिकांना आवाहन

“जिल्ह्यात पुरेसा पेट्रोल-डिझेल साठा उपलब्ध आहे. नागरिकांनी घाबरून अतिरिक्त साठवणूक करू नये,” असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे सांगितले.

महायुतीत विधानपरिषदेचा तिढा कायम तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण अमित शहांच्या भेटीला, भाजपच्या १२ जागांसाठी ४८ जणांची यादी

Web Title: District collector karthikeyan raids on pandharpur petrol pump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 09:13 PM

Topics:  

  • Diesel Petrol Price
  • Pandharpur News
  • Petrol price hike
  • Solapur News

संबंधित बातम्या

Pure Petrol Rate: E20 इंधनाला विरोध करणाऱ्यांना झटका; 100% शुद्ध पेट्रोल हवंय? मग मोजा 168 रुपये लीटर! गडकरींकडून खुलासा
1

Pure Petrol Rate: E20 इंधनाला विरोध करणाऱ्यांना झटका; 100% शुद्ध पेट्रोल हवंय? मग मोजा 168 रुपये लीटर! गडकरींकडून खुलासा

चार महिन्यांनंतर परिवहन समितीला मुहूर्त; २० जुलैला १२ सदस्यांची घोषणा, भाजपचे १०, एमआयएम व शिवसेनेला प्रत्येकी एक जागा
2

चार महिन्यांनंतर परिवहन समितीला मुहूर्त; २० जुलैला १२ सदस्यांची घोषणा, भाजपचे १०, एमआयएम व शिवसेनेला प्रत्येकी एक जागा

Global Fuel Crisis : भारतात आहेत 23 तेल शुद्धीकरण कारखाने; जाणून घ्या किती वापरले जाते किती होते तेल उत्पादन?
3

Global Fuel Crisis : भारतात आहेत 23 तेल शुद्धीकरण कारखाने; जाणून घ्या किती वापरले जाते किती होते तेल उत्पादन?

Petrol-Diesel Price: होर्मुझ संकटामुळे सरकार दबावात? पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवणार की टॅक्स कमी करणार?
4

Petrol-Diesel Price: होर्मुझ संकटामुळे सरकार दबावात? पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवणार की टॅक्स कमी करणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.