Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tukaram Mundhe Transfer: तुकाराम मुंडेंच्या प्रतिमेला थेट दुग्धाभिषेक! बदली न करण्यासाठी मंगळवेढ्यातील जनता रस्त्यावर

Tukaram Mundhe FDA Commissioner - तुकाराम मुंडे यांनी आपल्या प्रशासकीय कारकिर्दीत पारदर्शक कारभार, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, लोकहिताला प्राधान्य आणि नियमांचे कठोर पालन यांचा आदर्श निर्माण केला आहे. फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करताना त्यांनी कोणताही दबाव न मानता कायद्याची अंमलबजावणी केली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 12, 2026 | 07:07 PM
Tukaram Mundhe FDA Commissioner, Tukaram Mundhe Transfer News, Mangalwedha Solapur News,

Tukaram Mundhe FDA Commissioner, Tukaram Mundhe Transfer News, Mangalwedha Solapur News,

Follow Us
Follow Us:
  • प्रामाणिक आणि धाडसी कामाचे कौतुक करण्यासाठी आयोजकांनी तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त म्हणून त्यांची किमान पुढील ३ वर्षे बदली करण्यात येऊ नये
  • राज्यभरातील भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट औषधे आणि गुटखा माफियांचे धाबे दणाणले
 

Tukaram Mundhe Transfer: अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी राज्यभर भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट औषधे, गुटखा विक्री तसेच नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित विविध गैरप्रकारांवर सुरू केलेल्या धडक कारवाईचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. त्यांच्या प्रामाणिक, धाडसी आणि जनहिताच्या कार्यशैलीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मंगळवेढा शहरात त्यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करण्यात आला.

यावेळी उपस्थित नागरिकांनी तुकाराम मुंडे यांची किमान तीन वर्षे बदली करू नये, अशी मागणी शासनाकडे केली. राज्यभर सुरू असलेल्या त्यांच्या कठोर कारवाईमुळे अनेक भेसळखोर, गुटखा माफिया, बनावट औषध विक्रेते आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या प्रवृत्तींचे धाबे दणाणले असून, सर्वसामान्य जनतेत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Crime News : प्रणित मोरेसह ‘त्या’ दोघांवर मोठी कारवाई, सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल

मंगळवेढा परिसरातही दिवसेंदिवस वाढत चाललेले भेसळयुक्त दूध, निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ, बनावट औषधांची विक्री, विविध अवैध व्यवसाय आणि नागरिकांच्या आरोग्याशी व सुरक्षिततेशी खेळणाऱ्या प्रवृत्ती यांच्याविरोधात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रामाणिक अधिकारी जर निर्भयपणे आणि निष्पक्षपणे जनतेच्या हितासाठी काम करत असतील, तर समाजाने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, या भावनेतून हा दुग्धाभिषेक करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

तुकाराम मुंडे यांनी आपल्या प्रशासकीय कारकिर्दीत पारदर्शक कारभार, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, लोकहिताला प्राधान्य आणि नियमांचे कठोर पालन यांचा आदर्श निर्माण केला आहे. फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करताना त्यांनी कोणताही दबाव न मानता कायद्याची अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे राज्यभरातील नागरिकांमध्ये त्यांच्या कार्याबद्दल आदराची भावना निर्माण झाली आहे.

Pune Crime : आता वाचलीस, पण पुन्हा दिसलीस तर…; पुण्यात महिलेला कारने उडवून जीवे मारण्याचा प्रयत्न

अशा प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या पाठीशी समाजाने एकजूट दाखवणे ही काळाची गरज असून, शासनानेही अशा अधिकाऱ्यांना पाठबळ देण्याची आवश्यकता असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

या आंदोलनामध्ये मंगळवेढा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक, युवक, शेतकरी, व्यापारी, महिला, सामाजिक कार्यकर्ते, माजी सैनिक संघटनेचे सदस्य तसेच विविध सामाजिक व स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

“खुर्चीचा मान पदामुळे मिळतो, पण जनतेचा मान सेवेमुळे मिळतो. शासनाचा पगार हा फक्त घर चालवण्यासाठी नसून जनतेची कामे प्रामाणिकपणे पार पाडल्याबद्दल मिळणारी लोकसेवेची पावती आहे. तुकाराम मुंडे यांच्यासारखा अधिकारी प्रामाणिकपणे काम करत असेल तर इतर अधिकाऱ्यांनीही त्यांचा आदर्श घेतला पाहिजे.”
— सतीश दत्तू
अध्यक्ष, वारी परिवार, मंगळवेढा

 

Web Title: Dont transfer tukaram mundhe mangalwedha residents urge maha govt to keep fda chief

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 07:07 PM

Topics:  

  • FDA
  • maharashtra news
  • Solapur News
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

Tukaram Mundhe: महाराष्ट्रात मोठा घोळ! 11 रुपयांचा IV Set 325 ला विक्री, तुकाराम मुंडेंनी केंद्रीय हस्तक्षेपाची केली मागणी
1

Tukaram Mundhe: महाराष्ट्रात मोठा घोळ! 11 रुपयांचा IV Set 325 ला विक्री, तुकाराम मुंडेंनी केंद्रीय हस्तक्षेपाची केली मागणी

Jalgaon News : मुक्ताईनगर हादरलं! भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू; दुसरा गंभीर
2

Jalgaon News : मुक्ताईनगर हादरलं! भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू; दुसरा गंभीर

Satara : मराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया गरजेची, शिवेंद्रसिंहराजेंचं जरांगेंना आवाहन
3

Satara : मराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया गरजेची, शिवेंद्रसिंहराजेंचं जरांगेंना आवाहन

Maharashtra Film City Projects: बॉलिवूडसाठी मोठी बातमी! नाशिक आणि रामटेकमध्ये उभारणार नवी फिल्म सिटी; सरकारची योजना काय?
4

Maharashtra Film City Projects: बॉलिवूडसाठी मोठी बातमी! नाशिक आणि रामटेकमध्ये उभारणार नवी फिल्म सिटी; सरकारची योजना काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.