Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dombivli Rasrang Dandiya 2026: शेतकऱ्यांच्या मदतीसाठी श्रीकांत शिंदेंचा मोठा निर्णय; यंदाचा ‘रासरंग दांडिया’ रद्द

Dombivli Rasrang Dandiya 2026: संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा ‘डोंबिवली रासरंग दांडिया उत्सव 2026’ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हा निर्णय घेतला असून, उत्सवाऐवजी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भरीव निधी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 24, 2026 | 03:55 PM
Dombivli Rasrang Dandiya 2026: शेतकऱ्यांच्या मदतीसाठी श्रीकांत शिंदेंचा मोठा निर्णय; यंदाचा ‘रासरंग दांडिया’ रद्द

Dombivli Rasrang Dandiya 2026: शेतकऱ्यांच्या मदतीसाठी श्रीकांत शिंदेंचा मोठा निर्णय; यंदाचा ‘रासरंग दांडिया’ रद्द

Follow Us
Follow Us:
  • यंदाचा ‘ डोंबिवली रासरंग दांडिया उत्सव – २०२६ ‘ रद्द !
  • संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भरीव निधी देण्यात येणार
  • शेतकरी संकटाच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा मोठा निर्णय
डोंबिवली : महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाच्या अनियमिततेमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी बांधव गंभीर संकटात सापडले आहेत. वर्षभर कष्ट करून उभे केलेले पीक डोळ्यांसमोर उद्ध्वस्त होत असताना शेतकरी कुटुंबांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला असून कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यंदाचा डोंबिवलीतील भव्य ‘रासरंग’ दांडिया उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात साजऱ्या होणाऱ्या या उत्सवासाठी करण्यात येणारा खर्च यंदा उत्सवावर न करता संकटग्रस्त शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी वापरण्यात येणार आहे. याबाबतची माहिती शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

डोंबिवलीतील नवदुर्गा मित्र मंडळ आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी डोंबिवली येथील डी. एन. सी. शाळेच्या मैदानात ‘रासरंग’ दांडिया उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात येते. डोंबिवलीसह कल्याण-डोंबिवली, ठाणे, उल्हासनगर, अंबरनाथ तसेच परिसरातील हजारो नागरिक या उत्सवात सहभागी होत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून रासरंग हा डोंबिवलीतील नवरात्रोत्सवातील प्रमुख आकर्षण ठरला असून दांडिया रसिकांसाठी या उत्सवाची विशेष उत्सुकता असते.

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

मात्र, यंदा महाराष्ट्रातील शेतकरी बांधव अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहेत. अनेक भागांमध्ये पावसाच्या अनियमिततेमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. वर्षभर कष्ट करून उभे केलेले पीक हातचे गेल्याने अनेक कुटुंबांच्या उत्पन्नाचा आधारच हिरावला गेला आहे. शेतकऱ्याचे हे नुकसान केवळ एका कुटुंबापुरते मर्यादित नसून त्याचा परिणाम संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होत असतो.

या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यंदा रासरंगचा भव्य उत्सव न करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी संकटात असताना त्याच स्वरूपात मोठा उत्सव साजरा करणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका या निर्णयामागे आहे. उत्सवासाठी होणारा खर्च हा यंदा संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी वापरला जाणार असून, उत्सवाच्या माध्यमातून निर्माण होणारा आनंद यंदा शेतकऱ्यांच्या मदतीतून वाटण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही संकटग्रस्त शेतकरी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. नुकताच त्यांनी अकोला, बुलढाणा आदी भागांतील शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. संकटग्रस्त कुटुंबांना मदत करताना त्यांच्या मुलांचे शिक्षण, मुला-मुलींचे विवाह तसेच अन्य कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्येही मदतीचा हात देण्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या माध्यमातूनही शेतकरी कुटुंबांना शक्य ती मदत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

याच सामाजिक बांधिलकीतून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रासरंग उत्सवाबाबत हा निर्णय घेतला आहे. दरवर्षी उत्सवाच्या आयोजनासाठी करण्यात येणाऱ्या निधी संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वळविण्यात येणार असून, नवदुर्गा मित्र मंडळ आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना भरीव निधी देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोणत्या भागातील शेतकऱ्यांना आणि कोणत्या स्वरूपात मदत अधिक परिणामकारकपणे पोहोचविता येईल, याबाबतचे नियोजन सध्या सुरू आहे. मदत प्रत्यक्ष गरजू शेतकरी कुटुंबांपर्यंत पोहोचावी, यासाठी नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेऊन त्यानुसार मदतीचे स्वरूप निश्चित केले जाणार आहे. या मदतीबाबतची सविस्तर माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे आमदार राजेश मोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यंदा रासरंगचा भव्य जल्लोष होणार नसला तरी नवरात्रोत्सवाची परंपरा कायम ठेवण्यात येणार आहे. साधेपणाने देवीची घटस्थापना, पूजा आणि आराधना केली जाणार आहे. उत्सव दरवर्षी साजरे करता येतात; मात्र संकटाच्या काळात आपल्या अन्नदात्याच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ आली असताना त्याला प्राधान्य देणे अधिक महत्त्वाचे आहे. यंदा रासरंगच्या माध्यमातून होणारा जल्लोष बाजूला ठेवून शेतकरी कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची भावना खासदार डॉ. शिंदे याची व्यक्त केली आहे. महाराष्ट्राचा शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे तो संकटात असताना त्याच्या पाठीशी उभे राहणे ही समाज म्हणून आपली सामूहिक जबाबदारी आहे. याच भावनेतून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यंदाच्या रासरंग दांडिया उत्सव रद्द करत शेतकरी बांधवांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

IIT Bombay Sahil Wakode Case : साहिल वाकोडे प्रकरणात नवा ट्विस्ट; CCTV आला समोर, वर्षा गायकवाडांनी उपस्थित केले गंभीर सवाल

Web Title: Dombivli rasrang dandiya utsav 2026 cancelled funds to help distressed farmers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 03:55 PM

Topics:  

  • Dombivli
  • Farmers
  • Shrikant Shinde

संबंधित बातम्या

Dombivli News: डी मार्टसमोरील रिक्षाचालकांकडून प्रवाशांना अवाजवी भाडे? विरोध केल्यास दमदाटीचा आरोप
1

Dombivli News: डी मार्टसमोरील रिक्षाचालकांकडून प्रवाशांना अवाजवी भाडे? विरोध केल्यास दमदाटीचा आरोप

Devendra Fadnavis: खरीप हातातून गेला, रब्बीही धोक्यात! धाराशिवचा दुष्काळ मुख्यमंत्र्यांसमोर, शेतकऱ्यांना सरसकट मदतीची घोषणा
2

Devendra Fadnavis: खरीप हातातून गेला, रब्बीही धोक्यात! धाराशिवचा दुष्काळ मुख्यमंत्र्यांसमोर, शेतकऱ्यांना सरसकट मदतीची घोषणा

Ahilyanagar News: भीषण दुष्काळामुळे गाव सोडण्याची वेळ! अहिल्यानगरच्या चापडगावात 1972 पेक्षाही भयावह परिस्थिती
3

Ahilyanagar News: भीषण दुष्काळामुळे गाव सोडण्याची वेळ! अहिल्यानगरच्या चापडगावात 1972 पेक्षाही भयावह परिस्थिती

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता
4

शेतकऱ्यांसमोर नवे संकट..! प्रतिकूल हवामानाचा भात पिकाला फटका, भाताचा उत्पादन खर्च वाढला; तांदळाच्या दरवाढीची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.