Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वारगेट पोलिसांची दुहेरी कामगिरी; दुचाकी चोरणारे व मोबाईल हिसकावणारे तरुण अटकेत

  • By युवराज भगत
Updated On: Mar 18, 2024 | 10:04 PM
स्वारगेट पोलिसांची दुहेरी कामगिरी; दुचाकी चोरणारे व मोबाईल हिसकावणारे तरुण अटकेत
Follow Us
Follow Us:

पुणे : स्वारगेट पोलिसांनी दुहेरी कारवाई करीत जबरदस्तीने मोबाईल हिसकावणारे चोरट्यांसह दुचाकी चोरणाऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये पोलिसांनी तिघांना अटक केली असून, एक अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. त्यांच्याकडून एकूण चार गुन्ह्यांची उकल झाली आहे.

अल्पवयीन मुलाला पकडून दुचाकी जप्त

दुचाकी चोरणाऱ्या राजेंद्र परमेश्वर कदम (वय २४) याला अटक केली आहे. त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. तर, एका अल्पवयीन मुलाला पकडून त्याच्याकडून एक दुचाकी जप्त केली आहे. जबरदस्तीने मोबाईल हिसकावणाऱ्या साद शेरअली शेख (वय २२) व उदय सुनील जाधव (वय २२, रा. सोमवार पेठ) यांना अटक केली आहे.

परिमंडळ दोनच्या उपायुक्त स्मार्तना पाटील

ही कारवाई परिमंडळ दोनच्या उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ट निरीक्षक दिलीप फुलपगारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गीता बागवडे, उपनिरीक्षक अशोक येवले, अनिल शेख, शिवा गायकवाड, फिरोज शेख, संदीप घुले व त्यांच्या पथकाने केली आहे.

शहरात दुचाकी चोरी तसेच दुचाकीवरून मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेण्याच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. हा आलेख दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यातही स्वारगेट परिसरात, बसस्थानक व इतर भागात या घटना सातत्याने घडत होत्या. पोलीस पथकाने सीसीटीव्ही तपासले. तसेच, चोरट्यांचा माग काढण्यास सुरवात केली होती. तेव्हा पोलिसांना राजेंद्र कदम याच्याबाबत माहिती मिळाली. त्याला पकडून चौकशी केली असता त्याच्याकडून दुचाकी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले.

 

त्यासोबतच एका अल्पवयीन मुलाला पकडले असता त्याच्याकडून एक दुचाकी जप्त केली. त्याचवेळी दुसऱ्या माहितीत साद शेख व उदय जाधव यांना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबूली दिली. त्यांच्याकडून एक मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. पुढील तपास स्वारगेट पोलीस करत आहेत.

Web Title: Double feat of swargate police youths who stole bikes and snatched mobile phones were arrested nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2024 | 10:03 PM

Topics:  

  • Pune Crime
  • pune news
  • Swargate Police Station

संबंधित बातम्या

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
1

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
2

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
3

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे
4

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.