प्रणित मोरेसह 'त्या' दोघांवर मोठी कारवाई, सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल
अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या स्टॅण्डअप कॉमेडियन प्रणित मोरेच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याच्या कॉमेडी शो मधील काही व्हिडियोज सोशल मीडियावर व्हायरल होत असून देशभरात संतापाचे वातावरण आहे. प्रणित मोरेंच्या शो मध्ये एका प्रेक्षकाने आपला अनुभव शेअर करत महिलेबाबत वादग्रस्त विधान केले होते. तसेच एका महिला डॉक्टरनेसुद्धा आपला अनुभव शेअर करत एका मृत पुरुषाच्या प्रायव्हेट पार्टबद्दल वक्तव्य केले होते. यानंतर सोशल मीडियावर याबाबत मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे. अश्यातच आता मोठी बातमी येत असून कॉमेडियन प्रणित मोरेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कॉमेडियन प्रणित मोरे आणि इतर दोघांविरुद्ध महाराष्ट्र सायबर गुन्हे विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर महिलांबद्दल अवमानकारक, अश्लील आणि आक्षेपार्ह व्हिडियो प्रसारित केल्याच्या आरोपावरून भारत न्याय संहिता आणि आयटी ऍक्टच्या विविध कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात येत आहे. प्रणित मोरेसह, हिमांशू जांगरा आणि डॉ. सेजल पवार यांना समन्स बजावण्यात आले असून त्यांना चौकशीसाठी हजर राहावे लागेल. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु असून संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचे समजते.
हा संपूर्ण वाद प्रणीत मोरेच्या लाईव्ह स्टँड-अप शोदरम्यान घडलेल्या एका संवादामुळे सुरू झाला. प्रेक्षकांशी बोलताना हिमांशू जंगरा या तरुणाने त्याच्या डेटिंगचा अनुभव सांगितला. त्यावेळी त्याने एका मुलीसोबत डेटवर गेल्यानंतर तिच्यासाठी ३७० रुपयांची चिकन बिर्याणी घेतल्याचे सांगितले.
Malti Chahar On Pranit More: प्रणित मोरेला मालची चहरने सुनावलं, ‘बिग …
यानंतर त्याने केलेल्या एका आक्षेपार्ह आणि लैंगिक स्वरूपाच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. अनेकांनी या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत ते महिलांचा अपमान करणारे असल्याचे म्हटले. व्हिडियोत दिसत असल्याप्रमाणे बिर्याणीवर खर्च केलेला ३७० रुपयांचा खर्च त्याला ‘वसूल’ करायचा होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आणि संबंधित तरुणावर टीकेचा भडिमार सुरू झाला.
दुसऱ्या एका व्हिडियोमध्ये एक महिला डॉक्टर मृतदेहाच्या खाजगी अवयवांबद्दल विनोद करत असल्याने मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. डॉ सेजल पवार हिने वैद्यकीय महाविद्यालयामधील आपला अनुभव सांगताना अवयवदान केलेल्या मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्ट्सवरून विनोद करत असल्याचे या व्हिडियोत दिसत येत आहे. महिला डॉक्टरच्या या विधानांनंतर वैद्यकीय व्यवसायाची प्रतिष्ठा आणि वैद्यकीय नैतिकतेवरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Pranit More : अकाउंट डिऍक्टिव्हेट, त्यात मुंबई पोलिसांची ‘ती’ X पोस्ट …






